All SportsCricketsports news
अबब! मंदीतही या खेळाडूची कमाई सर्वाधिक!
30 May 2020
करोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योग ठप्प पडले तरी यंदाच्या २०२० या वर्षात विराट कोहली Virat Kohli |ने २ कोटी ६० लाख डॉलरची कमाई केली. फोर्ब्स forbes |ने यंदाची जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत विराट एकमेव भारतीय खेळाडू आहे.
फोर्ब्स forbes |ने १०० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, ज्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट ६६ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी अडीच कोटी डॉलरसह तो १०० व्या, तर २०१८ मध्ये २ कोटी ४० लाख डॉलरसह ८३ व्या स्थानावर होता. कोरोना महामारीमुळे जगभराची अर्थव्यवस्था डळमळीत असताना कोहलीने प्रचार आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून यंदा २ कोटी ४० लाख डॉलरची कमाई केली आहे. या व्यतिरिक्त वेतन आणि पुरस्काराच्या रकमेतून २० लाख कमावले आहेत.
रॉजर फेडरर अव्वल स्थानी
दिग्गज टेनिसपटू आणि 20 ग्रँडस्लॅम पटकावणारा रॉजर फेडरर याची यंदाची कमाईही डोळे दिपविणारी आहे. त्याने सुमारे १०६.३ मिलियन डॉलर (800 कोटी रुपयांपेक्षा अधिक) कमाईसह 2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्वित्झर्लंडचा हा खेळाडू 1990 नंतर या यादीत अव्वल स्थानावर येणारा जगातील पहिलाच खेळाडू आहे. फोर्ब्स forbes |ने शुक्रवारी, 29 मे 2020 रोजी ही यादी जारी केली आहे. या यादीत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (105 मिलियन डॉलर), लियोनेल मेस्सी (104 मिलियन डॉलर), नेमार (95.5 मिलियन डॉलर) आणि अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (88.2 मिलियन डॉलर) यांचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये समावेश आहे.