All Sportssports newsTennis

विम्बल्डन डायरी 2022

किर्गिऑस-सितसिपासचे एकमेकांवर शाब्दिक हल्ले

विम्बल्डन डायरी 2022 | ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिऑस (Nick Kyrgios) याने विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत चौथ्या मानांकित स्टेफानोस सितसिपास (Stefanos Tsitsipas) याला पराभवाचा धक्का दिला. मात्र, या सामन्याच्या वेळी आणि सामन्यानंतर प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार शाब्दिक ‘व्हॉलीज’ रंगल्या. ते पाहून अनेकांना जॉन मेकॅन्रोच्या सामन्याची आठवण झाली. किर्गिऑसने या सामन्यात 6-7 (2-7), 6-4, 6-3, 7-6 (9-7) असा विजय मिळवला. या सामन्यातील दोघांच्या आक्रमकतेची विम्बल्डन स्पर्धा परिसरात खूपच चर्चा झाली. त्यामुळे रफाएल नदाल सेंटर कोर्टवर खेळत असताना कोर्ट वनवरील किर्गिऑस – सितसिपास लढतीस जास्त गर्दी झाली. या सामन्यातील 118 विजयी फटक्यांपेक्षा एकमेकांवरील शाब्दिक हल्लाच लक्षवेधक ठरला. दुसऱ्या सेटमध्ये किर्गिऑसने 4-0 आघाडी गमावली. 4-4 बरोबरी असताना तो गेम पॉइंट सत्कारणी लावू शकला नाही. त्याने केलेल्या अत्यंत गलिच्छ भाषेतील शेरेबाजीची तक्रार लाइन जजनी केली. दुसरा सेट गमावल्यामुळे सितसिपास चिडला. त्याने रॅकेटने भिरकावून दिलेला चेंडू एका प्रेक्षकाच्या डोक्यालाच लागणार होता. किर्गिऑसने या वेळी सितसिपासला गुणांचा दंड करण्याची मागणी केली. ही अमान्य झाल्यावर त्याने आपल्याला मुख्य पंचांसह बोलायचे आहे असा आग्रह धरला. किर्गिऑसची मागणी मान्य झाली नाही. दरम्यान, टॉयलेट ब्रेक घेऊन परतलेल्या सितसिपासची चाहत्यांनी हुर्यो उडवली. प्रतिस्पर्धी एकमेकांवर शेरेबाजी करीत होते. किर्गिऑसने दोनदा तर थेट सितसिपासला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीच्या लढतीनंतर प्रेक्षकांकडे पाहून थुंकल्याबद्दल किर्गिऑसला दंड करण्यात आला होता. दरम्यान, दोघांना ताकीद देण्यात आली. वातावरण शांत होत गेले; पण खेळातील आक्रमकता कायम राहिली. अखेर सितसिपास पराभूत झाला.

किर्गिऑस-सितसिपास यांनी एकमेकांना असे डिवचले….
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=o8NotePDakk” column_width=”4″]

सेंटर कोर्टचे शतक

विम्बल्डन डायरी 2022 | अनेक अव्वल टेनिसपटूंनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाचा करंडक उंचावलेले सेंटर कोर्ट 100 वर्षांचे झाले. कोर्टची शताब्दी रविवारी अव्वल टेनिसपटूंच्या उपस्थितीत साजरी झाली. शंभर वर्षात कोर्टचे स्वरुप खूप बदलले. प्रेक्षक क्षमता 3,600 वरून 14,974 पर्यंत वाढली. कोर्ट आच्छादित करण्याची सुविधाही आली. सेंटर कोर्ट ही टेनिसपटूंची पंढरी आहे. हे कोर्ट खास आहे, असे पीट सॅम्प्रासने काही वर्षापूर्वी सांगितले होते.

The Centre Court Centenary Celebration
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=x2bnaJToMAw” column_width=”4″]

जायबंदी नदालची माघार

विम्बल्डन डायरी 2022 | दुखापतीमुळे रफाएल नदालने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली. नदालचा शुक्रवारी (8 जुलै 2022) उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसशी सामना होता. मात्र पोटाची दुखापत आणखी वाढल्यामुळे नदालने गुरुवारी (7 जुलै 2022) रात्री उशिराच स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे निकने अंतिम फेरीत थेट धडक मारली आहे.’या पोटाच्या दुखण्यामुळे मला नेहमीप्रमाणे सर्व्हिस करता येत नाही. एवढेच नव्हे, तर माझ्या नियमित वावरावरही मर्यादा आल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मला निर्णय घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत मला लढत जिंकता येणार नाही’, असे नदाल पत्रकार परिषदेत म्हणाला. 22 ग्रँडस्लॅम जेतेपदांचा धनी असणाऱ्या नदालने स्पॅनिश आणि इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये पत्रकार परिषद घेतली. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील लढतीआधी दुखापतीमुळे माघार घेण्याची नामुष्की नदालवर याआधी 2016 मध्ये होती. त्यावेळी डाव्या मनगटाच्या दुखापतीमुळे नदालने फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीआधी माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. जागतिक रँकिंगमध्ये 40 व्या क्रमांकावर असणारा निक किर्गिओस आता अंतिम फेरीत दाखल झाला आहे. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्क फिलिपॉसिसने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर विम्बल्डन अंतिम फेरीत दाखल झालेला निक हा दुसरा ऑस्ट्रेलियन ठरला आहे.

एकमेकांचे शत्रू झाले मित्र

विम्बल्डन डायरी 2022 | नोव्हाक जोकोविच आणि निक किर्गिओस या टेनिसपटूंमधून पूर्वी विस्तवही जात नव्हता. वाद, मतमतांतरे होती. मात्र, 10 जुलै 2022 रोजी हे दोघेही विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले. आता या दोघांमध्ये छान मैत्री झाली आहे. दोघे ‘इन्स्टा चॅट’वर संवाद साधत असतात. या दोघांमधील दुरावा यंदाच्या जानेवारीत मिटला. लसीकरण न झालेल्या जोकोविचला ऑस्ट्रेलिया सरकाने व्हिसा नाकारला. त्याला कठोर वागणूक दिली. याबद्दल किर्गिओसने जोकोविचला दिलेल्या वागणुकीवर टीका केली. बरे किर्गिओस हा ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू. तरीदेखील त्याने असे विधान केल्याने जोकोविच मागील वाद विसरला. ‘हो, तुम्हा पत्रकारांना हे विचित्र वाटेल, पण आम्ही इन्स्टा चॅट करतो. आता गेल्याच आठवड्यात जोकोविच मला म्हणाला होता की, तुला पुढील रविवारीच्या विम्बल्डन अंतिम फेरीत बघायला मला खूप आवडेल. बघा आता तसेच घडले’, अशी माहितीच किर्गिओसने दिली आहे. कोविचनेही मैत्री झाल्याचा निर्वाळा दिला आहे.

जोकोविचचे पुन्हा संतुलन ढळले

Seventh Wimbledon title for unbeatable Djokovic

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!