कोरोना महामारीमुळे क्रिकेटला असा बसला फटका
सामने पाहायला आला नि कोरोना संक्रमित झाला!
12 मार्च 2020 : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या Coronavirus | अवघ्या क्रिकेटविश्वाने घेतलेली असतानाही याच काळात महिलांची टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा झाली. अर्थात, तोपर्यंत काही देशांपुरता सीमित होता. या स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दरम्यान झाला. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या (एमसीजी) Melbourne Cricket Ground | सूत्रांनी याबाबत सांगितले, की भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आठ मार्च २०२० रोजी आयसीसी महिला टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा ICC Womens T20 World Cup 2020 | अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका फारच कमी आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८५ धावांनी जिंकत पाचव्यांदा टी-२० विश्वकरंडक आपल्या नावावर केला.
पाकिस्तान सुपर लीगचे काय झाले?
पीएसएल स्थगित
17 मार्च 2020 : कोरोना महामारीमुळे पाकिस्तान क्रिकेटला फटका बसला. पाकिस्तान सुपर लीग PSL | Pakistan Super League | 17 मार्च रोजी स्थगित करण्यात आली. या निर्णयाचे माजी क्रिकेटपटूंनी स्वागत केले आहे. वसिम आक्रमने ट्विटवर या निर्णयाचे समर्थन केले आहे. शाहीद आफ्रिदी म्हणाला, की पीएसएल PSL | स्थगित होणे निराशाजनक आहे; पण खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाची आहे.
एकाच संघातील सहा जण खोलीत बंद
इंग्लंडमधील एका क्रिकेट संघातील सहा खेळाडूंना कोरोना विषाणूची लक्षणे आढळली असून, त्यांना विलगीकरण कक्षात Isolation | ठेवण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू काउंटी क्रिकेटमधील सरे क्रिकेट क्लब संघातील आहेत. या खेळाडूंमध्ये घसादुखी आणि ताप अशी लक्षणे आढळली. त्यानंतर त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणारा इंग्लंडचा खेळाडू जेसन रॉयदेखील सोमवारी रात्री लंडनला परतला. मात्र, संघातील या सहा खेळाडूंना कोरोना झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केवळ खबरदारी म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सहा खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
पीएसएल रद्द केल्यानंतर १०० जणांची तपासणी
18 मार्च 2020 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग Pakistan Super league | रद्द केल्यानंतर त्याच्याशी संबंधित 128 जणांचा कोविड-19 तपासणी अहवाल पाठविण्यात आला आहे. यात अनेक खेळाडूंचाही समावेश आहे. इंग्लंडच्या अलेक्स हेल्स Alex Hales | या खेळाडूला ‘कोविड 19’ ची लक्षणं आढळल्यानंतर ही स्पर्धा १७ मार्च रोजी रद्द करण्यात आली. हेल्सने सांगितले, की ताप आणि कोरडा खोकला असल्याने मी स्वत: इतरांपासून वेगळा झालो. पीसीबीच्या Pakistan Cricket Board | एका अधिकाऱ्याने सांगितले, की ‘‘आम्हाला 18 मार्च 2020 च्या रात्री संशयित 100 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अद्याप तरी कोणताही खेळाडू कोविड-19 संक्रमित झालेला नाही. मात्र, आम्ही आवश्यक त्या उपाययोजना करीत आहोत.’’
पीएसएलचे सर्व अहवाल निगेटिव्ह
19 मार्च 2020 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ज्या १२८ जणांचे अहवाल परीक्षणासाठी पाठवले होते, ते सर्व निगेटिव्ह आढळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यात खेळाडू, सहयोगी स्टाफ, सामनाधिकारी, प्रसारमाध्यमे, संघमालकांचा समावेश होता. पीसीबीने 17 मार्च रोजी या १२८ जणांची तपासणी केली होती. याशिवाय स्पर्धेतील मुल्तान सुल्तान्स संघानेही १७ जणांचे परीक्षण केले होते. त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले. पीसीबीने कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे पाकिस्तान सुपर लीगला Pakistan Super league | नॉकआउट टप्प्यात स्थगित करावी लागली होती. पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले, की बोर्डाच्या प्रसारणाशी संबंधित 29 भारतीय सदस्यांनाही मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांना वाघा-अटारी सीमेवर भारताने प्रवेश करण्यास रोखले होते. कारण त्यांच्याकडे प्रवासदौऱ्याशी संबंधित कागदपत्रांनुसार केवळ विमान उड्डाण करण्याचीच परवानगी आहे.’’
कोरोना महामारीमुळे क्रिकेटला कसा बसला फटका, कोणत्या स्पर्धा झाल्या रद्द?
आधी प्रेक्षकांविना विश्व सीरिजचे सामने
12 मार्च : कोरोना महामारीमुळे क्रिकेटला जबर फटका बसला. सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारासारख्या दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या रोड सेफ्टी विश्व सीरीजलाही Road Safety World Series 2020 | कोरोना विषाणू संसर्गाचा फटका Coronavirus | बसला आहे. या सीरिजच्या तिसऱ्या टप्प्यातील सामने पुण्यात होणार होते. मात्र आता ते मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर स्थलांतरित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे हे सामने आता प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार होते. आयोजकांनी सांगितले, ‘‘देशात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्व सीरीजचे Road Safety World Series 2020 | उर्वरित सर्व सामने १३ मार्चपासून डीवाय पाटील स्टेडियमवर प्रेक्षकांविना घेण्यात येणार आहेत.’’ हा निर्णय घेतला तेव्हा महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा दहा जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. यातील बहुतांश रुग्ण पुण्यातील होते.
नंतर विश्व सीरिजच रद्द करण्याची नामुष्की
१३ मार्च : कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीनंतर रोड सेफ्टी विश्व सीरिज प्रेक्षकांविना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या विषाणूचा धोका महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने ही स्पर्धाच आता रद्द करण्यात आली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत ही स्पर्धा करण्यात आली असून, उर्वरित सामने खेळविण्यासाठी नंतर तारीख निश्चित केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड मालिका रद्द
14 मार्च : ऑस्ट्रेलियात होणारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यान १३ मार्चपासून सुरू झालेली चॅपेल-हॅडली वन-डे मालिका Chappell–Hadlee Trophy | रद्द करण्यात आली. पाहुण्या न्यूझीलंड संघाने कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे स्वदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलयाने Cricket Australia | सांगितले, की ‘‘न्यूझीलंड सरकारने प्रवास दौऱ्यांवर निर्बंध घातल्याने न्यूझीलंड संघाला तातडीने मायदेशी परतावे लागणार आहे. न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवल्यानंतर त्यांना समजले की न्यूझीलंड सरकारने प्रवास दौऱ्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आता हा संघ मायदेशी परतल्यानंतर त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धास्तीमुळे या मालिकेचा पहिला सामना प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्यात आला होता. यात ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसन Lockie Ferguson | याला घसादुखी जाणवत असल्याने त्याला इतर सहकाऱ्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याची तपासणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
श्रीलंकेचाही इंग्लंड दौरा रद्द
14 मार्च : इंग्लंडमध्ये १९ मार्चपासून गॉल Galle | येथे इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यान कसोटी मालिका होणार होती. मात्र, मालिकेच्या पाच दिवस आधीच श्रीलंकेने कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीने इंग्लंड दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने श्रीलंकेच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. श्रीलंकेचा हा निर्णय योग्य असल्याचे तो म्हणाला.
एमसीएचे सर्व सामने ३१ मार्चपर्यंत स्थगित
14 मार्च : महाराष्ट्र क्रिकेटला कोरोना महामारीचा फटका बसला. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, ही स्थिती पाहता मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) Mumbai Cricket Association | MCC | आपले सर्व सामने ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या एका सदस्यानेही या निर्णयाला पुष्टी दिली आहे.
शेफिल्ड शील्ड ट्रॉफीचा अंतिम सामना रद्द
15 मार्च : ऑस्ट्रेलियातील सर्वांत आघाडीच्या प्रथम श्रेणीच्या शेफिल्ड शील्ड (Sheffield Shield Trophy) क्रिकेट स्पर्धेलाही कोरोना महामारीमुळे फटका बसला असून, ही स्पर्धा दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच रद्द करण्यात आली आहे. ‘कोविड-19’च्या महामारीच्या वाढत्या धोक्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) Cricket Australia | स्पष्ट केले. या स्पर्धेचा अंतिम सामना २७ मार्च रोजी होणार होता. कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती पाहून या सामन्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सीएचे CA | मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी सांगितले, की दौरे कमी करण्याच्या हेतूने शेफिल्ड शील्ड स्पर्धेचा Sheffield Shield Trophy | अंतिम सामना रद्द करण्यात आला आहे.
रॉबर्ट्स म्हणाले, ‘‘या महामारीच्या परिस्थितीत सर्वांच्या आरोग्यासाठी क्रिकेट महत्त्वाचे असूच शकत नाही.” याच आठवड्यात पर्थमधील वाका, अॅडिलेडचे केरेन रोल्टन ओव्हल आणि मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल मैदानावर होणाऱ्या तीन सामन्यांत प्रेक्षकांना प्रवेशबंदी केली आहे. शेफिल्ड शील्ड स्पर्धेच्या गुणतालिकेत न्यू साउथ वेल्स ब्लूज अव्वल स्थानी आहे. जर अंतिम सामना होऊच शकला नाही, तर या संघालाच विजेतेपद द्यावे का, या पर्यायावरही क्रिकेट ऑस्ट्रेलिया Cricket Australia | विचार करीत आहे. जर असे झाले तर ही राज्यातली ४७ वी, तर २०१३-१४ नंतरची पहिली शेफिल्ड शील्ड ट्रॉफी Sheffield Shield Trophy । असेल. जर ही महामारी आटोक्यात आली तर न्यू साउथ वेल्सला टीम व्हिक्टोरियाविरुद्ध विजेतेपदासाठी लढावे लागेल. व्हिक्टोरियाने गेल्या पाच स्पर्धांपैकी चार वेळा हा किताब जिंकला आहे. या संघाने गेल्या वर्षी मेलबर्नमध्ये न्यू साउथ वेल्सला पराभूत करीत हा किताब जिंकला होता.
बांग्लादेशाचा पाकिस्तान दौरा स्थगित
16 मार्च : जगभर पसरलेल्या कोरोना विषाणू महामारीमुळे (कोविड-19) वन-डे, कसोटी क्रिकेटला फटका बसला आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातील क्रिकेट बोर्डाने वन-डे आणि कसोटी सामने अमर्यादित काळासाठी स्थगित केले आहेत. हे सामने पाकिस्तानातील कराची येथे होणार होते. बांग्लादेशला एक एप्रिल रोजी एकदिवसीय आणि पाच ते नऊ एप्रिलपासून दुसरी आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप सामने खेळण्यासाठी २९ मार्चपासून कराची येथे यायचे होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने PCB | सांगितले, की दोन्ही क्रिकेट बोर्ड आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिपची तारीख नंतर निश्चित करणार आहेत. मालिकेतला पहिला सामना ७ से १० फेब्रुवारीपर्यंत रावळपिंडीत खेळला गेला होता. हा सामना पाकिस्तानने एक डाव आणि ४४ धावांनी जिंकला होता.
पीसीबीने PCB | पाकिस्तान कप एकदिवसीय स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. ही स्पर्धा 24 मार्च रोजी होणार होती. कराची हा सिंध प्रांताचा एक भाग असून, तेथे पाकिस्तानातील सर्वाधिक ७५ जण कोरोना विषाणू संक्रमित आहेत. या महामारीमुळे अनेक परदेशी खेळाडू मायदेशी परतल्यानंतर पीएसएलचे Pakistan Super League | उर्वरित सामनेही कराची आणि लाहोरमध्ये प्रेक्षकांविना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएसएलमधून ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लिन आणि डेव्हिड वाइसी, श्रीलंकेचा लेगस्पिनर सेकुगे प्रसन्ना मायदेशी परतले आहेत. पीएसएलची उपांत्य फेरी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळविण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची तपासणी
18 मार्च : कोविड 19 Covid-19 | महामारीमुळे भारत दौरा अर्ध्यावरच सोडून मायदेशात परतलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला पुढचे १४ दिवस एकांतवासात राहण्यास सांगितले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे Cricket South Africa | मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शोएब मांजरा यांनी खेळाडूंना वेगळे राहण्यास सांगितले आहे. मांजरा म्हणाले, ‘‘या एकांतवासाच्या काळात कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळली तर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. भारत दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंनी मास्क परिधान केले होते, तर काही जणांनी दुर्लक्ष केले होते.
सामुदायिक क्रिकेटवर न्यूझीलंडचे निर्बंध
18 मार्च : कोरोना महामारीमुळे न्यूझीलंड क्रिकेटला देखील फटका बसला आहे. न्यूझीलंडने कोविड 19 Covid-19 | महामारीमुळे क्लब आणि शाळांसह सगळ्याच सामुदायिक क्रिकेटवर निर्बंध घातले आहेत. न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट David White | यांनी न्यूझीलंड क्रिकेटच्या सर्व संघांना याबाबतची माहिती दिली आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच प्लंकेट शील्डचे अखेरचे दोन सामने रद्द केले आहेत.
न्यूझीलंडचे खेळाडू अखेर एकांतवासात
20 मार्च : न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि इतर सहयोगी स्टाफ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून स्वत:ला विलग केले आहे. न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले, की सरकारच्या सूचनांनुसार सर्वांनी घरातच राहण्यास सांगितले आहे. न्यूझीलंड संघाला ऑस्ट्रेलियात तीन वन-डे आणि तीन टी-२० सामने खेळायचे होते. मात्र, चॅपेल-हॅडली मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर सर्वच सामने रद्द करण्यात आले. वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसनला वेगळे ठेवण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. न्यूझीलंड क्रिकेटने ऑकलंडमधील त्यांच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनाही घरूनच काम करण्याच्या Work from Home | सूचना केल्या आहेत.
खेळाडू काय म्हणाले?
थँक गॉड, क्रिकेट संपर्कवाला खेळ नाही! : कमिन्स
14 मार्च : कोरोना विषाणूच्या संसर्गाची धास्ती संपूर्ण जगाला असून, या महामारीमुळे क्रिकेटला जबर फटका बसला आहे. एकमेकांच्या संपर्कात येण्यामुळे विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो; पण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स Pat Cummins | स्वत:ला क्रिकेटपटू असल्याने भाग्यवान समजतो. तो म्हणाला, की ‘‘आम्ही भाग्यवान आहोत, की क्रिकेट संपर्कवाला खेळ नाही. तुम्ही कोणाच्याही जवळ जाण्यापासून वाचू शकतात.’’
माझ्याविषयी अनाठायी चर्चा : फर्ग्युसन
15 मार्च : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसन Lockie Ferguson | याला घसादुखीचा त्रास झाल्यानंतर त्याला हॉटेलमध्येच तपासणीसाठी ठेवण्यात आले. त्याचे कोविड-१९ परीक्षण करण्यात आले. या सगळ्या घटनाक्रमानंतर फर्ग्युसन वैतागला आहे. “माझ्याबाबतीत उगाच वाढवून सांगितले जात आहे,” असे फर्ग्युसन म्हणतो. २८ वर्षीय फर्ग्युसनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यानंतर घसादुखीची तक्रार केली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला लगेच तपासणीसाठी वेगळे करण्यात आले. तपासणीअंती समजले, की त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. आता तो आपल्या परिवारासोबत आहे. या एकूणच प्रकारानंतर त्याला वाटते, की माझ्याविषयी खूप वाढवून सांगितले गेले. ऑकलंड विमानतळावर पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, ‘‘मला कोरोनाची लक्षणे नव्हती; पण मला जे जाणवत होतं, त्यापेक्षा जास्त माझ्याविषयी सांगितलं गेलं. माझ्यात सर्दीची लक्षणे होती आणि फिजियो टॉमी सिमसेक आणि सहयोगी स्टाफने त्यासाठी असलेल्या प्रक्रियांचे पालन केले. ते मी समजू शकतो. हेही खरं आहे, की मी एक दिवस हॉटेलमध्ये माझ्या खोलीत एकटाच राहिलो.’’ एकूणच या प्रकारावर फर्ग्युसन म्हणाला, ‘‘मी तर हाच विचार केला, की केवळ सर्दीची लक्षणं आहेत. क्रिकेट खेळताना, प्रवास करताना असं होतं. त्यात वेगळं असं काहीही नाही. मात्र, जसं मी सांगितलं, तसंच फिजियो आणि डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले. एक दिवस एकट्याने एका खोलीत काढले. ते ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मला छान वाटले. मला कोरोना नसल्याचे स्पष्ट झाल्याने मी खूश आहे.”
क्रिकेटपेक्षा मोठा आहे कोरोना विषाणू : पेन
18 मार्च : कोरोना विषाणूचा धोका क्रिकेटपेक्षा मोठा आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी गांभीर्याने पावले उचलायला हवीत, असे मत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेन याने व्यक्त केले आहे. त्यामुळे या महामारीमुळे सर्व खेळ स्थगित तसेच रद्द केल्याच्या निर्णयाला पेनने योग्य ठरवले आहे. पेनने ट्विटर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने म्हंटले आहे, की ‘‘क्रिकेटपटूंसाठी हा काळ खूप कठीण आहे. मात्र, आपण आता कुठे तरी थांबणे आवश्यक आहे. आपण स्पर्धांमध्ये व्यस्त असतो. मात्र, भविष्याचा विचार करता आपण नंतरही जिंकू शकतो. हा आजार खेळापेक्षा मोठा आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याचं गांभीर्य समजून घ्यावं.’’
क्रिकेट ठप्प पडणे दु:खद : स्टेन
19 मार्च : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पाकिस्तानातील हॉटेलमध्ये बंदिस्त स्थिती अनुभवल्यानंतर मायदेशात परतलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सांगितले, की ही अत्यंत दयनीय स्थिती आहे. या महामारीमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. स्टेन कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे पाकिस्तानातून मायदेशी परतला आहे. तो म्हणाला, की ज्या प्रकारे तासाभरात वातावरणात अचानक बदल झाले, ते शब्दात सांगता येणार नाहीत. स्टेन पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद यूनायटेड संघाकडून खेळतो. ही लीग उपांत्य फेरीपूर्वीच स्थगित करण्यात आली. स्टेनने ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’शी espncircinfo | मुलाखतीत म्हणाला, ‘‘ही खरोखर दयनीय स्थिती आहे. सगळं काही ठप्प पडलं आहे. दक्षिण आफ्रिकासारख्या देशात आम्ही पूर्वेतील संस्कृती, धर्म, जातीय पार्श्वभूमीसारख्या अनेक समस्यांना झेलत आहोत. अशा परिस्थितीत आम्हाला एकच गोष्ट एकमेकांना जोडत होती, ती म्हणजे खेळ. आता तीही सोबत नाही. दक्षिण आफ्रिकेत आम्ही अशा गोष्टी शोधत असतो, ज्यामुळे लोकांमध्ये एकोपा राहील. जर खेळच नसेल तर काय होईल? मला आठवतंय, की नेल्सन मंडेला ही पहली व्यक्ती होती, ज्यांनी सांगितले होते, की खेळ लोकांना एकजूट करतो. ती क्षमता इतर कोणत्याही उपक्रमात नाही. जर खेळच नसेल तर मी सांगू शकत नाही, आमच्याजवळ मग काय शिल्लक राहील.’’