डिजिटल अंधकार युग म्हणजे काय?
डिजिटल अंधकार युग (Digital Dark Age) म्हणजे आपण साठविलेल्या डेटाची हानी होणे. मग प्रश्न हा आहे, की आपले फोटो, व्हिडीओ आणि इतर डेटा कसा सुरक्षित ठेवायचा?
आपण सोशल मीडियासोबतच मोठे होतोय… सोशल मीडिया इतका अंगवळणी पडलाय, की गेल्या काही दशकांतील स्मृती जेवढ्या लक्षात नाहीत, त्यापेक्षा किती तरी अधिक फोटो आपण घेतले असतील. एकीकडे मोबाइल फोन अचानक कॅमेराही बनला, तर दुसरीकडे सोशल मीडिया सामूहिक फोटो अल्बममध्ये रूपांतरित झाला. यात किती तरी आठवणी असतील! या आठवणी नेहमीच ऑनलाइन राहतील, असं आपल्याला वाटतं.
2019 मध्ये ‘माय स्पेस’ने (MySpace) 12 वर्षांपूर्वीचं संगीत आणि फोटो गमावले. यामुळे एक कोटी 40 लाखांपेक्षा अधिक कलाकार आणि पाच कोटी ट्रॅक प्रभावित झाले. जर इन्स्टाग्राम किंवा पूर्ण इंटरनेटच अचानक गायब झालं तर काय होईल? तुम्ही तुमच्या मौल्यवान आठवणींपर्यंत पोहोचू शकाल? ही कल्पनाच शहारे आणणारी आहे.
आपण एका ‘डिजिटल अंधकार युगा’त (Digital Dark Age) राहतोय. डिजिटल अंधकार युग… हे शब्द माझे नाहीत, तर सूचना आणि संचारतज्ज्ञ टेरी कुनी (Terry Kuny) यांचे आहेत.
1997 मध्ये कुनी यांनी गंभीर इशारा दिला होता, की आपण अशा युगात जात आहोत, जिथं ‘आज आपण जे काही जाणतोय, जे काही कोड रूपाने आणि इलेक्ट्रॉनिक रूपाने लिहिलंय ते कायमचं गमावणार आहोत.’
तार्किकदृष्ट्या त्यांनी काही उदाहरणंही दिली. ते म्हणतात, की मध्य युगात जसं बौद्ध भिक्खूंनी पुस्तकांना सुरक्षित केलं, तसं आजच्या डिजिटल वस्तूंना संरक्षित करायला हवं; अन्यथा येणारी पिढी आपल्या वर्तमानातील जीवनाविषयीच्या ज्ञानापासून वंचित राहतील.
लोकांना वाटतं, की ‘इंटरनेट कायमसाठी आहे.’ मात्र, फोटो आणि व्हिडीओसारख्या कलाकृती वास्तविकपणे अस्थिर आहेत. त्या स्थायी नाहीत. आपण ‘लिंकरोट’चा सामना केलाच असेल, जो एखाद्या महत्त्वाच्या स्रोताचा ‘यूआरएल’ (URL) वेबपेजवर घेऊन जातो. कालौघात हार्डवेअर अप्रचलित, खराब आणि उन्नत अर्थात अपडेट होत जातो. बिट-रोट (Bit-rot- ज्याला डेटा किंवा फाइल रोट- file rot किंवा डेटा डिग्रेडेशनही-data degradation म्हंटलं जातं.) याच अर्थ, आपल्याकडे मागच्या डेटापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही भौतिक साधन नाही.
बहुतांश लोकांना आधीच या तंत्राचा आणि सॉफ्टवेअरचा (software) उपयोग करणे कठीण जातेय. यापैकी काही लोक आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत आहेत. बॅकवर्ड अनुकूलतेच्या अभावासोबतच (जेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर जुन्या आवृत्तीला साथ देऊ शकत नाही) भविष्यातील पिढ्या अप्रचलित स्वरूपांमध्ये साठवलेल्या जुन्या डेटापर्यंत कसे पोहोचतील?
डिजिटल अंधकार युग
आम्ही डेटाच्या स्वामित्वशी संबंधित मुद्द्यांबाबत बोलत आहोत, जे विशेषत खासगी संस्थांद्वारे नियंत्रित केले जातात. कुटुंबातील मृत झालेल्या नातेवाइकांच्या सोशल मीडियातील खात्यांपर्यंत पोहोचण्यात कायद्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारे, जर ‘स्पाटफाई’ किंवा नेटफ्लिक्स उद्या बंद झाले तर आपल्याकडून रोजचा आधार असलेल्या स्ट्रीम होणाऱ्या कोणत्याही गीत किंवा चित्रपटाची मालकी तुमच्याकडे राहणार नाही. यालाच डिजिटल अंधकार युग म्हणतात. यावर वेळीच उपाय शोधले नाहीत तर हे युग आपल्यापासून फार लांब नाही…
Visit Us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com
#डिजिटलअंधकारयुग #DigitalDarkAge #डेटाचीहानी #MySpace #यूआरएल इंटरनेट #datadegradationsoftware
Jagmohan to Jagjit singh (part 7) : या आघाताने गझल गायक जगजीत सिंग कोलमडले
[jnews_block_8 first_title=”हेही वाचा” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]