Greg Barclay elected ICC chairman | न्यूझीलंडचे ग्रेग बारक्ले आयसीसीचे नवे चेअरमन
न्यूझीलंडचे ग्रेग बारक्ले आयसीसीचे नवे चेअरमन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी न्यूझीलंड क्रिकेटचे (NZC) प्रमुख ग्रेग बारक्ले Greg Barclay | यांची निवड झाली आहे. Greg Barclay elected ICC chairman |
सिंगापूरचे इम्रान ख्वाजा यांना पराभूत करीत बारक्ले आता भारताचे शशांक मनोहर यांची जागा घेणार आहेत. आयसीसीच्या (ICC) त्रैमासिक बैठकीदरम्यान २५ नोव्हेंबर २०२० रोजी अध्यक्षपदासाठी ICC chairman | मतदान झाले.
इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत क्रिकेट मंडळाच्या 16 संचालकांनी भाग घेतला. यात कसोटी खेळणाऱ्या देशांचे १२ पूर्ण सदस्य, तीन सहाय्यक सदस्यदेश आणि एक स्वतंत्र महिला निदेशक (‘पेप्सीको’च्या इंदिरा नुई) यांचा समावेश होता.
Greg Barclay elected ICC chairman
बारक्ले Greg Barclay | यांनी सांगितले, ‘‘आयसीसीच्या (ICC) अध्यक्षपदी निवड होणे ही सन्मानाची बाब आहे आणि ज्या आयसीसी निदेशकांनी मला समर्थन दिले त्यांचा मी आभारी आहे. आशा करतो, की आम्ही एकजुटीने क्रिकेटला पुढे घेऊन जाऊ. जागतिक महामारीतून पुन्हा सक्षमतेने वापसी करू.’’
न्यूझीलंडचे बारक्ले यांनी इम्रान ख्वाजा यांचा ११-५ असा सहा मतांनी पराभव केला. दुसऱ्या टप्प्यात बारक्ले यांना क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे महत्त्वपूर्ण मत मिळाले. ICC chairman | त्यामुळेच ते विजय मिळविण्यात यशस्वी ठरले.
गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात बारक्ले यांना 10 आणि ख्वाजा यांना सह मते मिळाली होती. मात्र, सध्याच्या आयसीसीच्या नियमानुसार विजेत्या उमेदवाराला दोनतृतीयांश मते मिळणे आवश्यक आहे.
म्हणजे एकूण १६ सदस्यांपैकी किमान ११ मते मिळाली तरच बारक्ले विजेते होणार होते. आयसीसीचे सीईओ मनू साहनी मंडळाचे 17 वें सदस्य आहेत. मात्र, त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता.
असं मानलं जात आहे, की भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त न्यूजीलंडने बारक्ले यांना मते दिली. न्यूझीलंडने द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळण्यास समर्थन दिले होते.
महामारीमुळे आर्थिक डबघाईस आलेल्या क्रिकेट मंडळांना उभारी घेण्यासाठी अशा मालिका साह्यभूत ठरणार होत्या. त्यामुळे न्यूझीलंडची ही भूमिका या मंडळांच्या भूमिकेशी अनुकूल अशीच होती, ज्याचा फायदा बारक्ले यांना मिळाला.
दुसऱ्या बाजूला ख्वाजा यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे समर्थन मिळाले होते. सिंगापूर क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले ख्वाजा आयसीसीच्या स्पर्धांची संख्या वाढविण्याच्या बाजूने होते. त्यामुळे सहाय्यक सदस्यदेशांना आर्थिक निधी वाढण्यास मदत होईल.
कोण आहेत बारक्ले ?
ऑकलंडमध्ये व्यवसायाने वकील असलेले बारक्ले 2012 पासून एनझेडसी (NZC) मंडळाशी जोडलेले आहेत. ते सध्या आयसीसीमध्ये न्यूझीलंड क्रिकेड मंडळाचे प्रतिनिधी आहेत. आता ते स्वतंत्र अध्यक्ष झाल्याने ते प्रतिनिधिपदाचा राजीनामा देतील.
बारक्ले २०१५ मध्ये आयसीसीच्या क्रिकेट विश्वकरंडक (पुरुष) स्पर्धेच्या निदेशकपदी होते. ते नार्दर्न डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट संघटनेचे माजी सदस्य आणि अध्यक्ष होते.
ICC Chairman List
नाव |
देश |
कार्यकाळ |
|
1 |
कॉलिन काउड्रे |
इंग्लंड |
1989–1993 |
2 |
क्लायड वालकॉट |
वेस्ट इंडीज |
1993–1997 |
3 |
जगमोहन दालमिया |
भारत |
1997–2000 |
4 |
माल्कम ग्रे |
ऑस्ट्रेलिया |
2000–2003 |
5 |
एहसान मनी |
पाकिस्तान |
2003–2006 |
6 |
पर्सी सोन |
दक्षिण आफ्रिका |
2006–2007 |
7 |
रे माली |
दक्षिण आफ्रिका |
2007–2008 |
8 |
डेव्हिड मॉर्गन |
इंग्लंड |
2008–2010 |
9 |
शरद पवार |
भारत |
2010–2012 |
10 |
अॅलन इसाक |
न्यूझीलंड |
2012–2014 |
11 |
मुस्तफा कमाल |
बांगलादेश |
2014–2015 |
12 |
झहीर अब्बास |
पाकिस्तान |
2015–2016 |