मोदी रैनाला म्हणाले, ‘निवृत्त’ शब्द तुला शोभणार नाही!
अहमदाबादमध्ये २०११ च्या वर्ल्डकप स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत खेळत होता. त्या वेळी सुरेश रैनाचा अप्रतिम कव्हर ड्राइव्ह मला अजूनही आठवतो. या मनमोकळ्या स्वभावाच्या खेळाडूची उणीव चाहत्यांना नेहमीच जाणवत राहील… Modi writes a letter to Raina |
ही प्रतिक्रिया आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही मिनिटांतच सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला.
हे दोन्ही धुरंधर खेळाडू आणि जीवलग मित्र आता चेन्नई सुपरकिंग्ससाठी इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळणार आहेत.
धोनीला गौरवपत्र लिहिल्यानंतर मोदींनी रैनालाही दोन पानी पत्र लिहिलं आहे. Modi writes a letter to Raina | ते म्हणाले, ‘‘तुम्ही तर अजून खूपच तरुण आणि ऊर्जावान आहात. त्यामुळे मी तुमच्यासाठी ‘संन्यास’ शब्द वापरणार नाही.’’
धोनीनंतर रैनानेही मोदींचे हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. Modi writes a letter to Raina |
मोदींनी पत्रात नमूद केले आहे, ‘‘क्रिकेट कारकिर्दीत तुम्हाला दुखापतीमुळे अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, तुम्ही प्रत्येक वेळी या आव्हानांना परतावून लावले.’’
सुरेश रैनाने (Suresh Raina) पंतप्रधानांचे आभार मानत ट्वीट केले, ‘‘जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा आम्ही देशासाठी घाम गाळतो. देशातील नागरिकांकडून, तसेच पंतप्रधानांकडून मिळालेल्या प्रेमापेक्षा दुसरी कोणतेच कौतुक मोठे नाही. धन्यवाद नरेंद्र मोदीजी तुमच्या शुभेच्छांबद्दल…’’
मोदींनी पत्रात २०११ च्या वर्ल्डकपमधील रैनाच्या खेळीची आठवण नमूद केली आहे. Modi writes a letter to Raina |
ते म्हणाले, की मोटेरा स्टेडियममधील २०११ च्या वर्ल्डकपमध्ये भारत उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होता. त्या वेळी रैनाच्या नाबाद ३४ धावांच्या खेळीचा मी पुरेपूर आनंद लुटला होता.
त्यांनी पुढे लिहिले, ‘‘२०११ च्या वर्ल्डकपमधील आपली प्रेरणादायी भूमिका भारत कधीही विसरणार नाही. मोटेरा स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या डावात तुम्ही सगळी सूत्रं आपल्या हाती घेतल्याचे मी तुम्हाला पाहिले होते.’’
Modi writes a letter to Raina | मोदी म्हणाले, ‘‘मला विश्वास आहे, की चाहत्यांना तुमच्या कव्हर डाइव्हची उणीव सतत भासत राहील, जी मी त्या सामन्यात पाहिली होती.’’
मोदींनी रैनाची ही खेळी त्या वेळी पाहिली होती, ज्या वेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी रैनाला परिपक्व ‘टीम मॅन’ म्हंटले होते. जो दुसऱ्यांच्या यशात आनंद व्यक्त करतो तो टीम मॅन असतो.
त्यांनी लिहिले, ‘‘सुरेश रैना नेहमीच सांघिक भावनेसाठी आठवणीत राहतील. तुम्ही वैयक्तिक विक्रमासाठी नाही, तर संघ आणि देशाच्या गौरवासाठी खेळला आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘संघात तुमचा उत्साह प्रेरणादायी होता आणि आम्ही पाहिले आहे, की प्रतिस्पर्धी संघाची विकेट पडल्यानंतर सर्वांत आधी तुम्हीच आनंद व्यक्त करीत होता.’’
मोदी म्हणाले, ‘‘एक फलंदाज म्हणून तुम्ही सर्व क्रिकेट प्रकारांमध्ये विशेषत: टी-२० मध्ये उत्तम कामगिरी बजावली होती. हे सोपे मुळीच नाही.’’
Modi writes a letter to Raina | ते म्हणाले, ‘‘टी-२० मध्ये उत्साह, ऊर्जा असावी लागते. तुमचा वेग आणि चैतन्य संघासाठी मदतगार ठरले आहे.’’
पंतप्रधान मोदी यांनी रैनाच्या क्षेत्ररक्षणातील कौशल्याचेही कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘‘तुमचं क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिले. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही सुंदर झेलही आपण टिपले. चपळ क्षेत्ररक्षणामुळे आपण अनेक धावा वाचवल्या आहेत.’’
त्यांनी स्वच्छ भारत अभियान आणि महिला सशक्तीकरणातील योगदानासाठीही रैनाचे कौतुक केले.
ते म्हणाले, ‘‘मला आनंद आहे, की आपण भारताच्या सास्कृतिक मुळांशीही जोडलेले आहात. आपल्या गौरवशाली लोकाचाराबरोबरच भारतीय मूल्यांशी तरुणांना जोडून हे नातं आणखी घट्ट केल्याचा मला तुमचा अभिमान आहे.’’
मोदी म्हणाले, ‘‘मला विश्वास आहे, की तुम्ही भविष्यात जे काही कराल, त्यातही अशीच यशस्वी खेळी कराल.’’
One Comment