Champions Trophy तून का वगळले सिराज मोहम्मदला?
चॅम्पियन्स ट्रॉफीतून का वगळले वेगवान गोलंदाज सिराज मोहम्मदला? काय कारण दिले कर्णधार रोहित शर्माने?

Champions Trophy तून का वगळले सिराज मोहम्मदला?
चॅम्पियन्स ट्रॉफीतून का वगळले वेगवान गोलंदाज सिराज मोहम्मदला? काय कारण दिले कर्णधार रोहित शर्माने?
19 January 2025
चॅम्पियन्स करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत भारताचा भर फिरकी गोलंदाजांवर असेल. त्याचबरोबर मोहम्मद सिराज जुन्या चेंडूवर प्रभावी ठरत नाही, त्यामुळे त्याला चॅम्पियन्स स्पर्धेच्या संघात स्थान मिळाले नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी सांगितले.
चॅम्पियन्स स्पर्धेतील भारताच्या सर्व लढती दुबईत होणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा फिरकी गोलंदाजांना पसंती देण्याची योजना यशस्वी ठरली होती. हेच चॅम्पियन्स स्पर्धेच्या वेळी अमलात आणण्याचे ठरले. त्यामुळेच कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरची निवड झाली आहे.
‘आम्ही संघ निवड करताना डावाच्या सुरुवातीस; तसेच जुन्या चेंडूवरही प्रभावी ठरू शकतील, अशा गोलंदाजांना पसंती दिली आहे. जसप्रीत बुमराह या स्पर्धेस मुकण्याची शक्यता लक्षात घेऊनच संघनिवड केली आहे. डावाच्या अंतिम षटकांत अर्शदीपसिंग चांगली कामगिरी करीत आहे. नेमक्या याच कालावधीत सिराज कमी प्रभावी ठरत आहे. आम्ही याबाबत दीर्घ चर्चा केली. संघात तीनच वेगवान गोलंदाज असतील, असे आम्ही ठरवले होते. आम्ही अष्टपैलूंना पसंती देण्याचेही ठरवले होते. त्यामुळे सिराजला संघाबाहेर रहावे लागले,’ असे रोहितने स्पष्ट केले.
आम्ही चॅम्पियन्स स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाजांची निवड करताना डावाच्या सुरुवातीस, मधल्या टप्प्यात; तसेच अखेरच्या षटकांत प्रभावी ठरतील, अशाच गोलंदाजांची निवड केली आहे. निवडलेले तिन्ही गोलंदाज यशस्वी होतील, असा विश्वास आहे,’ असे रोहित म्हणाला. त्याच वेळी त्याने अर्शदीप फारशा वन-डे खेळला नसला, तरी त्याला टी-२०चा चांगला अनुभव आहे. त्यात त्याने प्रभावी गोलंदाजीही केली आहे. त्यामुळे तो वन-डेच्या दडपणास सहज सामोरा जाऊ शकेल. शमी वन-डे क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे,’ असेही रोहित म्हणाला.
अजित आगरकर काय म्हणाले?
- नेतृत्वाचे गुण असलेल्या खेळाडूचाच विचार कर्णधारपदासाठी होत असतो. तोच विचार करून शुभमन गिल उपकर्णधार
- देशांतर्गत स्पर्धेत राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडू नेतृत्व करीत आहेत; पण नेतृत्वाचे कौशल्य असलेल्यांनाच आम्ही पसंती देतो
- करुण नायरच्या कामगिरीबाबत चर्चा झाली; मात्र त्याच्यासाठी तूर्तास तरी संघात जागा नाही
- निवड केलेल्या सर्वच फलंदाजांची सरासरी ४०पेक्षा जास्त. संघ १५ जणांचाच असतो, हे लक्षात घ्यावे लागते