या चार खेळाडूंची प्रेरणादायी जीवन कहाणी बदलून टाकेल तुमचे आयुष्य
संकटांना पराभूत करणारा जिम्नॅस्ट
संकटे कोणाला चुकली नाहीत…? काही जणांनी संकटांनाच संधी मानले; पण त्याच्या आयुष्यात अशा जीवघेण्या संकटांची मालिका सुरू झाली, की ही संकटेच त्याच्या प्रत्येक संधीत बाधा ठरत गेली. एकूणच काय, तर सगळ्या संधींवरच घाव घालणारी ही संकटे होती. मात्र, त्यावर मात करीत त्याने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. ही प्रेरणादायी जीवन कहाणी आहे किएरन बेहान (Kieran Behan) या इंग्लंडमधील जन्मलेल्या एका आयरिश जिम्नॅस्टची, ज्याने ऑलिम्पिकमध्ये मजल मारली.
Read More : किएरन बेहानची कहाणी
हात गमावल्यानंतरही सर्फिंग करणारी ही महिला खेळाडू कोण?
सागरी लाटांना आव्हान देणाऱ्या बेथानी हॅमिल्टनची (Bethany Hamilton) कहाणी जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील हवाई येथे जन्मलेली बेथानी एक उत्तम सर्फर आहे. वयाच्या वयाच्या १३ व्या वर्षी तिच्यावर एक भयंकर प्रसंग गुदरला. २००३ मध्ये मित्रासोबत सकाळी सर्फिंगचा आनंद लुटताना एका अजस्त्र शार्कने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शार्कने तिचा डावा हात खांद्यापासूनच विलग केला. मग पुढे काय झाले…?
Read More : बेथानी हॅमिल्टनची कहाणी
या खेळाडूने स्वीकारला इस्लाम धर्म
जगातला सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून मुहम्मद अलीचा लौकिक आहे. ‘दि ग्रेटेस्ट’ या नावानेही तो ओळखला जातो. मात्र, मुष्टियोद्धा बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. गुलामीविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्याला वडिलांकडून मिळाली. त्यामुळेच त्याने आपल्या कारकिर्दीत ४० गुलामांना मुक्त केले होते. त्याने गुलामीविरोधी वृत्तपत्राचे संपादनही केले. अलीने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला. त्यामागे काय कारण होते…? का झाला तो बंडखोर?
Read More : मुहम्मद अलीची कहाणी
या खेळाडूच्या नावावर आहेत सात विश्वविक्रम!
डॉक्टरांनी सांगितले, की त्याला आता पाण्यात अजिबात उतरू देऊ नका. त्याने डॉक्टरच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला, की मी पाण्यात जाणारच. पोहण्यासाठी हातांचा नाही, तर पायांचा उपयोग करीन. त्याने मार्क स्पिट्झचा ३६ वर्षांपूर्वीचा म्हणजे १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमधील सात सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला.
Read More : मायकेल फेल्प्सची कहाणी
Follow on Facebook Page kheliyad
Follow on Twitter @kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]
2 Comments