मुलांचा स्क्रीन टाइम (Screen Time) सकारात्मक?
स्क्रीनवर वेळ वाया घालवणं म्हणजे वेळेचा अपव्ययच मानला जातो. त्यामुळे जर लोक विश्रांतीसाठी किंवा आपला मूड ठीक राहण्यासाठी...
मुलांचा स्क्रीन टाइम (Screen Time) सकारात्मक?
स्क्रीनवर वेळ वाया घालवणं म्हणजे वेळेचा अपव्ययच मानला जातो. त्यामुळे जर लोक विश्रांतीसाठी किंवा आपला मूड ठीक राहण्यासाठी स्क्रीन पाहत असले तरी त्यांना अपराधीपणाचे वाटते.
Robin Nabi, University of California, Santa Barbara
सांता बार्बरा : कोणत्या मातापित्यांसोबत असं झालं नसेल बरं? दिवसभर काम केल्यानंतर तुम्हाला आता रात्रीचा स्वयंपाकही करायचा आहे. कदाचित उद्यासाठीही स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि आता तुमच्याकडे एवढी शक्तीही उरली नाही, की मुलांना काही कलात्मक करण्यासाठी किंवा काही पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित करावे.
याउलट जर ते आयपॅडवर अधिक वेळ घालवण्याचा हट्ट करीत असतील तर तुम्ही त्याचा हट्ट पुरवतात किंवा असंही होऊ शकतं, की ते काही वेळ यूट्यूब व्हिडीओ पाहिल्यानंतर आपला गृहपाठ पूर्ण करण्याचं मान्य करतात.
उगाच वाद घालण्यापेक्षा यावर सहमत होणं केव्हाही चांगलं. आता तुम्ही केवळ थकलेलेच नाही, तर तुमच्या मनात एक अपराधाची भावनाही होते, की तुम्ही वाईट मातापिता आहात.
जर तुम्हाला असं वाटत असेल तर असा विचार करणारे तुम्ही एकटेच नाहीत. मुले मीडियाचा कसा आणि किती वापर करतात, या विषयावर आईवडिलांना ग्लानी वाटणं स्वाभाविक आहे आणि हे योग्यही आहे. कारण स्क्रीनवर वेळ वाया घालवणं म्हणजे वेळेचा अपव्ययच मानला जातो. त्यामुळे जर लोक विश्रांतीसाठी किंवा आपला मूड ठीक राहण्यासाठी स्क्रीन पाहत असले तरी त्यांना अपराधीपणाचे वाटते. आणि ही भावना स्क्रीनवर वेळ घालवून तणाव कमी करण्याचा आनंदही हिरावून घेते.
ही अपराधीपणाची भावना भलेही आवडत नसली तरी चांगली बातमी ही आहे, की जर तुम्ही या भावनांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी उत्तम पर्याय अवलंबण्यासाठी ही भावना प्रोत्साहित करू शकते.
मुलांकडून स्क्रीन वापरामुळे (Screen Time) पालकांककडून अपराधीपणाची भावना
माझ्या माध्यम शोधसमूहासह विविध अभ्यासांतून आढळलं, की सर्व वयोगटांतील लोकांमध्ये तणाव कमी करणे, विश्रांती घेणे आणि आनंदासाठी स्क्रीन माध्यमाचा वापर करणे सामान्य बाब झाली आहे.
मात्र, आईवडील आपल्या मुलांच्या स्क्रीन वापराबाबत चिंताग्रस्त आहेत आणि यामागे योग्य कारणही आहे. योग्य व्यवस्थापनाशिवाय स्क्रीनवर वेळ घालणे सहजपणे नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे झोप कमी होणे, लठ्ठपणा वाढणे, शैक्षणिक कामगिरीत मागे पडणे आणि मानसिक आजारासंबंधीच्या आव्हानांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
आईवडील बराच वेळ स्क्रीन वापराशी संबंधित नुकसान टाळण्यासाठी मुलांवर अनेक नियम करतात. मात्र आमच्या शोधातून असे आढळले, की बहुतांश मातापिताच हे नियम मोडतात. जर एखादा मुलगा आजारी असेल तर त्याला काही तास व्हिडीओ गेम खेळण्यास का देऊ नये? असंही होऊ शकतं, की तुम्ही तुमच्या मुलांना टीव्हीसमोर बसवतात. कारण काय, तर तो व्यस्त राहावा आणि तुम्ही तुमची आवश्यक कामे करू शकाल.
जर तुम्ही तुमचेच नियम स्वत:च मोडतात, तेव्हा काय होतं? विशेषत: जेव्हा ते नियम तुमच्या मुलांच्या सुरक्षेसाठी केलेले असतील. तुमच्यात अपराधीपणाची भावना बळावते, जे तणावाचेच एक रूप आहे. आईवडील आणि मुले या दोघांसाठीही ते वाईट असू शकते.
स्क्रीन वापराबाबत (Screen Time) आईवडिलांमध्ये अपराधीपणाची भावना ही नकारात्मक बाजू
कोविड-19 महामारीदरम्यान जेव्हा अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व लोकांकडून माध्यमांच्या वापरात वाढ झाली. त्या वेळी माझ्या शोध पथकाला मुलांच्या स्क्रीन वापरावरून आईवडिलांना जाणवणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेवर अभ्यास करण्याची अनोखी संधी मिळाली.
आम्ही मार्च 2020 मध्ये आईवडिलांच्या एका समूहावर सर्वेक्षण केले आणि नंतर एप्रिल व मे 2020 मध्ये आणखी एका समूहावर सर्वेक्षण केले.
आम्हाला आढळलं, की 73 टक्के आईवडिलांना थोडीशी अपराधीपणाची जाणवली आणि 48 टक्के आईवडिलांना मध्यम ते अधिक स्तराची अपराधभावना जाणवली.
अपराधीपणाला सकारात्मक पैलूत बदलणे
आईवडील काय करू शकतात? माध्यम पर्यायांबाबत कथित चुका किंवा गैरसमजांसाठी स्वत:ला कोसण्यापेक्षा आपल्या अपराधीपणापासून शिकणे अधिक चांगले.
या चिंतनामुळे तुमचे कुटुंब कोणत्या प्रकारच्या स्क्रीनचा वापर करीत आहे, याचा विचार करण्याची एक संधीच मिळत नाही, तर कुटुंबाच्या आनंदासाठी काय पावले उचलायला हवीत, याचाही विचार करण्याची संधी मिळते.
तुम्ही साधारणपणे हे ऐकलं नसेल, पण स्क्रीन माध्यमाचा उपयोग नेहमीच वाईट नसतो. वास्तवात स्क्रीनचा वापर आणि यावर पाहिली जाणारी सामग्री अनेक प्रकारच्या अद्भुत परिणामांत योगदान देऊ शकते. यामुळे तुम्ही काही तरी नवं शिकू शकतात, सामाजिक रूपाने जोडले जाऊ शकतात, प्रेरणा घेऊ शकतात आणि तणावाला दूर करू शकतो.
मुलांसाठी डबाबंद दूध अनावश्यक!
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com