रॅपिड अँटिजेन चाचणी शोधते करोनाचा नवा व्हॅरियंट!
रॅपिड अँटिजेन चाचणी शोधते करोनाचा नवा व्हॅरियंट!
संपूर्ण अमेरिकेत कोविड-19 लॉकडाउनच्या सहा महिन्यांनंतर हे स्पष्ट झाले, की सार्स-कोव-2 (SARS-CoV-2) त्याच्या मूळ स्वरूपापासून परिवर्तित झाला आहे. सार्स-कोव-2 (SARS-CoV-2)मुळे कोविड-19 होतो. त्यामुळे प्रश्न हा आहे, की सध्याची रॅपिड अँटिजेन चाचणी (Rapid Antigen Test) व्हायरसचे नवीन प्रकार शोधू शकते की नाही?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने त्यांच्या ‘व्हेरियंट टास्क फोर्स’द्वारे 2020 आणि 2023 दरम्यान अमेरिकेतील विविध प्रयोगशाळांमधून क्लिनिकल नमुने गोळा केले आणि तीनशेहून अधिक प्रकारांवर शंभराहून अधिक रॅपिड अँटिजेन चाचणी (Rapid Antigen Test) किटच्या परिणामकारकतेचे विश्लेषण केले. बहुतांश किट व्हायरसचे नवीन आणि पूर्वीचे ज्ञात प्रकार शोधण्यास सक्षम होत्या. याबाबत यूमास चान मेडिकल स्कूलच्या नथानिएल हाफर, अपूर्व सोनी, एमोरी विद्यापीठाच्या अनुराधा राव यांनी याबाबत संशोधन केले आहे.
संशोधकांच्या या टीमने गेल्या काही वर्षांपासून कोविड-19 चाचण्यांची अचूकता आणि कामगिरी यावर संशोधन केले आहे. त्यातून असे निष्कर्ष समोर आले, की या चाचण्या विश्वसनीय आहेत की नाही याबद्दल लोकांच्या मनात अजूनही प्रश्न का असू शकतात, विशेषत: नवीन रूपे उदयास येत आहेत.
या चाचण्या काम करतात का?
सार्स-कोव- 2 शोधण्यासाठी दोन प्रमुख प्रकारच्या चाचण्या आहेत. यात एक आरटी-पीसीआर चाचणी आहे. ही चाचणी विषाणू शोधण्यात 95 टक्क्यांपेक्षा अधिक परिणामकारक आहे. मात्र, परंतु त्याची किंमत अँटिजेन चाचणीपेक्षा पाच ते दहा पट जास्त आहे, तर रॅपिड चाचणीच्या अचूकतेचा दर्जा 80 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे चाचणी कीट विशेषकरून सुपर मार्केट, तसेच मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. रॅपिड अँटिजेन चाचणी (Rapid Antigen Test) अपेक्षेपेक्षा स्वस्त असतात. या चाचणीचा वापर कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. ही चाचणी त्वरित निष्कर्ष देते. सामान्यपणे यात 10-15 मिनिटांत निष्कर्ष मिळतो.
मात्र, यात एक उणीव आहे. ती म्हणजे पीसीआर चाचण्यांच्या तुलनेत कमी अचूकता असते. विशेषत: संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा शरीरात विषाणूंचा स्तर कमी असतो. संशोधकांच्या टीमने दर्शविले आहे, की या चाचण्या 2024 मध्ये विषाणूंचे वेगवेगळे प्रकार पसरत असताना, साथीच्या रोगाच्या आधी केल्या होत्या, त्याप्रमाणेच कामगिरी करतात.
संशोधकांच्या टीमचा प्राथमिक अभ्यास जानेवारी 2022 मध्ये पूर्ण झाला होता. याचे कारण असे, की अँटिजेन चाचण्यांद्वारे आढळलेल्या विषाणूंच्या प्रथिनांमध्ये गेल्या दोन वर्षांत फारसा बदल झालेला नाही, तर विषाणूच्या इतर भागांमध्ये अनेक बदल झाले आहेत. 2020 ते 2022 पर्यंत रॅपिड अँटिजेन चाचण्यांच्या अचूकतेचे परीक्षण केलेल्या दुसऱ्या अभ्यासात असेच परिणाम आढळले. अभ्यासादरम्यान, संशोधक नमुने गोळा करण्यासाठी मास्क आणि इतर संरक्षणात्मक उपकरणे परिधान करून तंबूत बसले होते.
माझ्यात लक्षणे आहेत. मी केव्हा रॅपिड अँटिजेन चाचणी करायला हवी?
जर तुम्हाला लक्षणे आहेत, तर जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर रॅपिड अँटिजेन चाचणी (Rapid Antigen Test) करावी. जर तुमची चाचणी पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही बऱ्यापैकी निश्चिंत होऊ शकता, की तुम्हाला संसर्ग झाला आहे. जर निष्कर्ष निगेटिव्ह असेल तर तुम्हाला दोन दिवस प्रतीक्षा करावी लागेल आणि पुन्हा चाचणी करावी लागेल. हा प्रतीक्षा कालावधी महत्त्वाचा आहे. कारण विषाणू त्या स्तरापर्यंत पोहोचण्यात काही दिवस लागतात, तेव्हा त्याला रॅपिड चाचणीत पकडले जाऊ शकते.
मी संसर्ग संपर्कात आलो, पण मला लक्षणेच नाहीत. मी काय करावे?
जर तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले आणि तुम्हाला काहीच लक्षणे नाहीत, तर सध्याच्या सल्ल्यानुसार तुम्हाला रॅपिड चाचणी करण्यासाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागेल. जर तुमची रॅपिड अँटिजेन चाचणी निगेटिव्ह असेल तर दोन दिवस वाट पाहावी लागेल आणि पुन्हा चाचणी करावी लागेल.
जर निष्कर्ष तेव्हाही निगेटिव्हच असेल तर तुम्ही आणखी काही दिवस वाट पाहा आणि पुन्हा चाचणी करा. विनालक्षणाच्या प्रकरणात कोविड-19 संसर्ग पकडण्याचा हा उत्तम उपाय आहे.
मला केव्हा संसर्ग होतो?
बऱ्याच लोकांना लक्षणे जाणवतात आणि चाचण्याही पॉझिटिव्ह येतात. जर आता तुम्हाला कोणतीही लक्षणे नाहीत आणि आता चाचणी पॉझिटिव्ह येत नसेल तर तुम्हाला संसर्ग असण्याची शक्यता नाही. मात्र, या सामान्य नियमाला काही अपवाद आहेत. असेही शक्य आहे, की तुम्ही संक्रमित झालात आणि तुम्हाला काहीच लक्षणे नाहीत. हे तेव्हा होते, जेव्हा एखाद्या व्यक्तीत संक्रमणाची सुरुवात झाली असेल.
चाचणी नाकावाटे करावी की गळ्यावाटे?
अमेरिकेत अँटीजेन चाचणीसाठी नाकावाटे नमुने घेतले जातात. मात्र, डेन्मार्कमधील एका अभ्यासानुसार सांगितले गेले आहे, की अँटिजेन चाचणी (Rapid Antigen Test) आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे गळ्यावाटे घेतलेल्या नमुन्यांबद्दल अधिक संवेदनशील होते. त्याच अभ्यासानुसार सांगितले गेले आहे, की जेव्हा एखादी व्यक्तीने स्वत:च नमुना घेतला, तर तो गळ्यावाटे घेतलेल्या नमुन्यांपेक्षा नाकावाटे घेतलेला नमुना अधिक अचूक होता.
तुमच्या शरीराचा वास आणि आरोग्य
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com
#Covid-19 #coronavirus #rapidantigentest #coronavariant #कोविड-19 #सार्स-कोव-2 #SARS-CoV-2
[jnews_block_9 first_title=”Read More At:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]