Cricket Australia bio bubble | बायो बबलचा खर्च दीड अरब
बायो बबलचा खर्च दीड अरब
Follow us
[jnews_footer_social social_icon=”circle”]चॅनल सेव्हनने सुमारे १६ अरब रुपयांचा करार मोडण्याची धमकी दिल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर (सीए) Cricket Australia bio bubble | मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
आधीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खस्ता हालत असताना या धमकीमुळे मोठा आर्थिक प्रश्न उभा ठाकणार आहे. अशा वेळी हा करार अबाधित राखण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बायो-बबल Cricket Australia bio bubble | तयार करण्यासाठी दीड अरब रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.
भारतीय संघाचा दौरा आणि बिग बॅश लीग टी-२० स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बायो बबल तयार करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी ३० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे १.६० अरब रुपये) इतका खर्च येणार आहे.
भारतीय संघ यंदा वर्षअखेरीस चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डच्या एका अहवालानुसार ‘‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ‘सेव्हन वेस्ट मीडिया’सोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रसारण अधिकार वाचविण्यासाठी आगामी स्पर्धांत बायो बबल तयार करणार आहे. या बायो-बबलसाठी 30 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरपेक्षा अधिक खर्चाचा आराखडा तयार केला आहे.’’
चॅनल सेव्हनने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर बिग बॅश लीगला महत्त्व न देण्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांनी सीएशी केलेल्या ३०० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरच्या (सुमारे १६ अरब रुपये) करारातून बाहेर पडण्याचीही धमकी दिली होती.
हेरॉल्डच्या वृत्तानुसार, ‘‘करारातून बाहेर पडण्याच्या चॅनल सेव्हनच्या धमकीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्पर्धांवरील संकटातून सावरण्यासाठी बायो-बबल करण्याचा संकल्प केला आहे.’’
Cricket Australia bio bubble | आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाला करोना महामारीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी भारतीय संघाचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.