बुमराह…मासिक आयसीसी पुरस्कारासाठी नामांकन
इंग्लंडविरुद्ध अष्टपैलू कामगिरीची पावती जसप्रीत बुमराहला मिळाली, असं म्हणायला हरकत नाही. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत बुमराहने शानदार कामगिरी केली. त्याचेच फलित म्हणून भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ऑगस्ट महिन्याचा ‘आयसीसी सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
बुमराहशिवाय इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला नामांकित आहे. महिला वर्गात थायलंडची नत्ताया बुचाथाम, आयर्लंडची गॅबी लुईस आणि ऐमियर रिचर्डसन यांनाही नामांकन मिळाले आहे.
बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यात नऊ गडी टिपले. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने फलंदाजीतही चुणूक दाखवली. त्याने मोहम्मद शमीसोबत नवव्या गड्यासाठी 89 धावांची भागीदारी रचली. हीच भागीदारी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. याच कामगिरीच्या आधारे जसप्रीत बुमराह याला ऑगस्टचा आयसीसी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
इंग्लंडचा कर्णधार रूट याने तिन्ही कसोटी सामन्यात शतक ठोकले. या कामगिरीने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानावर जाऊन पोहोचला.
आफ्रिदीने वेस्टइंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत 18 गडी टिपले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने विंडीजचा संपूर्ण संघ म्हणजे दहा गडी बाद केले. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा चौथा सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे.
महिला क्रिकेटमध्ये नत्तायाने झिम्बाब्वेविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींत कमाल केली. त्यामुळेच थायलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला.
आयर्लंडचे लुईस आणि रिचर्डसन यांच्या दमदार खेळामुळे त्यांच्या संघाने टी 20 विश्व कप युरोप क्वालिफायरच्या चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवले.
[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″ sort_by=”popular_post”]