सचिनला बाद देणे ही मानवी चूक…

क्रिकेटविश्वात अंपायर स्टीव बकनर Steve Bucknor | माहीत नसेल असा क्रीडाप्रेमी नाही. भारतीय क्रिकेटप्रेमींना तर चांगलाच ठाऊक असेल. हेच ते बकनर, ज्यांनी सचिन तेंडुलकरला मोक्याच्या क्षणी दोनदा चुकीचे बाद दिले होते. त्यामुळे ते भारतीय क्रिकेटप्रेमींच्या निशाण्यावर आले होते. बकनर Steve Bucknor | यांनाही ही चूक मान्य असली तरी ती एक मानवी चूक असल्याचे त्यांनी 21 जून 2020 म्हंटले आहे. अर्थात, आता निर्णय समीक्षा प्रणालीमुळे (डीआरएस) अंपायरिंगमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे.
वेस्ट इंडीजचे 74 वर्षीय अंपायर बकनर Steve Bucknor | यांनी 11 वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली आहे. मात्र, सचिन तेंडुलकरला दोन वेळा चुकीचे बाद दिल्याची घटना अजूनही त्यांच्या लक्षात आहे. 2003 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पीने यष्ट्यांच्या बऱ्याच उंचावर जाणाऱ्या चेंडूवर सचिनला पायचीतचा निर्णय दिला होता. या घटनेच्या दोन वर्षांनी कोलकात्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही सचिन चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. अब्दुल रज्जाकच्या चेंडूवर यष्ट्यांच्या मागे सचिनला झेलबाद ठरवले होते. मात्र, चेंडू बॅटला लागलेलाच नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. हे दोन्ही निर्णय बकनर यांनीच दिले होते.
बकनर यांनी बार्बाडोसमध्ये मेसन अर्थात गेस्ट रेडिओ कार्यक्रमात सांगितले, ‘‘तेंडुलकरला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिले होते. कोणताही अंपायर जाणूनबुजून चुकीचा निर्णय देत नसतो. या गोष्टी कायमच्या त्या व्यक्तीच्या माथी मारल्या जातात, ज्यामुळे त्याची कारकीर्दच धोक्यात येऊ शकते.’’
‘‘ही मानवी चूक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनला पायचीत दिले तेव्हा चेंडू यष्ट्यांच्या बऱ्याच उंचावर जात होता. दुसऱ्यांदा बाद दिले तेव्हा सामना भारतात होता. यात त्याला यष्ट्यांमागे झेलबाद देण्यात आले होते. चेंडू बॅटीच्या अगदी जवळून गेला. मात्र, बॅटला तो स्पर्श करू शकला नाही,’’ असं बकनर Steve Bucknor | यांनी नमूद केलं.
बकनरसारख्या अनुभवी पंचाकडून अशी चूक अपेक्षित नव्हतीच. विशेषतः सचिनच्या बाबतीत ही चूक झाल्याने ती क्रिकेटप्रेमींच्या कायमची स्मरणात राहिली. बकनर Steve Bucknor | यांनी एकूण 128 कसोटी आणि 181 वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली आहे. अनुभवी असले तरी एखादा प्रसंग असा येतो, की ज्या वेळी निर्णय देताना गोंधळ होऊ शकतो. बकनर अतिशय कूल पंच होते. त्यांनी खुलासा केला, की ईडन गार्डन्स प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते. त्यांच्या आवाजामुळे चेंडूल बॅटला स्पर्श करून गेला किंवा नाही, हेच समजले नाही. त्यामुळे अंदाजानेच त्याला बादचा निर्णय दिला. अर्थात, तो सामना ईडन गार्डन्सवर होता. जेव्हा ईडनवर भारत खेळत असेल तर तुम्हाला काहीच ऐकायला येणार नाही. तब्बल एक लाख प्रेक्षक प्रचंड जल्लोष करीत असतात. माझ्याकडून अनवधानाने या चुका झाल्या आहेत आणि त्यामुळे मी माझ्या निर्णयावर खचितच नाखूश होतो. कितीही केलं तरी चुका माणूसच करतो आणि ते स्वीकारणे आयुष्याचा एक भाग आहे.
आता कुठे डीआरएस प्रणालीमुळे अंपायरिंगमध्ये बरीच सुधारणा झाली आहे आणि या प्रणालीला विरोध करणाऱ्या पंचांनी पुनर्विचार करायला हवा. ते म्हणाले, ‘‘मी ठामपणे नाही सांगू शकत, की यामुळे आत्मविश्वास दोलायमान होऊ शकेल, पण मी एक निश्चितपणे सांगेन, की यामुळे अंपायरिंगमध्ये सुधारणा होत आहे. जे पंच या प्रणालीचा सद्यःस्थितीत आनंद घेऊ शकत नसतील तर त्यांनी यावर पुनर्विचार करावा. मला आशा आहे, की ते आपली भूमिका बदलतील.’’
बकनर म्हणाले, ‘‘जर तुम्ही एखादी चूक करीत असाल तर ती मैदानावरच सुधारता येऊ शकते. मी जेव्हा अंपायरिंग करायचो, तेव्हा जर मी एखाद्या फलंदाजाला चुकीचे बाद दिले असेल, तर ती बाब मनात नेहमी सलत राहते. झोप येत नाही.’’