All Sportssports newsTennis

Novak Djokovic disqualified from U.S. Open | जोकोविचला नडला संताप

 

जोकोविचला नडला संताप


Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]

टेनिसपटूंचं संतापणं नवं नाही. मात्र, नोवाक जोकोविचलाही जेव्हा संताप येतो तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात. हाच संताप त्याला नडला आणि अमेरिकन ओपन US Open | स्पर्धेतून त्याला बाहेर व्हावं लागलं. Novak Djokovic disqualified from U.S. Open |

Novak Djokovic disqualified from U.S. Open | नोवाक जोकोविच 7 सप्टेंबर 2020 रोजी अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत पोहोचला होता. हा सामना खेळत असताना संतापाच्या भरात त्याने मारलेला चेंडू ‘लाइन जज’च्या गळ्याला लागला.

अनवधानाने घडलेल्या या चुकीचा जबर फटका जोकोविचलाच बसला. त्याची यूएस ओपन US Open | स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे सलग 29 सामने जिंकणाऱ्या जोकोविचचा विजयी रथ थांबला आहे.

Novak Djokovic disqualified from U.S. Open Novak Djokovic disqualified from U.S. Open | यूएस ओपनचं US Open | विजेतेपद जोकोविचसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. कदाचित त्याचा हा कारकिर्दीतला 18 वा ग्रँडस्लॅम किताब असता. मात्र, एका चुकीमुळे हे आता स्वप्न भंगलं आहे.

आर्थर अॅश स्टेडियमवर (arthur ashe stadium) हा सामना सुरू होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नोवाक जोकोविच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत जोकोविचसमोर पाब्लो कारेनो बस्टाचे आव्हान होते.

जोकोविच पहिला सेटमध्ये 6-5 असा पिछाडीवर होता. संतापात त्याने बेसलाइनच्या मागे चेंडू रॅकेटने मारला. दुर्दैवाने चेंडूचा फटका थेट लाइन जज असलेल्या महिलेच्या गळ्याला लागला. त्या वेळी ही महिला गुडघ्यावर बसलेली होती.

नोवाक जोकोविचच्या Novak Djokovic | या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. नेटजवळ येत चेयर अंपायर ऑरिली टुरटे, टूर्नामेंट रेफ्री सोरेन फ्रीमेल आणि ग्रँडस्लॅम पर्यवेक्षक आंद्रियास इगली यांच्यात जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली.

Novak Djokovic disqualified from U.S. Open त्या वेळी जोकोविच माफी मागताना दिसला. सामन्याबाबत निर्णय देणारे फ्रीमेल म्हणाले, ‘‘जोकोविचचं म्हणणं आहे, की मी जाणूनबुजून लाइन जजला चेंडू मारलेला नाही. तो म्हणालाही, मी संतापात होतो. मी रॅकेटने चेंडू मारलाही. तो लाइन जजला लागला. होय, मी चेंडू मारला. पण माझा तसा कोणताही हेतू नव्हता. मी जाणूनबुजून असे केलेले नाही. त्याचं असंही म्हणणं होतं, की मला याबद्दल शिक्षा नकोय’’

फ्रीमेल म्हणाले, ‘‘त्याच्या मताशी आम्हीही सहमत होतो, की त्याने हे जाणूनबुजून केलेलं नाही. मात्र, हेही खरं आहे, की त्याने लाइन जजला चेंडू मारला आहे. त्यात तिला दुखापतही झाली आहे.’’

अखेर जोकोविचने कारेनो बस्टाशी हस्तांदोलन करीत कोर्ट सोडले. त्यानंतर टुरटे यांनी जाहीर केले, की जोकोविचने चूक केली आहे. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे.

कारेनो बस्टाने नंतर व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. तो म्हणाला, ‘‘या प्रकाराने मी काहीसा हैरान झालो होतो.’’

जोकोविचने कोणत्याही माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला नाही. मात्र, काही तासांनंतर त्याने आपला माफीनामा जाहीर केला.

जोकोविचने माफीनाम्यात नमूद केले, की ‘‘या संपूर्ण प्रकाराने मला वेदना झाल्या आहेत. मी लाइन जजची चौकशीही केली. स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले, की तिला आता बरे वाटत आहे. माझ्यामुळे तिला झालेल्या त्रासाबद्दल मला खेद वाटतो. मी जाणूनबुजून असे केलेले नाही. हे अत्यंत चुकीचे झाले आहे.’’

तो म्हणाला, ‘‘राहिला प्रश्न मला दोषी ठरवण्याचा. मात्र, हा मला मिळालेला एक धडा आहे, ज्याचा उपयोग मी एक उत्तम खेळाडू आणि माणूस म्हणून अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करीन. अमेरिकन ओपनशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची मी माफी मागतो.’’

जोकोविचला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. याबाबत कारेनो बस्टाला विचारण्यात आले, की जोकोविचला हा सामना पुन्हा खेळू देण्याची परवानगी द्यायला हवी होती का?

त्यावर बस्टा म्हणाला, ‘‘नियम सर्वांना सारखे असतात. रेफरी आणि पर्यवेक्षकांनी योग्य निर्णय घेतला आहे. मात्र, तो घेणेही सोपे नव्हते.’’

अमेरिकी टेनिस संघटनेने (यूएसटीए) यावर अधिकृत मत व्यक्त केले आहे. संघटनेने म्हंटले आहे, की ‘‘फ्रीमेल यांना जोकोविच दोषी आढळला. ग्रँडस्लॅमच्या नियमांनुसार खेळाडूने जाणूनबुजून किंवा बेफिकिरीने मारलेला चेंडू धोकादायक मानला जातो. ते नियमांचे उल्लंघन आहे.’’

यूएसटीएने म्हंटले आहे, की जोकोविचने स्पर्धेत मिळालेले रँकिंगचे गुण आणि बक्षिसाच्या रूपामने मिळणारी अडीच लाख डॉलरची रक्कमही त्याला दिली जाणार नाही.

जोकोविचने दिवसाच्या सुरुवातीचे सत्रच 26-0 या विक्रमाने केली. एवढेच नाही, तर 2019 मध्येही त्याने अखेरचे तीन सामने जिंकले होते.

गेल्या वर्षी जोकोविचने एकूण सात ग्रँडस्लॅमपैकी पाच किताब जिंकले होते. या किताबांमुळेच त्याच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या 17 वर पोहोचली.

रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या अनुपस्थितीत अमेरिकन ओपन खेळणारा जोकोविच स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, एका चुकीमुळे त्याला या स्पर्धेपासून वंचित राहावे लागणार आहे.

अर्थात, जोकोविचने लाइन जजला जाणूनबुजून चेंडू मारलेला नव्हता हे स्पष्टच होतं. त्याने जेव्हा रॅकेटने चेंडू मारला तेव्हा त्याने त्या लाइन जज महिलेकडे पाहिलेलेही नव्हते.

जेव्हा त्याला जाणवलं, की चेंडू लाइन जज महिलेच्या गळ्याला लागला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे जाणवत होती.

जोकोविचआधीही अनेकांना जावे लागले होते बाहेर

नोवाक जोकोविच हा एकमेव नाही, की त्याला स्पर्धा अर्ध्यावर सोडून बाहेर जावे लागले. कॅनडाचा डेनिस शापोवालोवला 2017 मध्ये अशाच प्रकारे सामना गमवावा लागला होता. ब्रिटनविरुद्ध झालेल्या डेव्हिस कप सामन्यात शापोवालोवला सामना सोडावा लागला होता. त्याने चुकून अंपायरच्या चेहऱ्यावर चेंडू मारला होता.

अशीच एक घटना विम्बल्डनमध्येही घडली होती. 1995 च्या विम्बल्डन स्पर्धेत टिम हेन्मन याने दुहेरीच्या सामन्यादरम्यान ‘बॉल गर्ल’च्या डोक्यावर चेंडू मारला होता. त्यामुळे त्याला सामना गमवावा लागला होता.

[jnews_block_18 first_title=”Read more…” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”90″] [jnews_block_18 first_title=”Read also…” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”78″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!