गोयल यांचा हा विक्रम कोण मोडणार?
प्रथमश्रेणी क्रिकेट एक काळ गाजवणारे फिरकी गोलंदाज राजिंदर गोयल Rajinder Goel | यांचं 21 जून 2020 रोजी वयाच्या 77 वर्षी निधन झालं. वसंत रायजी यांच्यानंतर आठवडाभरातच भारताच्या समृद्ध क्रिकेटचे साक्षीदार असलेले राजिंदर गोयल Rajinder Goel |यांच्या निधनाने क्रिकेटविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा नितीन गोयल आहे. नितीन गोयलही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले आहेत. सध्या ते प्रथमश्रेणी क्रिकेटचे पंच म्हणून काम पाहतात.
डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून गोयल यांचं नाव भारतीय क्रिकेटविश्नात आदराने घेतले जाते. दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नसल्याची खंत आजही अनेक क्रिकेटपटू व्यक्त करतात. कारण गोयल ज्या काळात खेळत होते, त्याच काळात बिशनसिंग बेदी यांचाही दबदबा होता. ते भारतीय संघातून खेळत होते. त्यामुळेच गोयल यांना भारतीय संघात संधी मिळू शकली नाही.
गोयल Rajinder Goel | यांनी हरियाणा आणि उत्तरेकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 157 सामने खेळले आहेत. यात त्यांनी तब्बल 750 गडी टिपले. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हा विक्रम आहे. अद्याप तो कोणीही मोडू शकलेला नाही. भविष्यातही कोणी मोडू शकेल अशी सूतराम शक्यता नाही. कारण गोयल यांनी त्यासाठी आपल्या आयुष्यातली 44 वर्षे दिली होती. आज क्रिकेटच्या इतिहासात एवढी वर्षे कोणताही खेळाडू किमान प्रथमश्रेणी क्रिकेटसाठी तरी देऊ शकेल असे वाटत नाही. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीचा गौरव एकदा बिशनसिंग बेदी यांनीच केला होता. बीसीसीआयच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बेदी यांच्या हस्ते गोयल Rajinder Goel | यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. गोयल थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 44 वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले आहेत. सुनील गावस्कर यांनी एक ‘आयडॉल्स’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात ज्या खेळाडूंना त्यांनी जागा दिली त्यात गोयल एक होते.
गोयल Rajinder Goel | 1958-59 पासून 1984-85 पर्यंत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 26 मोसम खेळले आहेत. असे असतानाही त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याचं शल्य बोचत असलं तरी त्यांनी कधी तक्रार केली नाही आणि खेळणंही थांबवलं नाही. बिशनसिंग बेदीसारखा फिरकी गोलंदाज भारतीय संघात असल्याने दुसऱ्या फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळणे शक्यच नव्हते. कदाचित यामुळेच गोयल भारतीय संघापासून लांबच राहिले. त्याबाबत ते कधीही नाराज झाले नाहीत. कदाचित यामुळेच बेदी यांनी त्यांना समाधानी क्रिकेटपटू म्हणून संबोधले.
गोयल यांच्या निधनानंतर बेदी यांनी ट्वीटवर म्हंटले, ‘‘मी जेवढ्या क्रिकेटपटूंना ओळखतो त्यापैकी राजिंदर गोयल सर्वांत समाधानी माणूस होता. मी जेव्हा कठीण काळात असायचो, तेव्हा मला गोयल Rajinder Goel | यांच्या समाधानाच्या भावनेचा हेवा वाटायचा. त्यांनी रणजी ट्रॉफी समृद्ध करण्यासाठी अक्षरशः जीव ओतला.’’