Uncategorized

धक्कादायक! या भारतीय खेळाडूने केली आई आणि पत्नीची हत्या!

धक्कादायक! या भारतीय खेळाडूने केली आई आणि पत्नीची हत्या!

भारतासाठी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवून देणारा इकबाल सिंह Former athlete | या माजी खेळाडूला आई आणि पत्नीच्या हत्याप्रकरणी kills wife and mother | अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.  

‘द फिलाडेल्फिया इन्क्वायरर’ने वृत्तपत्राने अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हंटले आहे, की पेनसिल्वानियातील डेलवारे कौंटीत राहणारा ६२ वर्षीय इकबाल सिंहने रविवारी, २३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी फोन केला आणि आपला गुन्हा कबूल केला आहे. 

पोलिस जेव्हा न्यूटाउन टाउनशिपमध्ये इकबालच्या घराच्या आवारात पोहोचले तेव्हा इकबाल रक्ताने माखलेला होता. त्याने स्वत:लाच जखमी केले होते. घरात दोन महिलांचे मृतदेह पडलेले होते. इकबालवर सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी खुनाचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला जामीन मिळालेला नाही. 

इकबालने आपली बाजू मांडण्यासाठी कोणत्याही वकिलाची सेवा घेतलेली नाही. इकबाल गोळाफेकचा खेळाडू होता. त्याने १९८३ मध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. त्याच्या क्रीडा कारकिर्दीतील ही सर्वांत मोठी कामगिरी होती. 

त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला होता. अमेरिकी माध्यमांच्या वृत्तानुसार, तो टॅक्सी कॅब ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. ‘एनबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, इकबालला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”62″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!