All SportsIPLsports news

US player in IPL | हा पहिला अमेरिकी खेळणार आयपीएलमध्ये

 

हा पहिला अमेरिकी खेळणार आयपीएलमध्ये


क्रिकेटचं मूळ आशिया खंडात जेवढे खोलवर रुजले आहे, तेवढे युरोपीय देशांमध्ये पाहायला मिळत नाही. अमेरिकेत तर क्रिकेट फारसे खेळलेही जात नाही. मात्र, या देशातला पहिला खेळाडू इंडियन प्रीमियर लीग खेळणार आहे. US player in IPL | आश्चर्य वाटलं ना? हा खेळाडू आहे अली खान.

त्यामुळे इंडियन प्रिमियर लीगच्या इतिहासात प्रथमच अली खान Ali khan | हा अमेरिकी खेळाडू खेळताना दिसेल. US player in IPL | तो वेगवान गोलंदाज असून, कोलकाता नाइट रायडर्सतर्फे (KKR) तो आयपीएलमध्ये पाऊल ठेवणार आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार दोन वेळच्या विजेत्या केकेआरने जखमी झालेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी याच्या जागेवर अली खानला खेळविणार आहे. मात्र, त्यासाठी त्याला आयपीएलची परवानगी घ्यावी लागणार आहे.

[jnews_block_27 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ post_offset=”2″ include_category=”cricket”]

गर्नी याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. US player in IPL | त्यामुळेच त्याने आयपीएल आणि इंग्लंडमधील वाइटलिटी ब्लास्टमधून नाव मागे घेतले आहे.

कॅरेबियन बेटांवर १० सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या विजेत्या ट्रिनबागो नायडर्सकडून अली खान खेळला आहे. 

त्याने आठ सामन्यांत आठ गडी बाद केले आहेत. अली खानने 2018 मध्ये कॅनाडा ग्लोबल टी 20 मध्येही उत्तम प्रदर्शन केले होते.

अली खान मूळ पाकिस्तानी


आयपीएलमध्ये पहिला अमेरिकी खेळाडू म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. पण अली खान मूळचा पाकिस्तानी आहे. त्याचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील अटक येथे 13 डिसेंबर 1990 मध्ये झाला. त्यामुळे त्याच्या रक्तातच क्रिकेट आहे, यात आश्चर्य वाटण्याचं काहीही कारण नाही. 

अमेरिकेत स्थायिक झाल्याने अली खानला अमेरिकी क्रिकेटपटू अशी ओळख मिळाली. मात्र, मूळ अमेरिकी खेळाडू ज्या वेळी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवेल तेव्हाच ती आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.

Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]
[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”76″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!