Uncategorized

आदिमानवाचा मोठा मेंदू अन्न शोधण्यासाठी नव्हता!

आदिमानवाचा मोठा मेंदू अन्न शोधण्यासाठी नव्हता!

आदिमानवाचा मोठा मेंदू अन्न शोधण्यासाठी नव्हता? मग कशासाठी होता? या प्रश्नांची उत्तरे शोधताना अभ्यासांती धक्कादायक माहिती समोर आली…

आदिमानवाचा मोठा मेंदू अन्न शोधण्यासाठी नव्हता!
आदिमानवाचा मोठा मेंदू अन्न शोधण्यासाठी नव्हता!
  • By Ben Hirsch
  • Senior Lecturer in Zoology and Ecology, James Cook University

मोठ्या मेंदूमुळे मानव आणि मानवेतर वानर बहुतेक सस्तन प्राण्यांपेक्षा हुशार आहेत. मात्र, काही प्रजातींमध्ये सर्वांत आधी मोठ्या मेंदूचा विकास का होतो? नर वानराचा मोठा मेंदू कसा विकसित झाला, याच्या अग्रगण्य गृहीतकामध्ये फीडबॅक लूपचा समावेश आहे : हुशार प्राणी अधिक कार्यक्षमतेने अन्न शोधण्यासाठी बुद्धीचा वापर करतात. त्यामुळे त्यांना अधिक कॅलरी मिळतात. मोठ्या मेंदूला ऊर्जा मिळते.

या कल्पनेला मेंदूचा आकार आणि आहार-विशेषत: प्राण्यांच्या आहारातील फळांचे प्रमाण यांच्यातील संबंध आढळलेल्या अभ्यासांद्वारे पुष्टी मिळते. फळ हे उच्च ऊर्जा देणारे अन्न आहे; परंतु प्राण्यांसाठी एक जटिल कोडे आहे.

वेगवेगळ्या फळांच्या प्रजाती वर्षाच्या वेगवेगळ्या मोसमात पिकतात आणि प्राण्यांच्या घराच्या श्रेणीमध्ये पसरतात. ज्या जनावरांना असा अत्यंत परिवर्तनशील भोजन आवश्यक असतो, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याची शक्यता जास्त असू शकते.

येथे एक मुख्य गृहीतक आहे, की मोठ्या मेंदूच्या प्रजाती अधिक हुशार-बुद्धिमान असतात. त्यामुळे ते अधिक कार्यक्षमतेने अन्न शोधू शकतात.

प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी (Royal Society B)मध्ये आज प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, आम्ही प्रथमच मेंदूच्या उत्क्रांतीच्या या गृहीतकाची थेट चाचणी केली.

फलाहार गृहीतके तपासण्यासाठी एक मोठी समस्या अशी आहे, की चारा देण्याची कार्यक्षमता मोजणे कठीण आहे.

आपण ज्या सस्तन प्राण्यांचा अभ्यास करतो ते लांब अंतरावर जातात, विशेषत: रोज तीन किलोमीटरपेक्षा जास्त. त्यामुळे प्रयोगशाळेत वास्तववादी अभ्यास परिस्थितीची प्रतिकृती तयार करणे कठीण होते.

काही संशोधकांनी प्रायोगिकरीत्या वन्यप्राण्यांमध्ये अन्न वितरणात फेरफार केली आहे; परंतु प्राण्यांना मानवनिर्मित अन्न संसाधनांमध्ये प्रवेश करण्यास शिकण्यासाठी व्यापक प्रशिक्षण आवश्यक आहे.

आमच्या अभ्यासात, आम्ही पनामातील एका नैसर्गिक घटनेचा फायदा घेतला जेव्हा सामान्यतः जटिल फळ कोडे तीन महिन्यांच्या कालावधीत पिकलेल्या फळांच्या काही प्रजातींपुरते मर्यादित होते. या काळात, सर्व फळ खाणाऱ्या सस्तन प्राण्यांना एका झाडाच्या प्रजातीवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले जाते, ते म्हणजे ‘डिप्टेरिक्स ओलिफेरा’ (Dipteryx oleifera).

आमच्यासाठी सुदैवाने, ‘डिप्टेरिक्स ओलिफेरा’ (Dipteryx oleifera)ची झाडे खूप मोठी असतात. कधी कधी 40 ते 50 मीटर उंच असतात आणि उन्हाळ्यात चमकदार जांभळी फुले येतात.

आम्ही फुलांच्या हंगामात ड्रोनने बेटाचे मानचित्र केले आणि जांभळ्या फुलांचे ठिपके ओळखले. काही महिन्यांनंतर फळ देणाऱ्या प्रत्येक डिप्टेरिक्सचे मॅपिंग केले.

यामुळे आम्हाला आमच्या अभ्यासातील प्राण्यांना ज्या फळांबाबत पडलेल्या कोड्याचा सामना करावा लागला होता, त्याची संपूर्ण माहिती मिळाली. मात्र, भिन्न मेंदूचे आकार असलेले प्राणी या झाडांपर्यंत किती कार्यक्षमतेने मार्गक्रमण करतात, याची आम्हाला चाचणी करणे आवश्यक होती.

आम्ही मोठ्या मेंदूचे दोन वानर (कोळी माकडे आणि पांढऱ्या चेहऱ्याचे कॅपचिन) आणि लहान मेंदूचे दोन रॅकून प्रजातीतले (पांढरे-नाक असलेले कोटिस आणि किंकजॉस) प्राणी निवडले.

दोन फळांच्या हंगामात, आम्ही 40 हून अधिक प्राण्यांकडून क्रियाकलाप डेटा संकलित केला. परिणामी सहा लाखांपेक्षा अधिक जीपीएस स्थानेही प्राप्त झाली.

नंतर आम्हाला ही माहिती घ्यायची होती, की जनावरे डिप्टेरिक्स वृक्षांवर केव्हा आणि किती वेळासाठी येत होते. हे जटिल काम होते. कारण ही माहिती घेण्यासाठी निवडलेली प्राणी केव्हा फळझाडांवर चढतात आणि केव्हा उतरतात हे पाहणे महत्त्वाचे होते. आम्हाला दर चार मिनिटांत जीपीएस निश्चितीच्या दरम्यान त्यांच्या स्थानाचा अंदाज घ्यावा लागत होता. काही प्राण्यांना  डिप्टेरिक्स झाडांवर झोपण्याची वाईट सवय होती. एक बरं झालं, आमच्या

सुदैवाने, आमच्या कॉलरने प्राण्यांच्या क्रियाकलापांची नोंद केली. त्यामुळे ते कधी झोपतात हे आम्ही सांगू शकलो.

जेव्हा एकदाचे हे आव्हान सुटले तेव्हा आम्ही डिप्टेरिक्स वृक्षांमध्ये सक्रियतेने घालवलेला दैनंदिन वेळ निश्चित केलेल्या अंतराशी विभागणी करून मार्गदक्षतेची गणना केली.

जर मोठ्या मेंदूचे प्राणी फळझाडांवर अधिक कौशल्याने जाण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करतात, तर आम्ही अपेक्षा करू, की आमच्या अभ्यासात मोठ्या मेंदूच्या आदिमानवांकडे अधिक कौशल्याने चारा घेण्याचे मार्ग असतील. 

हे ते नाही, जे आम्हाला आढळलं

दोन वानरेतरांच्या तुलनेत दोन माकड प्रजातींकडे अधिक कार्यक्षम मार्ग नव्हते, जे मेंदूच्या विकासाच्या फलाहार गृहीतकांना गंभीर छेद देणारे आहेत.

जर हुशार प्रजाती अधिक कार्यक्षम होत्या, तर त्या आपल्या पोषणासंबंधीच्या गरजा अधिक वेगाने पूर्ण करण्यात सक्षम असत्या. मग त्यांचा उर्वरित काळ आरामात गेला असता.

जर असे असेल, तर भुकेने जागे झाल्यानंतर दिवसाच्या पहिल्या काही तासांत माकडांनी अधिक कार्यक्षमतेने स्वतःचे नियमन करणे अपेक्षित असते.

दिवसाच्या पहिल्या दोनचार तासांचे निरीक्षण केल्यावर आम्हाला एकच परिणाम मिळाला, तो म्हणजे माकडे वानरेतरांच्या तुलनेत अधिक कार्यक्षम नव्हते.

मग त्यांना मोठा मेंदू का? 

जर या मोठ्या मेंदूचा विकास वानरांना अधिक कार्यक्षम चारामार्ग आखण्यास मदत करू शकत नसेल, तर काही प्रजातींमध्ये मेंदूचा आकार का वाढला?

कदाचित याचा संबंध स्मृतीशी असावा. जर मोठ्या मेंदूच्या प्रजातींची एपिसोडिक स्मृती उत्तम असेल, तर ते अधिक भोजन मिळविण्यासाठी फळझाडांच्या सहलीची वेळ अनुकूल करण्यात सक्षम होऊ शकतात.

आमच्या डेटासेटचे प्राथमिक विश्लेषण या स्पष्टीकरणास समर्थन देत नाहीत. मात्र, या गृहितकाची चाचणी घेण्यासाठी आम्हाला अधिक तपशीलवार अभ्यासाची आवश्यकता असेल.

बुद्धिमत्तेला साधनाच्या वापराशी जोडले जाऊ शकते, जी एखाद्या प्राण्याला त्याच्या वातावरणातून अधिक पोषकद्रव्ये काढण्यास मदत करू शकते.

आमच्या चार अभ्यास प्रजातींपैकी, पांढऱ्या चेहऱ्याचे कॅपचिन माकड हे एकमेव माकड आहे, जे साधने वापरताना दिसले आणि त्याच्याकडे सर्वात मोठा मेंदूदेखील आहे (शरीराच्या आकाराच्या तुलनेत).

सामाजिक समूहात राहण्याच्या जटिल बाबींना हाताळण्यासाठी मेंदूचा आकार वाढतो या गृहीतकालाही आमचा अभ्यास पुष्टी देऊ शकतो.

मोठे मेंदू विविध प्रकारचे पृष्ठवंशी (डॉल्फिन, पोपट, कावळे) जीव आणि अपृष्ठवंशी (ऑक्टोपस) जिवांमध्ये विकसित झाले आहेत.

जरी आमचा अभ्यास या सर्व प्रजातींमध्ये मेंदूच्या उत्क्रांतीचे अचूक चालक ठरवू शकत नसला, तरी आम्ही थेट जंगली उष्णकटिबंधीय सस्तन प्राण्यांवर तुलनेने गैर-आक्रमक पद्धतीने मुख्य गृहीतकेची चाचणी केली आहे.

आम्ही हे दाखवून दिले आहे, की नवीनतम सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही उत्क्रांती, मानसशास्त्र आणि प्राण्यांच्या नैसर्गिक वातावरणातील वर्तनाबद्दलच्या मोठ्या गृहीतकांची चाचणी करू शकतो.

Visit us

[jnews_block_9 first_title=”Read More at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1636″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!