माकडे माणसांवर हल्ला का करतात?
माकडे माणसांवर हल्ला का करतात? वन्यजीव पर्यटन हे प्राण्यांबद्दलच्या आपल्या आकर्षणावर आधारित आहे. त्यातल्या त्यात माकडांचं पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची रचना मानवासारखीच आहे. म्हणजे मानवासारखा चेहरा, कौटुंबिक हालचाली आणि त्यांच्या नाना कला हे पाहणं आनंददायक असतं. मात्र, अलीकडे वेगळ्याच कहाण्या जन्मास आल्या आहेत, ज्यात माकडांचं भयंकर चित्रण केलं आहे. ‘माकडांचे हल्ले’, ‘शैतान माकड’ किंवा अगदी ‘चेहरा फाडणे, हाडे कापणारा माकड’ अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये सामान्य झाल्या आहेत. यावरून प्रश्न पडतो, की आपले पूर्वज आपल्याच विरोधात गेले आहेत का?
अलीकडील माकडांच्या हल्ल्यांमध्ये विविध देशांतील विविध प्रजातींचा समावेश आहे. थायलंडमध्ये लांबलचक शेपटीवाले मकाक आणि ‘डुक्करशेपटी’चे मकाक, जपानमध्ये जपानी मकाक आणि भारतात हनुमान लंगूर या प्रजातींचा समावेश आहे.
यापैकी बहुतांश प्रजाती ‘मकाक’ आहेत. हा माकडांचा एक वैविध्यपूर्ण समूह आहे. मात्र, सर्वच मकाक मनमिळावू, हुशार, तुलनेने मोठे (4 ते 9 किलोदरम्यान) आणि जमिनीवर प्रवास करण्यास आरामदायक असतात. त्यांचा आहार लवचिक असला तरी ते फळांना प्राधान्य देतात. त्यांच्या गालाजवळ पाऊचदेखील आहेत, जे त्यांना त्वरित अन्न गोळा करण्यास आणि खाण्यासाठी सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास सहाय्यभूत ठरतात.
अधिक आत्मीयता
माकडे माणसांवर हल्ला का करतात, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे माकडांबद्दल मानवाची अति आत्मीयता हे महत्त्वाचं कारण आहे. प्रजाती किंवा स्थानाकडे दुर्लक्ष करून, माकड चावणे आणि हल्ल्यांचा एक प्रमुख घटक म्हणजे त्यांच्याबद्दल ‘अति आत्मीयता’ असल्याचं मत प्राणी अभ्यासकांचं आहे. ही अशी प्रक्रिया आहे जी प्राणी संशोधकांद्वारे प्राण्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे संशोधक त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण नोंद करू शकतात. मात्र, हे करताना जनावरांना नकळत त्याची सवय होऊ शकते. शहरातील उद्यानांमधील खारूताई, ज्यांना तळहातावर बसण्याचे व्यसनच जडले आहे. अर्थात, हे एक उदाहरण आहे. इंग्लंडमधील शहरी कोल्हे, उत्तर अमेरिकेतील अस्वल आणि उष्ण कटिबंधातील अनेक भागांमध्ये माकडांचा समावेश आहे.
जेव्हा प्राण्यांची मानवाबद्दलची भीती वाटेनाशी होते तेव्हा ते उपद्रवी होतात. त्यांना त्याची सवय जडते. मानवाच्या सवयी जडण्याच्या सर्वच घटनांमध्ये मुख्य कारण मानवी भोजन आहे. मानव जे खातो ते वन्यजीवांसाठी अप्रतिरोधक आहे. ते पोषक तत्त्वांनी भरपूर असते आणि पचायला सोपे आहे. हे मानवी अन्न कचरापेटीतून, फेकलेल्या पिशव्यांमधून किंवा थेट लोकांकडून उपलब्ध होते.
पर्यावरणीय दृष्टिकोनातून, प्राण्यांना या उच्च-गुणवत्तेच्या संसाधनाचा लाभ घेणे सहज सोपे जाते. म्हणूनच प्राणी त्यांची भीती आणि नैसर्गिक वर्तनानुसार समायोजित करतात, यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
माकडे माणसांवर हल्ला का करतात, याचं उत्तर मानवी अन्नपदार्थांमध्ये आहे. पर्यटक माकडांना खाद्यपदार्थ टाकतात. त्यातून त्यांच्याशी अतिजवळीक होणे हेच माकडांच्या हल्ल्याचे मुख्य कारण आहे. याचा अर्थ असा नाही, की माकडाने चावलेली किंवा धमकावलेली प्रत्येक व्यक्ती त्यांना खायला घालण्यासाठी किंवा छेडण्यासाठी दोषी आहे.
माकडे माणसांवर हल्ला का करतात?
माकडे खूप हुशार असतात. त्यांच्याकडे दीर्घ स्मृती असतात आणि ते एकमेकांकडून शिकतात. माकडांच्या अनेक समूहांना मानवी खाद्यपदार्थांची इतकी सवय जडली आहे, की ते मिळविण्यासाठी ते पर्यटकांना त्रास देण्यास शिकले आहेत. काही माकडे यात इतकी पारंगत झाली आहेत, की पर्यटकांच्या मौल्यवान वस्तू कोणत्या आहेत, हेही त्यांना ठाऊक आहे. मानवी अन्नासाठी अशा वस्तू ते हिसकावतात. ते तुमचा मोबाइल फोन चोरतील, पण तुम्ही त्यांच्यासमोर काही खाद्यपदार्थ टाकले तर ते तुमचा फोन सोडतील आणि खाद्यपदार्थांवर ताव मारतील. पर्यटनस्थळांवर माकडांच्या हल्ल्यातील आणखी महत्त्वाचा घटक म्हणजे प्राण्यांची देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव आणि स्वर याविषयीचे अज्ञान. माकडेदेखील हल्ला करण्यापूर्वी इशारा देतात. मात्र, माकडाच्या वर्तनाचा अनुभव नसलेले लोक अनेकदा चेहऱ्यावरील मैत्रीपूर्ण हावभावाचा चुकीचा अर्थ लावतात. यामुळे माकडे माणसांवर हल्ला करू शकतात. धोकादायक चकमकी होऊ शकतात.
पर्यटकांसाठी सल्ला
वन्यजीव पर्यटकांकडून प्रत्येक प्रजातीची विशिष्ट अभिव्यक्ती आणि शारीरिक मुद्रा समजून घेण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मात्र, काही गोष्टी पर्यटकांनी समजून घ्यायला हव्या. ही अधिक सुरक्षित आणि जबाबदार पर्यटकाची खूण आहे. मग भलेही ती वानरे कोणत्याही प्रजातीची असावी.
माकडांपासून लांब राहा
इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर, पर्यावरण संस्थांच्या नेटवर्कनुसार, प्राण्यांपासून सात मीटर (२३ फूट) अंतर राखण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे जनावरांना मानवाचा धोका वाटत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे रोगराई पसरण्याचा धोकाही कमी होतो. माकडांच्या थेट डोळ्यात पाहणे किंवा त्यांच्याशी संपर्क करण्याचा, दाद दाखवण्याचे प्रकार प्रकर्षाने टाळावे; अन्यथा माकडे आक्रमक होऊ शकतील.
मानवाला माकडांचा धोका असेल तर तो ओळखण्यासाठी काही संकेत आहेत. साधारणपणे दात विचकणे (काही वेळा जांभईसह), डोके झुकवून थेट पाहणे आणि हाताने जमिन थापणे किंवा हाताचे हलकेसे झटके देणे आदी इशारे माकडे देतात. असे दिसले तर मानवाने माघारी फिरावे.
माकडांना खाद्यपदार्थ देणे टाळावे
वन्यजीव पर्यटन जागतिक अर्थव्यवस्थेत दरवर्षी १०० बिलियन डॉलरपेक्षा जास्त निधीची तरतूद आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यामुळे वन्यजीव आणि त्यांच्या सभोवताल राहणाऱ्या मानवी समुदायांना अनेक फायदे मिळू शकतात. मात्र, आपण सर्वांनी जबाबदार पर्यटक असले पाहिजे.
- भारतात माकडांच्या 11 प्रजाती
- लाल तोंडाचा माकड बहुसंख्येने आढळतो
- लाल तोंडाच्या माकडाचं शास्त्रीय नाव मॅकाका रेडिएटा
- मराठीत त्याला टोपी माकड असं म्हणतात
- महाराष्ट्रात मुंबई, पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, सांगली या भागात ही माकडं आढळतात
का म्हणतात टोपी माकड?
लाल माकडांचं शास्त्रीय नाव मॅकाका रेडिएटा असं, तर मराठीत टोपी माकड असं स्थानिक नाव आहे. डोक्यावर काळसर रंगाचे केस आणि या केसांची रचना टोपी ठेवल्यासारखी असते. म्हणून त्यांना टोपी माकड असं म्हणतात.
#monkey #monkeyandman #monkeyattack, monkeyspecies #indiamonkey #asianmonkey #टोपीमाकड #माकडांचंशास्त्रीयनाव #मॅकाका_रेडिएटा
शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- Twitter : @kheliyad
- Linkedin : @maheshpathade03
- WhatsApp Channel: @kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com