All SportsCricket

श्रेयस अय्यर, ईशान किशन का गेले टीम इंडियाबाहेर

श्रेयस अय्यर, ईशान किशन यांना का वगळले?

श्रेयस अय्यर, ईशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारबद्ध खेळाडूतून वगळले आहे, तर यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांचा बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रश्न हा आहे, की श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना का डच्चू देण्यात आला?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अ ‘प्लस’ या उच्च श्रेणीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे चार अव्वल खेळाडू कायम ठेवले; पण त्याच वेळी नव्या मोसमासाठी करारबद्ध केलेल्या तीस खेळाडूंतून श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला वगळण्यात आले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी श्रेयस अय्यरची निवड झाली होती. त्याच वेळी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप संघातील तो प्रमुख खेळाडूही होता. मात्र, रणजी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीची लढत टाळल्याचा फटका श्रेयसला बसल्याची चर्चा आहे. याच कारणास्तव ईशान किशनलाही करारबद्ध खेळाडूंमध्ये स्थान नाकारण्यात आले असावे.

श्रेयस अय्यर, ईशान किशन यांना का वगळले?

श्रेयस अय्यर, ईशान किशन यांना का वगळले?

राष्ट्रीय संघात नसताना देशांतर्गत स्पर्धेत खेळावे, अशी स्पष्ट सूचना बीसीसीआयने दिली आहे. श्रेयसने पाठदुखीचे कारण देऊन रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळण्यास नकार दिला होता. मात्र, त्याने उपांत्य फेरीची लढतीसाठी आपण उपलब्ध असल्याचे कळवले आहे. भारताच्या अंतिम संघात स्थान मिळत नसल्यामुळे ईशान किशन दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोडून मायदेशी परतला. त्याने रणजी करंडक स्पर्धा खेळण्याऐवजी आयपीएलच्या सरावास पसंती दिली. आता तो डी. वाय. पाटील टी-२० क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला आहे.

प्रामुख्याने मर्यादित षटकांच्या लढतींसाठी स्वत:ला उपलब्ध करीत असलेला; तसेच देशांतर्गत स्पर्धा टाळणारा हार्दिक पंड्या याला ‘अ’ श्रेणीतच स्थान देण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या जुलैत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला यशस्वी जयस्वाल ‘ब’ श्रेणीत आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सलग दोन द्विशतके केली आहेत. त्याचे बक्षीस त्याला देण्यात आले आहे. दरम्यान, ‘क’ श्रेणीत प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय टी-२० लढतीसाठी निवड होणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यात ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्माही आहेत.

महत्त्वाच्या नोंदी

  • महंमद सिराज, लोकेश राहुल आणि शुभमन गिलला ‘अ’ श्रेणीत बढती
  • गेल्या मोसमात एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला ऋषभ पंत ‘अ’ मधून ‘ब’ श्रेणीत
  • चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, शिखर धवन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल यांना कोणत्याच श्रेणीत स्थान नाही.
  • नव्याने आलेला यशस्वी जयस्वाल थेट ‘ब’ श्रेणीत.
  • रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश, मुकेश, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांना प्रथमच करारबद्ध खेळाडूंमध्ये स्थान

श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचा करारबद्ध खेळाडूंची निवड करताना विचार झाला नाही. राष्ट्रीय संघातून खेळत नसताना खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास प्राधान्य द्यावे, हे सर्व खेळाडूंना सांगितले आहे.
– जय शहा, बीसीसीआयचे सचिव

हे आहेत करारबद्ध खेळाडू

  • अ ‘प्लस’ श्रेणी (४ खेळाडू) रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा
  • अ श्रेणी (६ खेळाडू) रविचंद्रन अश्विन, महंमद शमी, महंमद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या
  • ब श्रेणी (५ खेळाडू) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल
  • क श्रेणी (१५ खेळाडू) रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, श्रीकर भारत, प्रसिध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार.

थोडक्यात महत्त्वाचे

सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल यांची तिसऱ्या कसोटीसाठी अंतिम संघात निवड झाल्यास त्यांचाही ‘क’ श्रेणीत समावेश. (किमान तीन कसोटी किंवा आठ वन-डे किंवा दहा टी-२० खेळलेल्या खेळाडूंना थेट ‘क’ श्रेणीतील करारबद्ध खेळाडूंमध्ये स्थान मिळते.)

करारबद्ध असलेले वेगवान गोलंदाज

आकाश दीप, विजयकुमार व्याशाक, उमरान मलिक, यश दयाल, विद्वाथ कावेरप्पा.

मानधन जाहीर करणे टाळले…

  • बीसीसीआयने प्रत्येक श्रेणीतील खेळाडूंना देण्यात येणारे मानधन जाहीर करणे या वेळी टाळले
  • गतवर्षापर्यंत अ ‘प्लस’ श्रेणीतील खेळाडूंना सात कोटी, ‘अ’ श्रेणीसाठी पाच कोटी, ‘ब’ श्रेणीसाठी तीन कोटी आणि ‘क’ श्रेणी एक कोटी रुपये मानधन होते.
  • याशिवाय भारतीय संघात निवड झाल्यास मिळणारे मानधन; तसेच भत्ते अतिरिक्त
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=c9P2Z5eQ2r0″ column_width=”4″]

Visit us

#ishankishan #shreyasiyer #bccci #bccicontract #cricket #cricketer #श्रेयसअय्यर #ईशानकिशन #बीसीसीआय

[jnews_block_9 first_title=”Read More At:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!