serena williams loss | सेरेनाच्या मिशन अमेरिकनला धक्का
सेरेनाच्या मिशन अमेरिकनला धक्का
पुढच्या आठवड्यात होणाऱ्या यूएस ओपनच्या तयारीत असलेल्या सेरेना विल्यम्सला २६ ऑगस्ट २०२० रोजी मात्र धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. serena williams loss | वेस्टर्न एंड सदर्न ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात तिला ग्रीसच्या मारिया सक्कारीने पराभवाचा धक्का दिला.
serena williams loss | सक्कारीने सेरेनाला ५-७. ७-६ (५), ६-१ असे पराभूत केले. या सामन्यात सेरेनाला वेळेचा अपव्यय केल्याप्रकरणी इशाराही देण्यात आला होता. आघाडी घेण्यात अपयशी ठरलेल्या सेरेनाने रॅकेटवरच संताप व्यक्त केला.
करोना महामारीमुळे सुमारे सहा महिन्यांनी टेनिस स्पर्धेत पुनरागमन केल्यानंतरचा सेरेनाचा हा पाचवा व्यावसायिक सामना होता. हे सर्वच सामने तीन सेटपर्यंत चालले. यापैकी तिने तीन सामने जिंकले, तर दोन सामने गमवावे लागले.
serena williams loss | यूएस ओपनच्या तयारीच्या दृष्टीने खेळणाऱ्या सेरेनासाठी तेराव्या मानांकित सक्कारीकडून झालेला पराभव धक्कादायकच मानला जात आहे. त्यामुळे तिची तयारी म्हणावी तितकी उंचावलेली नाही हेच यातून स्पष्ट होत आहे. यूएस ओपन स्पर्धा ३१ ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे.
वेस्टर्न एंड सदर्न ओपन स्पर्धा अमुमन ओहियोमध्ये होत असते. मात्र करोना महामारीमुळे ही स्पर्धा फ्लाशिंग मिडोजवर घेण्यात येत आहे. सेरेनाचा सुरुवातीचा खेळ नियंत्रणात होता. सुरुवातीला ती ५-३, ३०-० अशी आघाडी राखून होती. त्यानंतर तिचे बॅकहँडचे दोन फटके चुकले.
नंतर सेरेना विश्रांतीकडे गेली तेव्हा चेअर अंपायर ऑरली टोर्ट यांनी तिला वेळ वाया घालवल्याबद्दल इशारा दिला. तिने पहिला सेट जिंकला खरा, पण दुसरा सेट टायब्रेकरमध्ये ७-५ असा गमावला. तिचा खेळ खालावला. तिसऱ्या सेटमध्येही ती फारशी चमक दाखवू शकली नाही.
महिला गटातील इतर उपउपांत्य फेरीतील सामन्यांचे चित्रही स्पष्ट झाले आहे. दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेती ठरलेली नाओमी ओसाका हिचा सामना एनेट कोंटावीट, जागतिक क्रमवारीत कधी काळी अव्वलस्थानी राहिलेली विक्टोरिया अजारेंका हिचा सामना ओंस जाबेरशी, तर अमेरिकी क्वालिफायर जेसिक पेगुलाचा सामना एलिस मर्टेन्सशी होणार आहे.