All SportsCricket

Sunil Gavaskar 1979 | फक्त दोन धावांनी हुकला गावस्करांचा विक्रम!

 

फक्त दोन धावांनी हुकला

गावस्करांचा विक्रम!


Follow us….

[jnews_footer_social social_icon=”circle”]

लिट्ल मास्टर म्हणून सुनील गावस्करांचा Sunil Gavaskar 1979 | एके काळी क्रिकेटमध्ये दबदबा होता. 

ही घटना आहे ४ सप्टेंबर १९७९ ची.  म्हणजे ४१ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

जेव्हा केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुनील गावस्करांनी सर्वांगसुंदर फलंदाजी करताना इंग्लंडला पुरते जेरीस आणले होते. खेळी तर जबरदस्त होती, पण त्यांचा विश्वविक्रम अवघ्या दोन धावांनी हुकला. दुर्दैव म्हणजे भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना बरोबरीवर समाधान मानावे लागले.

पहिला सामना गमावल्यानंतर पुढचे दोन्ही सामने बरोबरीवरच संपले. Sunil Gavaskar 1979 | आता चौथ्या सामन्यावर भारताची भिस्त होती. मैदान होते केनिंग्टन ओव्हल. भारतासमोर जिंकण्यासाठी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ४३८ धावांचे अवघड लक्ष्य होते.

त्या वेळी कोणाचाही विश्वास बसणार नाही, की हा सामना बरोबरीत सुटेल. कारण भारताला जिंकण्यासाठी फक्त नऊ धावा हव्या होत्या. अशा वेळी सर्वांनीच भारताचा विजय जवळजवळ गृहीतच धरला होता. ही स्थिती आणली ती केवळ सुनील गावस्करांनी.

sunil gavaskar 1979

चौथ्या डावात गावस्करांनी २२१ धावांची द्विशतकी खेळी रचली. त्या वेळी ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होती. गावस्कर त्या वेळचे सलामीचे हुकमी फलंदाज. त्या वेळी सर्वोच्च धावसंख्या होती २२३. हा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम वेस्ट इंडीजच्या जॉर्ज हॅडली यांच्या नावावर होता. त्यांनी इंग्लंडविरुद्धच १९३० मध्ये किंग्स्टन मैदानावर २२३ धावांची ही विक्रमी सर्वोच्च द्विशतकी खेळी साकारली होती. 

आता हाच विक्रम मोडीत काढण्याची संधी गावस्करांकडे चालून आली. प्रतिस्पर्धी संघही इंग्लंडच होता. गावस्करांना विक्रमी धावसंख्येशी किमान बरोबरी करण्यासाठी फक्त दोन धावांची गरज होती.


Sunil Gavaskar 1979 | मात्र, भारताच्या या दिग्गज फलंदाजाचं दुर्दैव आड आलं आणि दोन धावा करण्याची संधी हुकली. हा विक्रम आजही हॅडलीच्याच नावावर आहे. 

गंमत म्हणजे याच इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडच्या नॅथन अॅस्टललाही २००२ मध्ये गावस्करांसारखीच संधी मिळाली होती. ख्राइस्टचर्चमध्ये झालेल्या या सामन्यात अॅस्टलचं दुर्दैव म्हणजे, त्यांचाही विक्रम एका धावेने हुकला! ते २२२ धावांवर बाद झाले. 

गावस्कर खेळपट्टीवर तब्बल आठ तास आणि १० मिनिटे टिकून होते. त्यांनी ४४३ चेंडूंचा सामना करताना २१ चौकार लगावले. भारताने आतापर्यंत तीन वेळा चौथ्या डावात ४०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारली आहे. यातील दोन सामन्यांत गावस्करांनी शतके झळकावली आहेत.

त्या वेळी बिशनसिंह बेदी कर्णधार होते. त्यांनी ओव्हलवरील १९७९ मधील गावस्करांच्या या खेळीच्या आठवणींना उजाळा दिला. 

बेदी यांनी ४ सप्टेंबर २०२० रोजी ट्विटरवर म्हंटले, ‘‘अतिशय नम्रतेने सांगतो, की भारत एकमेव असा देश आहे, ज्याने चौथ्या डावात तीन वेळा ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यातील एक सामना बरोबरीत सुटला, एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, तर एक सामना जिंकला. या तिन्ही सामन्यांत ‘खराखुऱ्या लिट्ल मास्टर’ने (गावस्कर) महत्त्वाची भूमिका बजावली होती.’’

भारताने १९७६ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये जेव्हा ४०३ धावांचं विक्रमी लक्ष्य गाठलं, तेव्हा त्यात गावस्करांच्या १०२ धावांच्या शतकी खेळीचा समावेश होता. Sunil Gavaskar 1979 |

१९७८ मध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेडमध्ये ४९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ४४५ धावांपर्यंत मजल मारली होती. दुर्दैवाने गावस्करांना केवळ २९ धावाच करता आल्या होत्या. 

ओव्हलमध्ये १९७९ मध्ये तर गावस्करांनी संघाला विजयी लक्ष्यासमीप नेऊन ठेवले होते. मात्र, ते बाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी गडगडली. अखेर ८ बाद ४२९ धावा करून मोठ्या मुश्किलीने भारताने हा सामना बरोबरीत रोखला.

गावस्कर आणि चेतन चौहान यांनी चौथ्या दिवशी भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता ७६ वर नेली होती आणि भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी ३६२ धावा करायच्या होत्या. 

पाचव्या दिवशी लंचनंतर एकही विकेट न गमावता भारताने १६९ धावा केल्या. गावस्कर आणि चौहान या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या सत्रात धावसंख्या २१३ पर्यंत नेली.

मात्र, चौहान ८० धावा करून बाद झाले. त्यानंतर गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर (५२) यांनी धावसंख्या ३६६ पर्यंत नेऊन ठेवली. विजयाचं लक्ष्य भारतासाठी अवघ्या ७६ धावा दूर होतं. 

वेंगसरकर बाद झाले. त्यानंतर गुंडप्पा विश्वनाथ यांचा क्रमांक होता. मात्र, त्यांच्या जागेवर कपिलदेव मैदानावर उतरले. हा बदल यशस्वी ठरला नाही. कपिलदेव भोपळाही न फोडता बाद झाले. 

‘विज्डेन’ने तेव्हा लिहिले होते, ‘‘पाचवी विकेट गमावल्यानंतरही विश्वनाथ खेळपट्टीवर न आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ते उशिरा खेळपट्टीवर आल्याने भारत विजयापासून वंचित राहिला.’’

जेव्हा भारताची धावसंख्या ३८९ होती, त्याच वेळी इयान बोथम यांचा मारा सुरू झाला. तत्पूर्वी गावस्करांनी पाणी मागवले. जॉन वुडकॉकने ‘द क्रिकेटर’मध्ये लिहिले, ‘‘ही त्यांच्या दिवसातली पहिली चूक असू शकते. त्यामुळे त्यांची एकाग्रता भंगली होती.’’

गावस्कर भलेही हॅडलीच्या विश्वविक्रमापासून वंचित राहिले असतील, पण चौथ्या डावात सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम आजही भारताच्याच नावावर आहे. गावस्करांपूर्वी हा विक्रम विजय हजारे यांच्या नावावर होता. त्यांनी मुंबईत १९४९ मध्ये झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्या १२२ धावा केल्या होत्या. गावस्कर यांच्यानंतर भारतीय फलंदाजांमध्ये के. एल. राहुल (१४९), वेंगसरकर (नाबाद १४६), विराट कोहली (१४१) आणि सचिन तेंडुलकर (१३६) यांचा क्रमांक लागतो.

[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”65″] [jnews_block_18 first_title=”हे वाचलंत का…” header_text_color=”#0066bf” header_line_color=”#0066bf” include_category=”106″] [jnews_block_18 first_title=”Read more…” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”87″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!