All SportsLiterateursports news

इमरोज यांची ‘संपूर्ण औरत’

अमृता प्रीतमचा जीवनसाथीच्या रूपाने चर्चेत असलेला इमरोज हा कवी वाचला का? कवीला वाचणं म्हणजे त्याच्या रचनेला वाचणं.

इमरोज यांची ‘संपूर्ण औरत’

अमृता प्रीतमचा जीवनसाथी म्हणून चर्चेत असलेला इमरोज हा कवी वाचला का? कवीला वाचणं म्हणजे त्याच्या रचनेला वाचणं. इमरोजच्या कवितांनी तरुणांना वेड लावलं. अशाच काही त्यांच्या रचना बऱ्याच दिवसांपासून मराठीत अनुवाद करण्याचं मनात घोळत होतं. अखेर आज तो प्रयत्न करूनच पाहिला. ‘संपूर्ण औरत’ या कवितेने मी अनुवादाला सुरुवात केली. अनुवाद करताना काही उणीव भासली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावं.

संपूर्ण बाई

चालता चालता एक दिवस

विचारलं होतं अमृताने…

तू कधी वुमेन विथ माइंड

पेंट केली आहे?

चालता चालता मी थांबलो

माझ्या अंतरात पाहिलं, बाहेर पाहिलं

उत्तर कुठेच नव्हतं

सभोवती पाहिलं…

प्रत्येक दिशेला पाहिलं आणि केली प्रतीक्षा

पण ना काही आवाज आला, ना कुठूनही प्रत्युत्तर

उत्तर शोधता शोधता

चालू लागलो आणि पोहोचलो…

पेंटिंगच्या क्लासिक काळात

अमृताची प्रश्नाकर्ती बाई

बाईच्या आतला विचार

विचाराचे रंग

ना कोणत्या पेंटिगच्या रंगांत दिसले

ना कोणत्याही आर्ट ग्रंथात माझ्या दृष्टीस पडले

त्या बाईचा, तिच्या विचाराचा उल्लेख शोधला

होय,

आश्चर्य वाटलं पाहून

कोणत्याही चित्रकाराने बाईच्या शरीरापेक्षा

ना विचार केला होता, ना पेंट केला होता

संपूर्ण बाई शरीरापेक्षा अधिक मोठी असते

झोपले जाऊ शकते आणखी शरीरासोबत

पण फक्त शरीरासोबत नाही जागे होऊ शकत

जर कधी चित्रकारांनी पूर्ण बाईसोबत जागून

पाहिल असतं

आणि केली आणि झाली असती चित्रकला… आतापर्यंत

मॉडर्न आर्टमध्ये तर काहीच निश्चल नाही राहिलं

ना बाई, ना माणूस आणि ना कोणताही विचार

जर कधी माणसानेही बाईसोबत जागून पाहिलं असतं,

बदललं असतं आयुष्य, झालं असतं जगण्याजोगं आयुष्य

तिचं आणि तिच्या पिढीचंही…

स्रोत :

  • पुस्तक : अमृता के लिए नज़्म जारी है (पृष्ठ 26)
  • कवी : इमरोज़
  • प्रकाशन : हिंद पॉकेट बुक्स संस्करण : 2008
  • अनुवाद : महेश पठाडे

मूळ कविता : संपूर्ण औरत

  • अनुवाद : अमिया कुँवर
  • कवी : इमरोज़

चलते-चलते एक दिन

पूछा था अमृता ने—

तुमने कभी वुमैन विद माइंड

पेंट की है?

चलते-चलते मैं रुक गया

अपने भीतर देखा, अपने बाहर देखा

जवाब कहीं नहीं था

चारों ओर देखा—

हर दिशा की ओर देखा और किया इंतज़ार

पर न कोई आवाज़ आई, न कहीं से प्रति-उत्तर

जवाब तलाशते-तलाशते

चल पड़ा और पहुँच गया—

पेंटिंग के क्लासिक काल में
अमृता के सवाल वाली औरत

औरत के अंदर की सोच
सोच के रंग

न किसी पेंटिंग के रंगों में दिखे
न ही किसी आर्ट ग्रंथ में मुझे नज़र आए

उस औरत का, उसकी सोच का ज़िक्र तलाशा

हाँ,

हैरानी हुई देख-देखकर

किसी चित्रकार ने औरत को जिस्म से अधिक

न सोचा लगता था, न पेंट किया था

संपूर्ण औरत जिस्म से कहीं बढ़कर होती है

सोया जा सकता है और जिस्म के साथ

पर सिर्फ़ जिस्म के साथ जागा नहीं जा सकता

अगर कभी चित्रकारों ने पूर्ण औरत के साथ जागकर

देख लिया होता

और की और हो गई होती चित्रकला—अब तलक

मॉडर्न आर्ट में तो कुछ भी साबुत नहीं रहा—

न औरत, न मर्द और न ही कोई सोच…

गर कभी मर्द ने भी औरत के साथ जागकर देख लिया

होता,

बदल गई होती ज़िंदगी हो गई होती जीने योग्य ज़िंदगी

उसकी और उसकी पीढ़ी की भी…

  • इमरोज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!