All SportsInspirational Sport storyOther sports

बेथानी हॅमिल्टन हिची थक्क करणारी कहाणी

सागरी लाटांना आव्हान देणारी बेथानी हॅमिल्टन हिची कहाणी जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील हवाई येथे जन्मलेली बेथानी एक उत्तम सर्फर आहे. सर्फर हा मुळातच आव्हानात्मक खेळ. उंचच उंच लाटांवर स्वार होत सर्फिंग करणे सोपे मुळीच नाही. प्रशांत महासागराच्या मध्यात असलेल्या हवाईत जन्मलेल्या बेथानीला सागराच्या लाटांचं भय ते काय! बेथानी हॅमिल्टन वयाच्या सातव्या वर्षापासून सर्फरवर स्वार होण्यास शिकली. मात्र वयाच्या १३ व्या वर्षी तिच्यावर एक भयंकर प्रसंग गुदरला. २००३ मध्ये मित्रासोबत सकाळी सर्फिंगचा आनंद लुटताना एका अजस्त्र शार्कने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शार्कने तिचा डावा हात खांद्यापासूनच विलग केला. तिच्या मित्राने प्रसंगावधान राखत तिला किनाऱ्यावर आणले. मात्र, या दरम्यान तिच्या शरीरातील साठ टक्के रक्त वाया गेले. या प्रसंगानंतरही बेथानी खचली नाही. तीन- चार आठवड्यांतच बेथानी सागरी लाटांना आव्हान देण्यासाठी पुन्हा सर्फिंग करू लागली.

बेथानी हॅमिल्टनसुरुवातीला तिने एक विशिष्ट प्रकारचा बोर्ड बनवून घेतला, जो मानकानुसार लांबीने मोठा आणि काहीसा जाड होता. त्यामुळे त्यावर ती उजव्या हाताने नियंत्रण राखू शकत होती. बेथानी हॅमिल्टन हिने कोणाच्याही मदतीशिवाय सर्फिंगवर पूर्ववत नियंत्रण मिळवले. आता बेथानी डाव्या हाताशिवाय सर्फिंग करू शकत होती. दहा जानेवारी २००४ मध्ये तिने पहिल्यांदा स्पर्धेत सहभाग घेतला. २००३ मध्ये एनएसएसए नॅशनल हेल्पिंग किड्स चॅम्पियन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत बेथानीने आपली योग्यता सिद्ध केली. त्यानंतर तिने २००४ मध्ये एएसपी वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतही आपल्या सर्फिंगची छाप सोडली. तिच्या या लढावू बाण्याचे जगभरात कौतुक झाले. अनेक टीव्ही शोमध्ये मुलाखत घेण्यात आली. तिच्यावर सोल सर्फर नावाचा चित्रपटही काढण्यात आला. या चित्रपटानंतर ती अनेकांची रोल मॉडेल झाली. अनेक पुरस्कारांनी तिला गौरविण्यातही आले. बेथानीच्या प्रेरणादायी प्रवासावर Soul Surfer: A True Story of Faith, Family, and Fighting to Get Back on the Board हे पुस्तकही लिहिले गेले. ‘हार्ट ऑफ सोल सर्फर’ नावाची डॉक्युमेंटरीनेही तिच्या लढावू बाण्याला सलाम केला आहे. शार्क हल्ल्यानंतर डावा हात गमावल्यानंतरही बेथानी सागरी लाटांना आव्हान देत आहे. विशेष म्हणजे गर्भवती असतानाही तिने एका हाताने सर्फिंग केली. तिच्या या धाडसापुढे जणू काही सागरही नतमस्तक झाला.

पूर्ण नाव  बेथानी मिलानी हॅमिल्टन
जन्म  8 फेब्रुवारी 1990, लिहुए, हवाई, अमेरिका
निवास कवाई (Kauai), हवाई, अमेरिका
उंची  5 फूट 11 इंच (180 सेंटिमीटर)
वजन  154 पाउंड (70 किलो)
खेळ  सर्फिंग
विवाह  18 ऑगस्ट 2013
पती  अ‍ॅडम डर्क्स
अपत्य  टोबायस (मुलगा)

बेथानीविषयी हेही नसे थोडके…

वयाच्या १३ व्या वर्षी शार्कच्या हल्ल्यात बेथानी हॅमिल्टनला डावा हात गमवावा लागला.

जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर काही महिन्यांतच बेथानी पुन्हा सर्फिंगकडे वळली

तिच्या या धाडसी वृत्तीवर जगभरात ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली.

तिच्या जीवनावर ‘सोल सर्फर’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.


या महिला खेळाडू गर्भवती असतानाही मैदानात उतरल्या…!

Follow on Facebook Page

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”80″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!