Para Archer Coronavirus positive | पॅरा आर्चर करोनाबाधित
Para Archer Coronavirus positive
पॅरा आर्चर करोनाबाधित
[jnews_footer_social social_icon=”circle”]
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) उत्तर केंद्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात पॅरा आर्चर Para Archer (धनुर्विद्या) अंकित कोरोनाची लागण Coronavirus positive | झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले..
पॅरा-आर्चर खेळाडूंसाठी पाच ऑक्टोबरपासून राष्ट्रीय शिबिर सुरू आहे. त्यात आठ खेळाडूंचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या अंकितला सोनिपत येथील भगवानदास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे साइने निवेदनात म्हंटले आहे.
खेळाडूंची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना राष्ट्रीय शिबिरामध्ये प्रवेश देण्यात आला होता. “शिबिरासाठी जाहीर केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार, सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची १२ ऑक्टोबर रोजी करोना चाचणी करण्यात आली. यात अंकितचा Para Archer | अहवाल पॉझिटिव्ह Coronavirus positive | आढळला,” अशी माहिती साइतर्फे देण्यात आली.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अंकितला साइच्या सोनिपत चिकित्सा केंद्रात क्वारंटाइन करण्यात आले होते. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसाठी ‘खेलो इंडिया अगेन’ उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय शिबिर आयोजित केले आहे.