टेनिसपटू फॅबिओ फोगिनीनी करोना पॉझिटिव्ह | Fabio Fognini coronavirus positive
Fabio Fognini coronavirus positive
टेनिसपटू फॅबिओ फोगिनीनी करोना पॉझिटिव्ह
[jnews_footer_social social_icon=”circle”]
सरडिनिया ओपनचा अव्वल मानांकित फॅबिओ फोगिनी Fabio Fognini | कोविड 19 चाचणीत पॉझिटिव्ह coronavirus positive | आढळल्याने त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
क्ले कोर्टवर होणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत इटलीच्या फोगिनीसमोर Fabio Fognini | रॉबर्टो कार्बलेस बिनाचे आव्हान होते. फोगिनीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता.
मात्र, मंगळवारी लोरेन्झो मुसेट्टी याच्यासोबत तो दुहेरी सामना खेळला होता. इटालियन टेनिस फेडरेशनने म्हटले आहे, की फॉगिनीच्या थेट संपर्कात आलेल्या सर्व लोकांना विलगीकरणात पाठवले आहे.
विशेष म्हणजे फॅबियो दहावा टेनिसपटू आहे, जो कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. यापूर्वी ग्रिगोर दिमित्रोव (Grigor Dimitrov), बोर्ना कोरिक (Borna Coric), नोवाक जोकोविच (Novak Djokovic), फ्रान्सेस (Frances Tiafoe), की निशिकोरी (Kei Nishikori), बीनोइट पेयर (Benoit Paire), फर्नांडो वर्डास्को (Fernando Verdasco), डेव्हिड गॉफिन (David Goffin) आणि सॅम क्वेरी (Sam Querrey) यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
[jnews_hero_8 include_category=”90″]