झाशीची राणी कवितेचा अनुवाद
सुभद्राकुमारी चौहान यांची ‘झाँसी की रानी’ कविता म्हणजे वीररसाने ओथंबलेलं झाशीच्या राणीच्या कर्तृत्वाचं महाकाव्यच.

झाशीची राणी कवितेचा अनुवाद
सुभद्राकुमारी चौहान यांची ‘झाँसी की रानी’ कविता म्हणजे वीररसाने ओथंबलेलं झाशीच्या राणीच्या कर्तृत्वाचं महाकाव्यच. झाशीची राणी समजून घ्यायची तर हे महाकाव्य जरूर वाचायला हवं. एनसीईआरटीच्या सहावीच्या हिंदी अभ्यासक्रमात
या कवितेचा समावेश आहे.
सुभद्राकुमारी चौहान या मूळच्या उत्तर प्रदेशातल्याच. स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने सहभागी होत जेलमध्ये जाऊन आल्या. १६ ऑगस्ट १९०४ मध्ये म्हणजे पारतंत्र्यात जन्मलेल्या सुभद्राकुमारींना स्वातंत्र्य काय असतं, त्यासाठी किती झिजावं लागतं हे सांगायची गरज नाही. म्हणूनच त्यांनी झाशीच्या राणीचं कर्तृत्व चितारताना ज्या शब्दांची निवड केली ती अप्रतिमच. हे महाकाव्य मराठीत अनुवादित झालंही असेल, पण मी ते वाचल्यानंतर लगेच या कवितेचा मराठीत अनुवाद करण्यास घेतलं. मूळ कवितेचा जो बाज आहे, तो कुठेही डळमळीत होणार नाही, याची काळजी घेतली आहेच, पण जर त्यात काही उणीव भासलीच तर जरूर कळवावे. उत्तम कवितेसाठी ही लवचिकता मी नेहमीच बाळगतो. कविता मराठीत कशी वाटली, जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवावं. मूळ हिंदी कविताही येथे नमूद केली आहेच.
‘झाशीची राणी’ ही मराठी कविता मी सुभद्राकुमारी चौहान यांच्या चरणी लीन होत अर्पण करतो. धन्यवाद.
झाशीची राणी
सिंहासने हादरली, राजवंशांनी भुवई ताणली होती
वृद्ध भारताच्याही अंगात पुन्हा जवानी भिणली होती
हरवलेल्या स्वातंत्र्याची किंमत सर्वांनी जाणली होती
फिंरग्यांना दूर करण्याची जिद्द सर्वांनी ठाणली होती
चमकली सत्तावनमध्ये
ती तलवार जुनी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी
ती झाशीची राणी होती
कानपूरच्या आजोबांची ती मानलेली बहीण ‘छबिली’ होती
लक्ष्मीबाई नाव, वडिलांची एकुलती लाडली होती
आजोबांसंगे ती शिकत होती, आजोबांसगे खेळली होती
भाला, ढाल, कृपाण, खंजीर तिची ही सहेली होती
वीर शिवाजीची शौर्यगाथा
तिने जपली मनोमनी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी
ती तर झाशीची राणी होती
लक्ष्मी होती की दुर्गा होती, ती स्वत: वीरतेची अवतार
पुलकित होउनी मराठे पाहुनी तिच्या तलवारीचे वार
लुटुपुटूचे युद्ध, व्यूहरचना आणि खेळुनी खूप शिकार
सैन्याला घेराव, किल्ला तोडणे, होते तिचे प्रिय युद्ध प्रकार
महाराष्ट्राची कुळदेवता
तिचीही आराध्य भवानी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
झाली सुरू वीरतेच्या वैभवासोबत लगीनघाई झाशीमध्ये
विवाहबद्ध झाली राणी बनून आली लक्ष्मीबाई झाशीमध्ये
राजमहाली वाजले चौघडे, आनंदछाया पसरली झाशीमध्ये
शूरवीर बुंदेलांच्या बिरुदावलीसारखी ती सई झाशीमध्ये
चित्राला अर्जुन मिळाला
शिवाशी मिळाली भवानी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
उदित आले सौभाग्य, मुदित महाली पसरली झळाळी
परंतु काळाने शांतपणे ढगात आणली सावली काळी
बाण चालवणाऱ्या हातांत तिला कधी शोभली बांगडी, पाटली
हाय रे झाली राणी विधवा, विधात्यालाही दया नाही आली
नि:संतान गेले राजाजी
राणी शोकमग्न होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
विझला दीप झाशीचा तेव्हा डलहौसी हर्षित जाहला
राज्य हडपण्यासाठी त्याने हाच अवसर पाहिला
त्वरेने धाडल्या फौजा किल्ल्यावर आपला ध्वज फडकावला
अनाथाचा वारस होऊनी ब्रिटिश झाशी पोहोचला
साश्रुनयनांनी राणीने पाहिलं
झाशी उजाड झाली होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
उग्र परदेशीचा भ्रम मन वळवण्याचे ऐकत नाही,
अनुनय-विनय नाही ऐकत, विकट ब्रिटिश माया
भारतात आला तेव्हा व्यापारी बनून मागत होता दया
डलहौसीने पाय पसरले आता तर उलटून गेली काया
राजा नवाबांनाही त्याने ठोकरले पाया
राणी दासी झाली, झाली ती
दासी आता महाराणी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
हिरावली राजधानी दिल्लीची, घेतली लखनऊ क्षणार्धात
कैदेत होते पेशवे बिठूरमध्ये, झाला नागपूरचाही घात
उदयपूर, तंजावर, सातारा, कर्नाटकची काय बिशाद
जेव्हा सिंध, पंजाब, ब्रह्मावरही आता झाला होता वज्राघात
बंगाल, मद्रास आदींचीही
हीच तर कहाणी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
राणी रडली महाली; बेगम दुःखावेगाने बेजार
जेथे विकले जाई दागिने-कपडे तो कलकत्त्याचा बाजार
खुलेआम लिलाव छापत होते इंग्रजीचे समाचार
‘नागपूरचे दागिने घ्या’ ‘लखनऊचा घ्या नवलखा हार’
या पदराच्या प्रतिष्ठेवर
देशीयांच्या हाती विकली जाणी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
झोपड्यांमध्ये होत्या दु:ख वेदना, महालांत आघात अपमान
वीर सैनिकांच्या मनात होता, आपल्या पूर्वजांचा अभिमान
नाना धोंडोपंत पेशवे एकवटत होते सर्व सामान
बहीण छबिलीने रणचंडीला केले आवाहन
निद्रिस्त चेटवुनी ज्योती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
महालांनी दिली आग, झोपड्यांनी ज्वाला भडकावली होती
ही स्वातंत्र्याची चिंगारी, अंतरात्म्यातून आली होती
झाशी पेटली, दिल्ली पेटली, लखनऊही लपेटली होती
मेरठ, कानपूर, पाटण्याने भारी धूम उडवली होती
जबलपूर, कोल्हापुरातही
काही खळबळ माजली होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
या स्वातंत्र्य महायज्ञात अनेक वीरांनी दिली आहुती
नाना धोंडोपंत, तात्या, चतुर अजीमुल्ला सरनाम,
अहमद शाह मौलवी, ठाकूर कुंवरसिंह सैनिक अभिराम,
भारताच्या इतिहास-गगनात अमर राहतील त्यांचे नाम
पण आज गुन्हा मानती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
त्यांची गाथा ठेवून मागे, चाललो आम्ही झाशीच्या मैदानांमध्ये,
जिथे उभी आहे लक्ष्मीबाई मर्द बनली पुरुषप्रधानांमध्ये
लेफ्टनंट वॉकर येऊन पोहोचला, पुढे निघाला जवानांमध्ये
राणी तलवार उपसली, झाले द्वंद्वयुद्ध असमानांमध्ये
जखमी झालेला वॉकर पळाला
त्याला अजब हैराणी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
राणी निघाली कालपी आली, केले शंभर मैलाचे अंतर पार
अश्व ग्लानीने कोसळला जमिनीवर, गेला स्वर्गात सोडुनी संसार
यमुनाकाठावर इंग्रजांनी पुन्हा खाल्ली हार
विजयी राणी पुढे निघाली, केला ग्वाल्हेरवर अधिकार
इंग्रजांचे मित्र सिंधियाने
सोडली राजधानी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
विजय मिळाला, पण ब्रिटिश सेनेने पुन्हा घेराव टाकला होता
आता जनरल स्मिथ पुढ्यात होता, तो तोंडघशी पडला होता
काना आणि मंदरा सख्या राणीसंग उतरल्या होत्या
युद्धभूमीत त्या दोघींनी भारी वीरांगणेच्या भूमिका गाजवल्या होत्या
पण.. मागून ह्युरोज आला
हाय! घेरली गेलेली राणी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
तरीही राणी शिरकाण करी निघाली सैन्यपार
परंतु समोर नाला आला, होते ते संकट बिकट अपार
घोडा अडला, नवा घोडा होता, तेवढ्यात आला घोडेस्वार
राणी एक, शत्रू अनेक, सुरू झाले तलवारींचे वार
घायाळ होऊनी कोसळली शेरनी
वीरमरणाची वेळ वीरांगणी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
राणी पडली धारातीर्थी, चितेवरी आता तिची दिव्य सवारी होती
मिळाले तेज तेजाला, तेजाची ती सच्ची अधिकारी होती
वयाने अवघी तेवीसची होती, मनुज नाही अवतारी होती
आम्हाला जिवंत करण्यास आली झाली स्वातंत्र्याची नारी होती
दाखवून गेली मार्ग, शिकवून गेली
जो धडा आम्हाला गुरुस्थानी होता
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
जा राणी स्मृती राखू आम्ही कृतज्ञ भारतवासी
हे तुझे बलिदान जागवतील स्वातंत्र्य अविनाशी
भले होवो शांत इतिहास, लागू दे सत्याला फाशी
तुझे स्मारक तूच होशील
तू स्वयं अमीट निशाणी होती
बुंदेला हरबोलाच्या तोंडी
आम्ही ऐकली कहाणी होती
त्वेषाने लढणारी मर्दानी ती
झाशीची राणी होती
स्रोत :
पुस्तक : वसंत भाग 1 (पृष्ठ 54)
रचनाकार : सुभद्राकुमारी चौहान
प्रकाशन : एनसीईआरटी संस्करण : 2022
अनुवाद : महेश पठाडे
मूळ हिंदी कविता : झाँसी की रानी
सिंहासन हिल उठे, राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की क़ीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी,
चमक उठी सन् सत्तावन में
वह तलवार पुरानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
कानपूर के नाना की मुँहबोली बहन ‘छबीली’ थी,
लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी,
नाना के संग पढ़ती थी वह, नाना के संग खेली थी,
बरछी, ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी,
वीर शिवाजी की गाथाएँ
उसको याद ज़बानी थीं।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार,
देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार,
नक़ली युद्ध, व्यूह की रचना और खेलना ख़ूब शिकार,
सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना, ये थे उसके प्रिय खिलवार,
महाराष्ट्र-कुल-देवी उसकी
भी आराध्य भवानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में,
ब्याह हुआ रानी बन आई लक्ष्मीबाई झाँसी में,
राजमहल में बजी बधाई ख़ुशियाँ छाईं झाँसी में,
सुभट बुंदेलों की विरुदावलि-सी वह आई झाँसी में,
चित्रा ने अर्जुन को पाया,
शिव से मिली भवानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
उदित हुआ सौभाग्य, मुदित महलों में उजयाली छाई,
किंतु कालगति चुपके-चुपके काली घटा घेर लाई,
तीर चलानेवाले कर में उसे चूड़ियाँ कब भाईं,
रानी विधवा हुई हाय! विधि को भी नहीं दया आई,
निःसंतान मरे राजाजी
रानी शोक-समानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
बुझा दीप झाँसी का तब डलहौज़ी मन में हरषाया,
राज्य हड़प करने का उसने यह अच्छा अवसर पाया,
फ़ौरन फ़ौजें भेज दुर्ग पर अपना झंडा फहराया,
लावारिस का वारिस बनकर ब्रिटिश राज्य झाँसी आया,
झाँसी हुई बिरानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
अश्रुपूर्ण रानी ने देखा
अनुनय-विनय नहीं सुनता है, विकट फिरंगी की माया,
व्यापारी बन दया चाहता था जब यह भारत आया,
डलहौज़ी ने पैर पसारे अब तो पलट गई काया,
राजाओं नव्वाबों को भी उसने पैरों ठुकराया,
रानी दासी बनी, बनी यह
दासी अब महरानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
छिनी राजधानी देहली की, लिया लखनऊ बातों-बात,
क़ैद पेशवा था बिठूर में, हुआ नागपुर का भी घात,
उदैपूर, तंजोर, सतारा, करनाटक की कौन बिसात,
जबकि सिंध, पंजाब, ब्रह्म पर अभी हुआ था वज्र-निपात,
बंगाले, मद्रास आदि की
भी तो यही कहानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
रानी रोईं रनिवासों में बेगम ग़म से थीं बेज़ार
उनके गहने-कपड़े बिकते थे कलकत्ते के बाज़ार,
सरे-आम नीलाम छापते थे अँग्रेज़ों के अख़बार,
‘नागपूर के जेवर ले लो’ ‘लखनऊ के लो नौलख हार’,
यों पर्दे की इज़्ज़त पर—
देशी के हाथ बिकानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
नाना धुंधूपंत पेशवा जुटा रहा था सब सामान,
कुटियों में थी विषम वेदना, महलों में आहत अपमान,
वीर सैनिकों के मन में था, अपने पुरखों का अभिमान,
नाना धुंधूपंत पेशवा जुटा रहा था सब सामान,
बहिन छबीली ने रण-चंडी का कर दिया प्रकट आह्वान,
हुआ यज्ञ प्रारंभ उन्हें तो
सोयी ज्योति जगानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
महलों ने दी आग, झोंपड़ी ने ज्वाला सुलगाई थी,
यह स्वतंत्रता की चिनगारी अंतरतम से आई थी,
झाँसी चेती, दिल्ली चेती, लखनऊ लपटें छाई थीं,
मेरठ, कानपूर, पटना ने भारी धूम मचाई थी,
कुछ हलचल उकसानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
इस स्वतंत्रता-महायज्ञ में कई वीरवर आए काम
नाना धुंधूपंत, ताँतिया, चतुर अजीमुल्ला सरनाम,
अहमद शाह मौलवी, ठाकुर कुँवरसिंह सैनिक अभिराम,
भारत के इतिहास-गगन में अमर रहेंगे जिनके नाम,
लेकिन आज ज़़ुर्म कहलाती
उनकी जो क़ुर्बानी थी।
बुंदेले हरबालों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
लेफ़्टिनेंट वॉकर आ पहुँचा, आगे बढ़ा जवानों में,
इनकी गाथा छोड़ चलें हम झाँसी के मैदानों में,
जहाँ खड़ी है लक्ष्मीबाई मर्द बनी मर्दानों में,
लेफ़्टिनेंट वॉकर आ पहुँचा, आगे बढ़ा जवानों में,
रानी ने तलवार खींच ली, हुआ द्वंद्व असमानों में,
ज़ख्मी होकर वॉकर भागा,
उसे अजब हैरानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
रानी बढ़ी कालपी आई, कर सौ मील निरंतर पार
घोड़ा थककर गिरा भूमि पर, गया स्वर्ग तत्काल सिधार,
यमुना-तट पर अँग्रेज़ों ने फिर खाई रानी से हार,
विजयी रानी आगे चल दी, किया ग्वालियर पर अधिकार,
अँग्रेज़ों के मित्र सिंधिया
ने छोड़ी रजधानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
विजय मिली, पर अँँग्रेज़ों की फिर सेना घिर आई थी,
अबके जनरल स्मिथ सन्मुख था, उसने मुँह की खाई थी,
काना और मंदरा सखियाँ रानी के सँग आई थीं,
युद्ध क्षेत्र में उन दोनों ने भारी मार मचाई थी,
पर, पीछे ह्यूरोज़ आ गया,
हाय! घिरी अब रानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
तो भी रानी मार-काटकर चलती बनी सैन्य के पार,
किंतु सामने नाला आया, था वह संकट विषम अपार,
घोड़ा अड़ा, नया घोड़ा था, इतने में आ गए सवार,
रानी एक, शत्रु बहुतेरे, होने लगे वार पर वार,
घायल होकर गिरी सिंहनी
उसे वीर-गति पानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
रानी गई सिधार, चिता अब उसकी दिव्य सवारी थी,
मिला तेज़ से तेज़, तेज़ की वह सच्ची अधिकारी थी,
अभी उम्र कुल तेइस की थी, मनुज नहीं अवतारी थी,
हमको जीवित करने आई बन स्वतंत्रता नारी थी,
दिखा गई पथ, सिखा गई
हमको जो सीख सिखानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
जाओ रानी याद रखेंगे हम कृतज्ञ भारतवासी,
यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनाशी,
होवे चुप इतिहास, लगे सच्चाई को चाहे फाँसी,
हो मदमाती विजय, मिटा दे गोलों से चाहे झाँसी,
तेरा स्मारक तू ही होगी,
तू ख़ुद अमिट निशानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
स्रोत :
पुस्तक : वसंत भाग 1 (पृष्ठ 54)
रचनाकार : सुभद्राकुमारी चौहान
प्रकाशन : एनसीईआरटी संस्करण : 2022