CSA suspension | ‘सीएसए’वरील कारवाई बेकायदा
‘सीएसए’वरील कारवाई बेकायदा
जोहान्सबर्ग : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला निलंबित CSA suspension | केल्यानंतर खळबळ उडाली असून, खेळाडूंसह सर्व स्तरातून या कारवाईचा विरोध केला आहे. आता या प्रकरणात सीएसएच्या माजी कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे. पाच माजी कर्मचाऱ्यांनी बोर्डावरील कारवाईला ‘अयोग्य आणि बेकायदा’ म्हंटले आहे.
CSA suspension | या पाच माजी कर्मचाऱ्यांनी दक्षिण आफ्रिका क्रीडा महासंघ आणि ऑलिम्पिक समितीला (SASCOC) सहा पानांचे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी या कारवाईला बेकायदा असल्याचा आरोप केला आहे.
‘एसएएससीओसी’ने (SASCOC) 11 सप्टेंबर 2020 रोजी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे. मंडळातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ही निलंबनाची कारवाई केल्याचे म्हंटले आहे.
या कारवाईला ज्या पाच जणांनी विरोध केला आहे, त्यात विक्री व विपणनचे माजी प्रमुख क्लाइव एकस्टीन, माजी मुख्य परिचालन अधिकारी नाससी अप्पिया, माजी वरिष्ठ वित्त व्यवस्थापक जियांडा नकुता, माजी व्यवस्थापक लुंडी माजा आणि अप्पियाचे माजी खासगी सहायक दलेने नोलन यांचा समावेश आहे.
CSA suspension | पत्रात नमूद केले आहे, की ‘‘सीएसएच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संसदेबरोबरच क्रीडा, कला, तसेच संस्कृतीमंत्री आणि जनतेची भलामण केली जात आहे, ही आमची खरी चिंता आहे.’’
या माजी कर्मचाऱ्यांनी आरोप केला, की ‘‘असं करून सीएसए हे स्पष्ट करीत आहे, की संघटनेचं संकट बेजबाबदार हितसंबंधी आणि आर्थिक गैरव्यवहाराचा परिणाम आहे, ज्यामुळे आम्हाला निलंबित केले होते. अनेक प्रकरणांवर तर सीएसएच्या पुराव्यांना धुडकावण्यात आले आहे.’’
सीएसएचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी थबांग मुनरो यांना गेल्याच महिन्यात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून पदावरून हटविण्यात आले होते.
काळजीवाहू सीईओ जॉक फॉल आणि अध्यक्ष ख्रिस नेनजानी यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. फॉल यांच्या जागेवर कुगेंड्री गवेंडर यांची नियुक्त करण्यात आली आहे.
SASCOC : South African Sports Confederation and Olympic Committee
One Comment