Trinbago CPL champion | ट्रिनबागो ‘सीपीएल’चा चॅम्पियन

ट्रिनबागो नाइटरायडर्स ‘सीपीएल’चा चॅम्पियन
Trinbago CPL champion | भारतात जशी इंडियन प्रिमियर लीग (IPL) होते, त्याच धर्तीवर कॅरेबियन बेटांवरही कॅरेबियन प्रिमियर लीग लोकप्रिय आहे. ट्रिनबागो नाइटरायडर्स ‘सीपीएल’चा चॅम्पियन झाला आहे.
कर्णधार कीरोन पोलार्ड याच्या शानदार गोलंदाजीनंतर लेंडल सिमन्स आणि डेरेन ब्राव्हो यांच्यातील शतकी भागीदारीमुळे ट्रिनबागो नाइटराइडर्सने अंतिम फेरीत ‘सेंट लुसिया जॉक्स’ संघाचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला.
ट्रिनबागोसमोर 155 धावांचे लक्ष्य होते. सिमन्स (49 षटकांत नाबाद 84) आणि ब्राव्हो (47 चेंडूंत नाबाद 58) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 138 धावांची शतकी भागीदारी रचली. त्यामुळेच ट्रिनबागोने सेंट लुसिया जॉक्सचा ११ चेंडू बाकी असतानाच विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Trinbago CPL champion | ट्रिनबागो संघाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण स्पर्धेत त्यांनी एकही सामना गमावला नाही. ट्रिनबागोचा ‘सीपीएल’मध्ये हा नवा विक्रम आहे.
संघाचा आघाडीचा खेळाडू सुनील नारायण याच्याशिवाय ट्रिनबागोने विजेतेपद जिंकले. सुनील नारायणला अंतिम अकरा जणांच्या खेळाडूंमध्ये स्थान दिले नव्हते.
अंतिम सामन्याला खरी कलाटणी मिळाली ती १७ व्या षटकात. अफगाणिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज जाहीर खानकडे हे षटक होते. या षटकात 23 धावा वसूल करण्यात आल्या.
तत्पूर्वी ट्रिनबागोला 24 चेंडूंत 41 धावा हव्या होत्या. मात्र, ब्राव्होचे दोन खणखणीत षटकार आणि सिमन्सने एक षटकार खेचत सामन्याचे चित्रच पालटले.
अशातच सेंट लुसियाचा भरवशाचा गोलंदाज स्कॉट कूगलीनचंही चेंडूवर नियंत्रण राहिलं नाही. सिमन्सने त्याच्या षटकात एक षटकार आणि चौकार खेचला. हे षटकही तसं महागडच ठरलं. स्कॉटने षटकात एकूण १६ धावा दिल्या.
ब्राव्होने 19 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विजयी चौकार लगावला. सिमन्सने आपल्या डावात आठ चौकार आणि चार षटकार, तर ब्राव्होने दोन चौकार आणि सहा षटकार लगावले.
Trinbago CPL champion | तत्पूर्वी ट्रिनबागोचा कर्णधार पोलार्ड याने सेंट लुसियाला सावरण्याची फारशी संधी दिली नाही. सेंट लुसियाची स्थिती एक वेळ एक बाद 77 धावा अशी होती.
मात्र, पोलार्डने त्यांची फलंदाजीची फळीच उद्धवस्त केली. अवघ्या 30 धावांत त्याने चार गडी बाद केले. सेंट लुसियाचा डाव 19.1 षटकांत 154 धावांत गारद जाला.
सेंट लुसियाकडून मार्क डेयल (29), आंद्रे फ्लॅचर (39) आणि रोस्टन चेज (22) यांनी चांगली सुरुवात केली. मात्र मोठी धावसंख्या रचण्यात ते अपयशी ठरले.
Follow us
[jnews_footer_social social_icon=”circle”]