All SportsCricketsports news

रबाडा को गुस्सा क्यूं आता है…?

 

cricket-kagiso-rabada-temper
रबाडा म्हणतो, की मला लवकर संताप येत नाही 

 

Kheliyad | 6 June 2020
क्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कॅसिगो रबाडाला kagiso rabada | कोण ओळखत नाही? मैदानावर आक्रमक स्वभावामुळे अनेकदा तो अडचणीतही सापडला आहे. हा रबाडा म्हणतो, की मला लवकर संताप येत नाही, पण गोलंदाजांच्या पातळीवर जो उत्साह संचारतो, त्यातून माझी आक्रमकता समोर येते. यंदा इंग्लंडविरुद्धच्या प्रथमश्रेणी कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याला निलंबित करण्यात आले होते. गेल्या चोवीस महिन्यांत चार गुण वजा झाल्यामुळे त्याच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पंचवीस वर्षीय रबाडाने मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटची विकेट घेतल्यानंतर जल्लोष तो रूटच्या जवळ गेला होता.
रबाडाने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघासोबत इन्स्टाग्रामवर चॅट करताना शुक्रवारी सांगितले, ‘‘बऱ्याच जणांना वाटते, की मी फार लवकर स्वतःवरचं नियंत्रण गमावतो. पण मला असं अजिबात वाटत नाही. हा गोलंदाजीतला एक उत्साह असतो. उलट तुम्ही काही वाद पाहिले तर तो खेळातलाच एक भाग आहे. प्रत्येक वेगवान गोलंदाज तसं करतो’’
तो म्हणाला, ‘‘कोणताही वेगवान गोलंदाज फलंदाजाशी चांगलं वर्तन ठेवत नाही. त्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवर टीका करतात.’’
रबाडाच्या निलंबनानंतर दक्षिण आफ्रिका संघाने तो सामनाही गमावला होता आणि इंग्लंडने 3-1 ही मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत २०१८ मध्ये गैरवर्तणुकीमुळे रबाडाचे दोन गुण वजा झाले होते. त्यानंतर त्याने भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला बाद केल्यानंतर अपशब्द वापरले होते.
रबाडाने सांगितले, ‘‘जर विकेट घेतल्यानंतर तुम्ही जल्लोषही करता आणि सामना संपल्यानंतर त्याच्याशी हस्तांदोलनही करतात. त्याच्या कौशल्याचा तुम्ही सन्मानही करतात. बऱ्याचदा मी आक्रमक होत नाही, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा प्रयत्न करीत असतो. कधी कधी तुमची भावना तुम्हाला डिवचत असते. मला वाटते, की अशा वेळी मी बऱ्याचदा धोकादायक ठरतो. कारण मी विचार करण्याची पातळी गमावतो. मग सगळं काही आपोआप घडत जातं.’’
२०१७ मध्ये दिल्ली संघाशी जोडला गेल्यानंतर रबाडाने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावरच संघाने 2019 मध्ये सात वर्षांनंतर संघ प्लेऑफमध्ये खेळण्यात यशस्वी झाला होता. याच दरम्यान त्याने कोलकाता नाइड रायडर्सविरुद्ध उत्तम गोलंदाजी केली होती. प्लेऑफमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज होती आणि आंद्रे रसेल फलंदाजी करीत होता. रबाडाने अशा स्थितीत संघाला विजय मिळवून दिला होता.
तो म्हणाला, ‘‘मला आठवतंय, त्या वेळी मी सुपरओव्हरमध्ये गोलंदाजी करीत होतो. ते सत्र आमच्यासाठी खूप शानदार होतं.’’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!