All Sportssports news
SAI’s new logo unveiled | आता ‘साइ’चा नवा लोगो

SAI’s new logo unveiled |
आता ‘साइ’चा नवा लोगो
नवी दिल्ली | क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) नव्या लोगोचे अनावरण केले आहे. SAI’s new logo unveiled |
आजपर्यंत साइचा लोगो कधीच बदलण्यात आला नव्हता. 1982 नंतर प्रथमच लोगो अर्थात साइचे (SAI) प्रतीकचिन्ह (Logo) बदलण्यात आले आहे.
SAI’s new logo unveiled | नव्या ‘लोगो’त ‘एसएआय’ ठळक अक्षरांत नमूद करण्यात आले आहेत. त्यावर उडत्या पक्ष्यासारखी खेळाडूची भरारी दर्शविली आहे.
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात या लोगोचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास क्रीडा सचिव रवी मित्तल, साइचे महानिदेशक संदीप प्रधान आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते.
क्रीडामंत्री रिजीजू Kiren Rijiju | यांनी सांगितले, की क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्याबरोबर साइचा लोगो बदलण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा लोगो (SAI logo) अधिक सोपा आणि अर्थपूर्ण बनविण्यास सुचवण्यात आले होते.
ते म्हणाले, ‘‘नवा ‘लोगो’ छोटा आहे. मात्र, त्याचा अर्थ आणि लक्ष्य मोठं आहे. ‘लोगो’ कोणत्याही संस्थेची एक ओळख असते. SAI’s new logo unveiled |
दीर्घकाळापासून साइ भारतात खेळांना प्रोत्साहन देत आहे. मात्र, जुना ‘लोगो’ मला लांबलचक आणि विस्कळित वाटला. म्हणून मी लहान ‘लोगो’ बनविण्याबाबत विचार केला. नव्या लोगोच साइ हे नाव अधिक स्पष्ट दिसते. नव्या ‘लोगो’त साधेपणा आहे.’’

[jnews_hero_9 include_post=”अजबगजब”]