या ट्विटमुळे सीएसकेची डॉक्टर निलंबित
नयी दिल्ली
चेन्नई सुपरकिंग्सने (सीएसके) पूर्व लडाखच्या गलवानमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्याने संघाची डॉक्टर मधू थोटापिल्लील यांना निलंबित करण्यात आले आहे. आयपीएलच्या फ्रँचायझींनी या कारवाईला दुर्दैवी म्हंटलं आहे.
सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला प्रादेशिक सेनेच्या मानद लेफ्टनंटची रँक आहे. सीएसकेच्या अधिकृत ट्विटर पेजवर या निलंबनाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन या संघाचे मालक आहेत. डॉ. थोटापिल्लील यांना निलंबित करण्याचं कारण म्हणजे त्यांनी जे ट्विट सीएसकेच्या अधिकृत पेजवर केलं, त्याची पूर्वपरवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना डॉक्टर पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. आयपीएल जेव्हापासून सुरू झाली आहे, तेव्हापासून डॉ. थोटापिल्लील सीएसके संघाच्या स्पोर्ट्स मेडिसिनच्या तज्ज्ञ आहेत.