या क्रिकेटपटूला घ्यावे लागले होते रेबिजचे इंजेक्शन
भारतीय क्रिकेटच्या इतिहासाचे साक्षीदार वसंत रायजी यांचे निधन झाले, त्याच दिवशी न्यूझीलंडच्याही क्रिकेटच्या इतिहासातील एक पान गळून पडलं. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू मॅट पुरे Matt Poore | यांचं 13 जून 2020 रोजी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.
मॅट यांच्याबाबत भारतातील एक गमतीदार आठवण आहे, ज्यामुळे मॅट Matt Poore | यांना आजही ओळखले जाते. 1955 मध्ये बेंगलुरूमधील एका सामन्यात खेळत असताना मॅट यांनी एक भटका कुत्रा पकडला होता. त्यामुळे त्यांना 12 अँटी रेबिजचं इंजेक्शन rabies | द्यावी लागली होती.
ही घटना अशी होती… ‘‘1955 मध्ये न्यूझीलंडचा भारत दौऱ्यावर होता. त्या वेळी बेंगलुरूमध्ये न्यूझीलंडचा संघ खेळत असतानाच एक भटका कुत्रा अचानक मैदानात आला. त्याला पकडण्यासाठी मॅट Matt Poore | धावले. त्याला पकडलं आणि खेळपट्टीपासून लांब हाकललं. पण न्यूझीलंडच्या संघात एका भीतीने ग्रासले, ते म्हणजे या कुत्र्यामुळे त्यांना रेबिज झाली तर नाही ना? त्या वेळी भारत दौऱ्यावर त्यांच्यासोबत डॉक्टर नव्हता. त्यामुळे मॅट यांनी पुढचे दोन आठवडे रोज एक अँटी रेबिजचं rabies | इंजेक्शन घ्यावं लागलं. त्यांनी 12 इंजेक्शन घेतली. त्यातील काही इंजेक्शन तर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना टोचली होती.’’ ही माहिती मॅट यांचा मुलगा रिचर्ड यांनी दिली.
अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे मॅट यांनी 1953 ते 1956 दरम्यान 14 सामने खेळले होते. त्या वेळचे महान खेळाडू म्हणून गणले गेलेले बर्ट सुटक्लिफ आणि जॉन रीड यांच्यासोबत खेळण्याचा मान त्यांना मिळाला होता.