All SportsInspirational Sport story

यश काळे याची प्रेरणादायी यशोगाथा

अपयशाच्या रानातून, यशाच्या आनंदवनात! यश काळे याची प्रेरणादायी यशोगाथा

चार अपयशांनंतर यूपीएससीचं शिखर सर करीत वन विभागाच्या अधिकारी पदावर मजल मारणाऱ्या यश काळे याची ही प्रेरणादायी यशोगाथा. यश सध्या नांदेड विभागात प्रशिक्षणार्थी वन परिक्षेत्र अधिकारी असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो उपवन संरक्षण अधिकारी पदाची कार्यभार हाती घेईल.

[jnews_post_author ]

यूपीएससीचा रिझल्ट लागला… नातेवाइकांचा पहिला प्रश्न- ‘का हो, तुमच्या मुलाचं नाही झालं का?’ हा प्रश्न भयंकर वेदनादायी होता. या वयात सोबतचे मित्र संसार सुरू करतात, तेव्हा मी यशासाठी धडपडत होतो. त्यांचं पहिलं घर, गाडी झाली, तेव्हा मी दहा बाय दहाच्या खोलीत अकरावी, बारावीची पुस्तकं चाळत होतो. हा प्रचंड ‘सोशल प्रेशर’ होता. मला तर त्या वेळेस काही सुचत नव्हतं. मी घरच्यांशीही संपर्कही साधत नव्हतो. फक्त एक मेसेज टाकायचो, ‘डीड नॉट क्लिअर, आय ॲम फाइन.’ चार अपयशांनंतर यूपीएससीचं शिखर सर करीत वन विभागाच्या अधिकारी पदावर मजल मारणाऱ्या यश काळे याची ही प्रेरणादायी यशोगाथा. यश सध्या नांदेड विभागात प्रशिक्षणार्थी वन परिक्षेत्र अधिकारी असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो उपवन संरक्षण अधिकारी पदाची कार्यभार हाती घेईल.

यश काळे याचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण नाशिकच्या सिल्व्हर ओक, पोदार इंटरनॅशनल स्कूल, फ्रवशी अॅकॅडमी असं शाळा बदलत बदलत झालं. वडील विक्रीकर विभागात ॲडिशनल कमिश्नर (जीएसटी). आर्थिक स्थिती उत्तम. यशचं पहिलं स्वप्न आयआयटी होतं. मात्र, मार्क कमी पडल्याने आयआयटी हुकलं. अखेर त्याने पुण्याच्या व्हीआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. यात त्याची कामगिरी उत्तमच राहिली. पहिल्या तीन क्रमांकांत ‘यश’ मिळत गेलं. नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन कौशल्याची रुजवात इथेच झाली. दोन वर्षे रोबोटिक्सच्या टीममध्येही राहिला. कॉलेजच्या अखेरच्या वर्षात ‘यूआर’ म्हणून निवडही झाली. ‘टेडेक्स’च्या व्हीआयटीचा कन्व्हिनियर आणि शेवटच्या वर्षी अध्यक्ष झाला. नेतृत्वगुण, संघव्यवस्थापन अशा गोष्टींमध्ये आपण छान काम करू शकतो, याची जाणीव त्याला झाली. नंतर त्याला ‘एमबीए’चे वेध लागले. त्याला अनेक जण म्हणायचे, ‘वडिलांचा वारसा पुढे नेत यूपीएससी कर!’ यशच्या डोक्यात मात्र दुसरंच होतं. यूपीएससी त्याच्या प्राधान्यक्रमावर कधीच नव्हतं. दोन वर्षे एमबीए त्याने केलं; पण अहमदाबाद, बेंगलुरू, कोलकात्यातील अपेक्षित आयआएम त्याला मिळू शकलं नाही. त्याने ‘एमबीए’च्या दोनदा परीक्षा दिल्या. एकदा कॉलेजमध्ये असताना आणि एकदा नोकरी करीत असताना. मात्र, अपेक्षित आयआयएम न मिळाल्यानं त्याने तो विचार सोडून दिला. थोडक्यात म्हणजे आयआयटीनंतर ‘आयआयएम’चं स्वप्न भंगलं. 

यूपीएससीचे वेध…

इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर यशला पुण्यातील झेडएक्स कंपनीत डेटा ॲनालिटिक्समध्ये जॉब मिळाला. कंपनी चांगली होती. कॅम्पसही छान होता. रात्रभर काम करायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रवास. पण त्याच्या मनात ‘का’ हा सतत जागा असायचा. एवढं करूनही परिणाम काय, असा प्रश्न तो स्वत:लाच विचारायचा. उत्तर मात्र समाधानकारक मिळत नव्हतं. फक्त पैसा कमावणे एवढंच माझं लक्ष्य नाही. असं काही तरी काम करायचं, ज्याने लोकांवर प्रभाव पडेल. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल. यशची यशाची व्याख्या व्यापक होती. तो म्हणायचा, मी या कंपनीतून जेव्हा निवृत्त होईन, तेव्हा तुमचं आउटपुट काय, तर एक रिपोर्ट किंवा एक मीटिंग! याच दरम्यान यश ‘वायएलएसी’ (यंग लीडर्स फॉर ॲक्टिव्ह सिटिझनशिप) या उपक्रमात सहभाग घेतला. त्यात त्याला नोकरीच्या संधी काय असतात, याची माहिती मिळाली, त्यासोबतच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधीही मिळाली. तेथे प्रत्येक टीमला एका खासदारासोबत जोडलं आणि एखाद्या सोशल इश्यूवर काम करून त्याचा एक रिपोर्ट बनवून द्यायचा असतो. यशच्या टीमने आंध्र प्रदेशचे खासदार जयदेव गौडा यांच्यासाठी शेतकरी आत्महत्यांवर एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. भारतातील आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा फोकस अशा संदर्भात हा रिपोर्ट होता. इथे प्रशासन आणि समाजकारण यात यशला रुची निर्माण झाली. इथे यशच्या डोक्यात यूपीएससीची पहिली ठिणगी पडली. त्याने ठरवलं, एक वर्ष जॉब करून नंतर यूपीएससीची तयारी करायची. एक चांगला कॉर्पोरेटचा जॉब सोडून यश आता ‘यूपीएससी’च्या सागरी लाटांचा सामना करणार होता.

यूपीएससीच्या प्रवासातले धक्के…

यूपीएससीच्या तयारीसाठी यशने दिल्ली गाठली. सुरुवातीला भारी वाटलं. दणकून अभ्यास सुरू होता. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला; पण मुख्य परीक्षा देताना त्याला जाणवलं, की हे तितकं सोपं नाही. मोठ्या ‘मार्जिन’ने त्याला अपयश आलं. यूपीएससीचं एक अपयश म्हणजे एक वर्ष वाया जाणं. त्याला प्रश्न पडू लागले, आपण इथं आलो ती चूक तर नाही ना केली?  ही भावना खूप धोकादायक असते. आपसूकच त्याचं बोलणंचालणं कमी झालं. पुढच्या प्रयत्नासाठी एक वर्ष मिळालं. चांगला अभ्यास झाला; पण पुन्हा एक संकट उभं ठाकलं. करोनाच्या महामारीने हाहाकार माजवला. यूपीएससीबरोबर आता करोनाचं संकट. त्यामुळे दिल्लीतून तो घरी नाशिकमध्ये परतला. एकटं अभ्यास करताना त्याला जाणवलं, की आपण इतरांच्या तुलनेत कुठे आहोत? त्याने यूपीएससीचे आणखी दोन प्रयत्न दिले. प्रत्येक वेळेस सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेत अपयशी व्हायचा. याच दरम्यान त्याला वन विभागाच्या परीक्षेची माहिती मिळाली. त्या वेळी त्याला समजलं, की आपण ही परीक्षाही देऊ शकतो. यूपीएससीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची पहिली परीक्षा समान असते. दुसरी परीक्षा मात्र वनसेवेची असते. त्याने ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. हा त्याचा यूपीएससीचा तिसरा, तर वन विभागाच्या परीक्षेचा पहिला प्रयत्न. अपयश पदरी पडलं. त्यानंतर वनसेवा परीक्षेचा दुसरा प्रयत्न, तर यूपीएससीचा चौथा प्रयत्न दिला. रिझल्टपर्यंत तीच धाकधूक, जी पहिल्या प्रयत्नातही अनुभवली होती. रिझल्ट लागला आणि सुखद धक्का बसला. यश २२ व्या रँकने उत्तीर्ण, तर महाराष्ट्रातून अव्वल आला. आनंदाला पारावर उरला नव्हता.

‘प्लॅन बी’मुळे निर्धास्त

एक उमेदवार जेव्हा यूपीएससीची तयारी करतो तेव्हा तो एकटा त्यात गुंतलेला नसतो. त्याच्यासोबत त्याचं कुटुंब गुंतलेलं असतं. छोट्या गावातला उमेदवार असेल तर अख्ख गाव त्याला आधीच ‘कलेक्टर’ म्हणू लागतं; पण जेव्हा अपयश येतं तेव्हा त्यातून सावरणं भयंकर कठीण होतं. तुम्हाला नातेवाईक विचारू लागतात, तुमच्या घरच्यांना विचारू लागतात- ‘का हो तुमच्या मुलाचं नाही झालं का?’ प्रचंड ‘सोशल प्रेशर’ असतं. हा तणाव नियंत्रित करणं हीच मोठी कसोटी असते. मी ठरवलं होतं, की यूपीएससी जर नाही केली तर माझा ‘प्लॅन बी’ तयार होता. हातात जी डिग्री आहे त्याच्या बळावर नोकरी मिळवणे आवश्यक असते. मला मात्र नोकरीचं टेन्शन अजिबातच नव्हतं. कारण मी आधी जेथे नोकरी करीत होतो तिथल्या मॅनेजरने मला सांगितलं होतं, की ‘तुला वाटेल तेव्हा तू परत ये.’ त्यामुळे माझ्याकडे अपयशाचा एक परवाना होता! दुसरं म्हणजे वडिलांचा पाठिंबा. काहीही नाही झालं तरी घरचं आर्थिक पाठबळ भक्कम होतं. म्हणजे घरी परतलं तरी पोटापाण्याचा प्रश्न भेडसावणार नव्हता. थोडक्यात म्हणजे यशने मागचे दोर कापलेले नव्हते.

तणावावर अशी केली मात…

यश म्हणतो, “मला जेव्हा अपयश यायचं तेव्हा पहिल्या दिवशी मी घरी संपर्कच करायचो नाही. फक्त एक मेसेज टाकायचो…“डीड नॉट क्लिअर आय ॲम फाइन!’ त्यामुळे घरच्यांना एक माहिती असायचं, की याने रिझल्ट पाहिलाय.” इतर मित्र यशला चीअरअप करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, तेही त्याला त्रासदायक वाटायचं. त्यामुळे यश एकटं राहणं अधिक पसंत करायचा. किमान एक दिवस तरी मी रूमबाहेर पडत नव्हतो. तो एक दिवस झाला, की दुसऱ्या दिवशी पुन्हा नॉर्मल. मित्रांमध्ये मिसळायचा. यश हे काही ठरवून करीत नव्हता. ते आपसूकच व्हायचं. एकटेपणा त्याला प्रगल्भतेकडे घेऊन जायचा. नंतर तो स्वत:लाच समजून सांगायचा, “ठीक आहे, आपल्यापेक्षा त्याचं प्रीपरेशन चांगलं होतं.” यश यशस्वी मित्रांशी संवाद साधायचा. काय चुकलं, कुठे चुकलं यावर चर्चा करायचे. काय करायला हवं, यावरही उत्तर शोधायचे. गंमत म्हणजे मित्र त्याला आत्मविश्वास द्यायचे आणि तोही त्यांना द्यायचा! मात्र घरून कधीच प्रेशर आलं नाही. ‘का नाही झालं आणि आता कधी होणार,’ असे प्रश्न कधीच विचारले गेले नाही. कदाचित या यशामागचे हेही एक रहस्य होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

यश काळे याची प्रेरणादायी यशोगाथा

यशने वन विभागातील प्रशिक्षण कालावधीतही आपली छाप सोडली. प्रशिक्षण कालावधीत त्याचं ग्रॅज्युएशन झालं, ज्याला कन्व्होकेशन म्हंटलं जातं. त्यात त्याने संवादकौशल्यात उत्तम यश मिळवले. त्यासाठी त्याला ‘स्पिरिट ऑफ १९८२’ पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला. या वेळी आईवडील सोबत होते. हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे, असं सांगताना भावनिक होतो. प्रशिक्षण काळातच त्याला ताडोबा अभयारण्यात वाघ दिसला. याचि देही याचि डोळा वाघ पाहण्याचा आनंदही तो आवर्जून नमूद करतो. अंदमानमध्ये जॉलीबॉय बेटावरील क्षणही त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरले. तिथल्या नितळ, निर्मळ पाण्याविषयी तो भरभरून बोलतो. लोक निसर्ग पाहण्यासाठी सुट्टी काढतात, आम्ही मात्र निसर्गाच्या सान्निध्यात पेड व्हेकेशनवर असतो. इथल्या ‘व्हॉइसलेस’ आणि ‘व्होटलेस’साठी धडपडत असतो.

विल्मा रुडॉल्फ हिची प्रेरणादायी कहाणी

Visit us

[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”68,69″ sort_by=”oldest”]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!