All Sportssciencesports news

‘क्लिक फसवणूक’ (Click Fraud) काय असते? ती कशी रोखता येईल?

सध्या सायबर गुन्हेगार ‘क्लिक’ (Click)च्या वाढत्या बाजारात ‘क्लिक फसवणूक’ (Click Fraud) करण्याची शक्यता अधिक आहे. यात सामान्य इंटरनेट वापरकर्त्यापासून...

‘क्लिक फसवणूक’ (Click Fraud) काय असते? ती कशी रोखता येईल?

सध्या सायबर गुन्हेगार ‘क्लिक’ (Click)च्या वाढत्या बाजारात ‘क्लिक फसवणूक’ (Click Fraud) करण्याची शक्यता अधिक आहे. यात सामान्य इंटरनेट वापरकर्त्यापासून…

मोनिका व्हिटी, मोनाश यूनिवर्सिटी

मेलबर्न : इंटरनेटच्या जगात सगळा खेळ ‘क्लिक’ (Click)चा आहे. जेवढे जास्त लोक एखाद्या वेबसाइट, सोशल मीडियावर पोस्ट किंवा जाहिरातीवर क्लिक करतात, तेवढी जास्त त्या सामग्रीची कमाई होते. मात्र, सध्या सायबर गुन्हेगार ‘क्लिक’ (Click)च्या वाढत्या बाजारात ‘क्लिक फसवणूक’ (Click Fraud) करण्याची शक्यता अधिक आहे. यात सामान्य इंटरनेट वापरकर्त्यापासून (यूजर) मोठमोठ्या संस्थांपर्यंत जो ही सामग्री शेअर करेल किंवा आपले उत्पादन विकण्यासाठी वेबचा उपयोग करेल, तो असुरक्षित होऊ शकतो.

वस्तुत: ‘क्लिक फसवणूक’ (Click Fraud) आहे काय? ती रोखण्यासाठी काय करता येईल?

‘क्लिक फसवणूक’ (Click Fraud) म्हणजे काय?

click fraud

जेव्हा एखादी व्यक्ती ऑनलाइन क्लिक चालविण्यासाठी मानवी कामगारांचे ‘बॉट्स’ किंवा ‘फार्म’चे नेटवर्क तयार करते, तेव्हा ‘क्लिक फसवणूक’ (Click Fraud) होते.

धोका देणारे नेहमीच आपल्या वेबसाइटवर जाहिरात किंवा ‘लाइक’वर फसवणुकीने ‘क्लिक’ मिळवण्यासाठी स्वयंचलित बोट्स (Bots) किंवा क्लिक ‘फार्म’ (Farm)चा उपयोग करतात.

ते वेबसाइट बनवतात आणि व्यापाऱ्यांना एका निश्चित किमतीवर आपल्या साइटवर जाहिरात देण्यासाठी आमंत्रित करतात. जर जाहिरातदार प्रतिक्लिकवर पैसे देणार असतील तर तो फसव्या आपल्या व्यवसायासाठी (जो नेहमीच बनावट व्यवसाय असतो) पैसे कमावेल आणि ‘ट्रॅफिक’ला आपल्या वेबसाइटवर वळवेल.

वैकल्पिकरीत्या, एक वास्तविक व्यवसाय त्यांच्या स्वतःच्या जाहिराती तयार करू शकतो आणि त्या वेगवेगळ्या वेबसाइटवर ठेवू शकतो. सायबर गुन्हेगार या जाहिरातींवर ‘क्लिक’ (Click)चा पाऊस पाडतात, ज्याचा वास्तविक व्यवसायांना अधिकचा भुर्दंड पडतो. कारण ते प्रतिक्लिकक पैसे मोजत असतात.

इथे असाही विचार असू शकतो, की गुन्हेगाराचा स्वत:चा एक मूळ व्यवसाय आहे आणि तो आशा करतो, की जाहिरातीचा खर्च इतका महाग होईल की तो त्याच्या प्रतिस्पर्धी व्यवसायाला अडचणीत आणू शकेल.
एक पद्धत अशीही आहे, की गुन्हेगार एक बनावट वेबसाइट बनवू शकतो, ज्यावर तो वापरकर्त्यांच्या क्लिकची आशा करू शकतो.

कारण वेबसाइटमध्ये एक दुर्भावनापूर्ण लिंक आहे, जी वापरकर्त्याच्या संगणकावर मालवेअर डाउनलोड करेल किंवा ते वापरकर्त्याला इतर मार्गाने फसवतील अशी आशा करतात (उदाहरणार्थ, अशा सेवेसाठी किंवा आयटमसाठी आगाऊ शुल्क भरले जाते जे अस्तित्वातच नाही.)

वेबसाइटवर ‘ट्रॅफिक’ वाढवून त्यांची ऑनलाइन शोध रँकिंगमध्ये सर्वांत वरचं स्थान मिळते.

तुम्ही ‘क्लिक’ फसवणूक कशी रोखू शकतात?

जाहिरात फसवणूक सॉफ्टवेअर ‘क्लिक’ फसवणुकीपासून होणारे नुकसान रोखण्यात वाकबगार ठरू शकतात. व्यवसाय विशेष जाहिरात फसवणुकीचा शोध लावणारे आणि ते रोखणारे उपकरण ‘क्लिक सीज’, ‘फ्रॉडलॉजिक्स’, किंवा ‘डबल व्हेरिफाय’चा उपयोग करू शकतात.

हे टूल क्लिक पॅटर्नचे विश्लेषण करू शकतात. विसंगतींचा शोध लावू शकतात आणि संदिग्ध हालचाली रोखू शकतात.

ज्ञात फसवे आयपी (IP- इंटरनेट प्रोटोकॉल) पत्ते ओळखण्यासाठी आणि त्यांना ब्लॉक करण्यासाठी व्यवसाय आयपी (IP) ब्लॅकलिस्टचाही उपयोग करू शकतात.

व्यवसाय विशिष्ट क्षेत्र किंवा स्थळापर्यंत जाहिरात जोखमीला मर्यादित करण्यासाठी ‘भू-लक्ष्यीकरणा’चा उपयोगही करू शकतात, ज्यामुळे अप्रासंगिक किंवा उच्च जोखमीतील क्षेत्रांत फसवणुकीच्या क्लिकचा धोका कमी होऊ शकतो.

सामान्य इंटरनेट वापरकर्ताही समाधानाचा हिस्सा होऊ शकतो. आम्ही आपल्या ऑनलाइन खरेदीच्या पद्धती बदलण्याची गरज आहे.

पुढीलपैकी काही तपासण्या वापरकर्त्यांना वेबसाइट किंवा व्यवसाय खरा आहे की नाही हे निर्धारित करण्यात मदत करेल :

  • स्रोताची पुष्टी करा
  • ती विश्वासार्ह आणि लोकप्रिय आहे का?
  • हा माहितीतला वेब ॲ़ड्रेस आहे, यासाठी यूआरएल तपासा.
  • बारकाईने निरीक्षण करण्याची गरज
  • क्लिक फसवणुकीबाबत अधिक जागरूक व्हा

आपली सुरक्षा करणे, संदिग्ध संकेतस्थळांची ओळख पटविणे आणि आपले सॉफ्टवेअरला अद्ययावत ठेवण्यात मदत करण्यासाठी व्हायरस प्रतिबंधक (Anti Virus) आणि मालवेअर प्रतिबंधक (Anti Malware) सॉफ्टवेअर सुरक्षेचा उपयोग करा. तुम्ही आपल्या सुरक्षेसाठी केवळ या सॉफ्टवेअरवर अवलंबून राहू नाही शकत. मात्र ते आपल्या समाधानाचा महत्त्वाचा भाग आहेत.

Visit us

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!