पुढची जागतिक महामारी ‘एमपॉक्स’?
आफ्रिकन संशोधक ‘एमपॉक्स’बाबत वारंवार आवाहन करीत होते. मात्र, कुणीही लक्ष दिलं नाही. आता ‘एमपॉक्स’ जागतिक महामारी म्हणून समोर येत आहे.
पुढची जागतिक महामारी ‘एमपॉक्स’?
आफ्रिकन संशोधकांनी ‘एमपॉक्स’ची लक्षणे, उपचार आणि संसर्ग रोखणाऱ्या उपकरणांमध्ये जागतिक गुंतवणूक वाढविण्याची गरज याबाबत वारंवार आवाहन करीत होते. मात्र, कुणीही लक्ष दिलं नाही. आता 2022-23 मध्ये ‘एमपॉक्स’ एक जागतिक महामारी म्हणून समोर येत आहे.
जोहान्सबर्ग : आफ्रिकेक सध्या ‘एमपॉक्स’ (MPOX)चा प्रकोप वाढला आहे. ही माझी नाही तर दुसऱ्याची समस्या आहे, या खुळचट धारणेमुळे संसर्गजन्य आजार किती जीवघेणा ठरू शकतो, याचं हे आणखी एक उदाहरण.
विशेष म्हणजे गरीब आणि विकसनशील देशांना प्रभावित करणारा हा आजार अचानक जगासाठी अप्रत्यक्षपणे धोक्याची घंटा बनण्याची भीती आहे.
आजार दुर्लक्षित करण्याची फळं आपण भोगत आहोत. त्यातली महत्त्वाची उदाहरणं म्हणजे वेस्ट नाइल, झिका आणि चिकनगुनियाचे विषाणू.
‘एमपॉक्स’चा शोध 1958 (पिंजऱ्यात बंद केलेल्या माकडांपासून झालेला आजार. म्हणूनच या आजाराला ‘मंकीपॉक्स’ (monkeypox) म्हंटले जाते. मानवात या आजाराची लक्षणे सर्वप्रथम 1970 मध्ये दिसली.
त्यानंतर अनेक दशके उलटली. संशोधक आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांनी या संसर्गजन्य आजाराकडे पूर्णत: दुर्लक्ष केलं. कारण काय, तर हा आजार आफ्रिकेतील बहुतांश दुर्गम ग्रामीण भागांत पसरणारा असामान्य संसर्ग होता, ज्याची उर्वरित विश्वाला भणकही लागलेली नव्हती.
जेव्हा ‘एमपॉक्स’ने 2022 मध्ये विकसित देशांना विळखा घालण्यास सुरुवात केली, तेव्हा संशोधक खडबडून जागे झाले. मग या आजारात लक्ष घालणाऱ्या संशोधकांचीही संख्या वाढत गेली. एप्रिल 2022 नंतर केवळ एका ‘मेडिकल सर्च इंजिन’वरच गेल्या साठ वर्षांच्या तुलनेत अधिक शोध करण्यात आले.
आफ्रिकन संशोधकांनी ‘एमपॉक्स’ची लक्षणे, उपचार आणि संसर्ग रोखणाऱ्या उपकरणांमध्ये जागतिक गुंतवणूक वाढविण्याची गरज याबाबत वारंवार आवाहन करीत होते. मात्र, कुणीही लक्ष दिलं नाही. आता 2022-23 मध्ये ‘एमपॉक्स’ एक जागतिक महामारी म्हणून समोर येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) मध्य आफ्रिकेत ‘एमपॉक्स’च्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता आता हा आजार आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केली आहे. हा अशा आजारांसाठी गंभीर इशारा आहे, ज्या देशांत सार्वजनिक आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. अशा वेळी आंतरराष्ट्रीय प्रतिसादाची गरज असते.
हतबलतेचे कारण 2022 चा उद्रेक
या आजाराला ‘एमपॉक्स’ म्हणून नवीन नाव दिले गेले. मात्र, या विषाणूचं नाव अजूनही ‘मंकीपॉक्स’ (MPXV) हेच आहे. त्याचा ‘स्मॉलपॉक्स विषाणू’शी जवळचा संबंध आहे.
‘एमपीएक्सव्ही’ला मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील काही भागांत संसर्गजन्य आजारांच्या रूपात ओळखले जात होते. हा मुख्यत्वे जंगली सस्तन प्राण्यांशी आलेल्या संपर्कातून पसरला आहे. मात्र, हा संसर्ग मानवापासून मानवाला झाल्याचा कोणताही पुरावा नाही.
काही निवडक क्षेत्राबाहेर हा संसर्ग एखाददुसऱ्याला होत असल्याच्या घटना अधूननमधून समोर येत होत्या. त्यातही संसर्गाच्या घटना संसर्ग झालेल्या प्रवाशांमुळे किंवा पुन्हा संक्रमित लहान सस्तन प्राण्यांच्या आयातीमुळे समोर येत होत्या.
अर्थात, 2022 मध्ये अचानक यात बदल झाला. जेव्हा 116 देशांमध्ये 99,000 पेक्षा अधिक घटना नोंदवल्या गेल्या, तेव्हा या आजाराचा वैश्विक उद्रेक जाणवला. केवळ ऑगस्ट 2022 मध्ये दर आठवड्याला ‘एमपॉक्स’चे 6,000 पेक्षा अधिक घटना समोर आल्या. अचानक झालेला हा उद्रेक सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा होता. कारण बहुतांश प्रकरणे अशा देशांतून समोर आले, जेथे बहुतांश पुरुष पुरुषांशीच लैंगिक संबंध ठेवत असताना संक्रमित झाले. भलेही यातील बरीच प्रकरणे वैद्यकीयदृष्ट्या गंभीर नव्हत्या. मृतांची संख्याही 200 च्या आसपासच राहिली. मात्र, 23 जुलाई 2022 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गजन्य आजाराचा वैश्विक उद्रेक पाहता, सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.
सुदैवाने धोकादायक समूहांमध्ये वर्तनातील बदल आणि लसीकरण केल्यामुळे संसर्ग प्रकरणांत लवकरच घट झाली. ‘एमपॉक्स’साठी दिली जाणारी आधुनिक व्हॅक्सिन आणि रोगप्रतिबंधक औषधे उच्च उत्पन्नगटातील अनेक प्रभावित देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. अमेरिका आणि युरोपात या व्हॅक्सिन आणि औषधांना मुख्यत्वे पॉक्सव्हायरसचा उपयोग करून संभाव्य जैविक शस्त्रे म्हणून हल्ल्याच्या तयारीसाठी विकसित करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिली ‘एमपॉक्स’ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी मे 2023 मध्ये जाहीर करण्यात आली होती.
आफ्रिकेतील रुग्णसंख्येत वाढ
आफ्रिकन भागात ‘एमपॉक्स’च्या प्रकरणांत वाढ पाहायला मिळत आहे. तेथे या आजाराची सुरुवात 2023 मध्ये झाली होती. आफ्रिका खंडात, जेथे निवडक क्षेत्राचाही समावेश आहे, तेथे ‘एमपॉक्स’ दीर्घकाळापासून पसरलेला होता. आता तिथे जटिल वातावरण दिसत आहे.
काही निवडक ठिकाणांपुरता मर्यादित असलेला ‘एमपॉक्स’आता मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्याचं कारण 2022 च्या वैश्विक उद्रेकाशी आहे. उदाहरणार्थ सर्वाधिक चिंताजनक स्थिती दक्षिण आफ्रिकेची आहे, जेथे एमपीएक्सव्ही क्लेड आयबी संसर्गरुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या संसर्गाची सुरुवातीची प्रकरणे काँगोमध्ये नोंदवली गेली होती.
नवा आणि धोकादायक विषाणू
सध्या विषाणू ‘आय एमपीएक्सव्ही’ (ज्याला यापूर्वी विषाणूचा काँगो बेसिन प्रकार म्हंटला जायचा) ‘क्लेड टू’ (clade II) (पश्चिम आफ्रिकन प्रकार) विषाणूच्या तुलनेत अधिक संक्रामक आहे आणि यात लोकांचा मृत्यू जाण्याचा धोका अधिक असतो. सध्या संक्रमणाचा केंद्रबिंदू पूर्वेतील डीआरसीचा दक्षिण किवू प्रांत आहे आणि यात एका मोठ्या महामारीला आकार देण्याची क्षमता आहे. हा विषाणू वेगळ्या प्रकारचा आहे. तो बऱ्याचदा लैंगिक संबंधामुळे मानवातून मानवाकडे सहजपणे पसरू शकतो. याची संक्रमणक्षमता वाढू शकते. (मात्र आपल्याला अद्याप माहिती नाही).
हा विषाणूचा ज्येष्ठांना धोका अधिक
विषाणूच्या नव्या प्रकारच्या प्रकरणांमध्ये मृत्यूदर 2022 च्या वैश्विक उद्रेकाच्या तुलनेत अधिक आहे. या उद्रेकामुळे अनेक शेजारी देशांमध्ये ‘एमपॉक्स’ची प्रकरणे समोर आली आहेत. यात काही (जसे केनिया) असे देशही आहेत, जेथे या विषाणूची कोणतीही पार्श्वभूमी नाही. आव्हान मोठे आहे. पूर्व डीआरसी भाग अनेक समस्यांनी घेरलेला आहे. तेथे नैसर्गिक आपत्ती आणि हिंसेशिवाय खसरा, हैजा आणि पोलिओसारखे आजार पसरले आहेत.
काय करायला हवे?
हा उद्रेक रोखण्यासाठी आणि संभाव्य महामारी होण्यापासून रोखण्यासाठी काय करायला हवे, याची माहिती दि लान्सेट ग्लोबल हेल्थ’मधील एका लेखात नमूद केलेली आहे. लस आणि अँटिव्हायरल उपचारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय वचनबद्धता आणि आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे. याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना, संचारमार्ग आणि वैद्यकीय तपासणीबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी वैज्ञानिक शोधाची गरज आहे.
कोरोना महामारीमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या स्थगित
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com
2 Comments