योगाचे आधुनिक प्रकार | Types of modern yoga for body fitness
योगाचे आधुनिक प्रकार
प्राचीन योगपरंपरेत अनेक आधुनिक बदल पाहायला मिळतात. शरीर, मन तंदुरुस्त राहण्यासाठी, डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी, चेहरा प्रसन्न राहण्यासाठी योगाचे आधुनिक प्रकार खास खेळियाडच्या वाचकांसाठी… पुण्यातील आंतरराष्ट्रीय योगाभ्यास तज्ज्ञ मनाली देव यांच्या योगा मालिकेतील हा पाचवा भाग…
आपण मागच्या भागात बदलत्या काळातील बदलते योग प्रकार पाहिले. या भागातही बघूया. योगाभ्यास तोच, पण त्याला विविध छान, सोपी, आकर्षक अशी नावे किंवा प्रकार दिले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती योगाभ्यासाकडे सकारात्मक दृष्टीने नक्की पाहतील.
योगाचे आधुनिक प्रकार | Modern forms of yoga
वयाच्या, व्याधींच्या, खेळांच्या, कामाच्या स्वरूपानुसारही काही नावे जाणवतात. जसे, की मेडिकल योगा Medical Yoga |, फिटनेस योगा Fitness Yoga |, स्पर्धात्मक योगा Competitive Yoga |, आय योगा Eye Yoga |, फेस योगा Face Yoga |, यीन योगा, प्री-पोस्ट नँटल योगा Pre Post natal Yoga |, नेचर योगा Nature Yoga |, कॉर्पोरेट योगा Corporate Yoga |, चेयर योगा Chair Yoga |, रीस्टोरेटिव्ह योगा Restorative Yoga | आदी.
स्पर्धात्मक योगा Competitive Yoga |
लहान मुलांसाठी स्पर्धात्मक योग आहे. म्हणजेच योगासनांच्या विविध स्पर्धा- शाळा, महाविद्यालयीन पातळीवर विविध संस्थांतर्फे घेतल्या जातात. योग स्पर्धा सर्व वयोगटांसाठीच आहेत. त्यांच्या विविध अभ्यासक्रमांची तयारी करून घेणे हे प्रशिक्षकाचे कर्तव्य. म्हणजेच स्पर्धात्मक योगाची तयारी करणे.
फिटनेस योगा Fitness Yoga |
फिटनेस योग म्हणजे संपूर्ण शरीर, मन हे तंदुरुस्त राहण्यासाठी योगाभ्यास व काही व्यायाम प्रकार करणे.
आय योगा / फेस योगा Eye Yoga / Face Yoga |
हे नावाप्रमाणेच डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी किंवा चेहराही छान दिसण्यासाठी जे विशिष्ट व्यायाम प्रकार केले जातात त्याला आय योगा / फेस योगा म्हणतात.
नेचर योगा Nature Yoga |
नेचर योगा Nature Yoga | म्हणजेच रोजच्या धावपळीच्या जीवनापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी डोंगरावर, समुद्राजवळ, नदीजवळ, जंगलात जाऊन छान शांत ठिकाणी योगाभ्यास करणे, ज्यामुळे विशेषतः मानसिक ताण कमी होतो. योगाभ्यास नेहमीचाच, पण निसर्गाच्या सान्निध्यात. हेही खूप गरजेचे आहे, ज्यामुळे ताण कमी होऊन मन पुन्हा ताजेतवाने होते. उत्साह वाढतो, मरगळ कमी होते.
कॉर्पोरेट योगा Corporate Yoga |
आजकाल मानसिक ताण कमी होण्यासाठी व शारीरिक अधिक सक्षम होण्यासाठी बऱ्याच आयटी कंपन्यांमध्ये योगाभ्यास वर्ग / ध्यानधारणा वर्ग सुरू केले आहेत, जेणेकरून तेथील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. त्यांचे आरोग्य उत्तम राहील.
आजकाल बऱ्याच नोकरदारांचा प्रवासातच खूप वेळ जातो. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे ऑफिस टाइममध्येच योगाभ्यास करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून पाठदुखी, कंबरदुखी, पचनाच्या तक्रारी, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
चेयर योगा Chair Yoga |
खुर्चीवर बसून करण्याचे व्यायाम प्रकार म्हणजे चेयर योगा Chair Yoga |. ज्यांना अतिवजनामुळे किंवा गुडघेदुखीमुळे खाली बसून आसने करता येत नाही, त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे, तसेच कार्यालयीन वेळेतसुद्धा बसल्याजागी काही व्यायाम प्रकार करून शारीरिक व्याधी, मानसिक व्याधींपासून सुटका मिळू शकते.
मेडिकल योगा Medical Yoga |
मेडिकल योगा म्हणजे विशिष्ट आजार, व्याधी यावर दिलेली विशिष्ट योगचिकित्सा, ज्यामुळे व्याधिग्रस्त व्यक्ती बरी होण्यास खूप मदत होते.
प्री-पोस्ट नँटल योगा Pre Post natal Yoga |
प्री-पोस्ट नँटल योगा म्हणजे गर्भारपणात व बाळाचा जन्म झाल्यानंतरही करण्याचा एक विशिष्ट योगाभ्यास. यामुळे स्त्रीला प्रसूती व्यवस्थित होण्यासाठी व नंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी मदत होते. हा योगाभ्यास करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच होणे आवश्यक आहे. मनाने करू नये.
यीन योग
यामध्ये आसनांची स्थिरता वाढविण्यावर भर दिला जातो. यात पुरातन मार्शल आर्ट व योगाचा समन्वय साधला जातो. यामधील सांध्यांमधील हालचाली व लवचिकता वाढविण्यावर भर दिला जातो.
अॅक्रोबॅटिक योग Acrobatic Yoga |
हा एक साहसी आत्मविश्वास वाढविणारा योग प्रकार आहे. यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती मनोऱ्याप्रमाणे योगासने करतात. या प्रकारच्या अभ्यासाने टीम वर्कपण होते. संयम राखला जातो.
अशा प्रकारे आधुनिक काळातील काही योग प्रकार आपण जाणून घेतले. पुढील भागात नवीन विषय समजून घेऊया…
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238″]