केस प्रत्यारोपण (HAIR TRANSPLANTS) करणे किती जोखमीचे?
युरोपमध्ये 2010 ते 2021 दरम्यान केस प्रत्यारोपण (HAIR TRANSPLANTS)च्या शस्त्रक्रियेत रुची दाखविणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 240 टक्क्यांनी वाढ झाली...
केस प्रत्यारोपण (HAIR TRANSPLANTS) करणे किती जोखमीचे?
युरोपमध्ये 2010 ते 2021 दरम्यान केस प्रत्यारोपण किंवा ‘हेअर ट्रान्सप्लांट’ (HAIR TRANSPLANTS)च्या शस्त्रक्रियेत रुची दाखविणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 240 टक्क्यांनी वाढ झाली.
Adam Taylor, Lancaster University
लँकेस्टर : केस गळणे या समस्येचा सामना आयुष्यात कोणत्या तरी टप्प्यात प्रत्येकालाच करावा लागतो. नैसर्गिकपणे टक्कल पडलं तरी त्यावर उपाय हा मोठा व्यवसाय बनला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर युरोपमध्ये 2010 ते 2021 दरम्यान केस प्रत्यारोपण किंवा ‘हेअर ट्रान्सप्लांट’ (HAIR TRANSPLANTS)च्या शस्त्रक्रियेत रुची दाखविणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 240 टक्क्यांनी वाढ झाली. तुर्कीये तर अशा शस्त्रक्रियांमध्ये इतका लोकप्रिय आहे, की काही कर्मचाऱ्यांनी ‘तुर्की एअरलाइन्स’चे नाव बदलून ‘तुर्की हेअरलाइन्स’ ठेवले आहे.
केस गळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. साधारणपणे एका दिवसात एका व्यक्तीचे 50-100 केस गळतात. पुन्हा ते येतातही. मात्र, वय वाढण्याबरोबरच इतर शारीरिक प्रक्रियांप्रमाणे केसांचा विकासही संथ होत जातो.
आपल्या केसांना चमकदार बनवणाऱ्या तेलाची निर्मिती करणाऱ्या सेबेशियस ग्रंथी त्यांची क्रिया कमी करतात, ज्यामुळे केसांची चमक कमी होते. केसांच्या काही छिद्रांचे कार्यदेखील कमकुवत होते आणि केस पातळ होऊ लागतात आणि केसांची काही छिद्रे पूर्णपणे बंद झाल्यामुळे केसांची संख्या कमी होते.
केस पातळ होणे आणि टकलेबाबत एक सामान्य धारणा आहे, की यामुळे मानवाचं सौंदर्य लोप पावते. यामुळे लोक मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया करून कृत्रिम केस लावणाऱ्या उपचारात्मक पद्धतींचा पर्याय निवडतात.
‘हेअर ट्रान्सप्लांट’ (HAIR TRANSPLANTS)ला कॉस्मेटिक प्रक्रिया म्हणून वर्गीकृत केले जाते आणि ते इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (NHS) चौकटीत येत नाही. काही लोक ही शस्त्रक्रिया इतर देशांमध्ये अधिक स्वस्त असल्याने त्यासाठी अनेक जण परदेशवाऱ्याही करतात.
परदेशात केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची अनेक सुखद उदाहरणे आहेत. मात्र, अशीही प्रकरणे आहेत जेव्हा शस्त्रक्रिया एखाद्या अपात्र व्यक्तीद्वारे केली गेली आणि अगदी ‘केस प्रत्यारोपणा’साठी अयोग्य व्यक्तीवरच उपचार केले गेले.
‘केस प्रत्यारोपण’ शस्त्रक्रिया नेहमीच एखाद्या योग्य शल्यचिकित्सकाकडूनच करायला हवी आणि सर्व लोक कृत्रिम पद्धतीने केस रोपणाच्या या सर्जिकल प्रक्रियेसाठी पात्र असतातच असेही नाही.
सर्वांत पात्र उमेदवार ‘एंड्रोजेनिक एलोपेसिया’चे (androgenic alopecia) असतात, ज्याला मूलत: ‘पुरुष पॅटर्नवाले टक्कल’ म्हंटले जाते. मात्र, हे महिला आणि पुरुष दोघांनाही प्रभावित करते.
चाळीसपेक्षा कमी वयोगटाच्या सुमारे 10 टक्के महिलांमध्ये केस गळण्याची काही लक्षणे असतात, ज्यांची केस गळण्याची प्रक्रिया वयाच्या सत्तरीपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत जाते.
या व्यतिरिक्त पन्नाशीपर्यंत 30 ते 50 टक्के पुरुषांमध्ये ‘एंड्रोजेनिक एलोपेसिया’ (androgenic alopecia)शी संबंधित केस गळण्याची समस्या असते.
पुरुषांमध्ये साधारणपणे ‘एम-आकार’मध्ये केसांचे मागे पडणारी ‘हेअरलाइन’ विकसित होते, ज्याला ‘नॉरवूड पॅटर्न’ (Norwood pattern) म्हणून ओळखले जाते. याउलट महिलांच्या डोक्याच्या वर आणि डोक्याच्या समोर केस पातळ होऊ लागतात, ज्याला ‘लुडविग पॅटर्न’(Ludwig pattern) म्हणून ओळखले जाते.
केस प्रत्यारोपण (Hair Transplants) उपचाराचे पर्याय
केस झडण्यावर सुरुवातीचे उपचार साधारणपणे औषधी असतात. फिनास्टेराइड (Finasteride) नावाचे औषध पुरुषांमध्ये ‘बिनाइन प्रोस्टेट एनलार्जमेंट’(benign prostate enlargement) आणि ती केसांच्या झडण्यावरील उपचारात महत्त्वाची ठरते. त्याचे परिणाम समोर येण्यासाठी तीन ते सहा महिने लागतात.
अर्थात, उपचार बंद करण्याच्या सहा ते 12 महिन्यांच्या आत केस जुन्या स्थितीत परततात. ‘एंड्रोजेनिक एलोपेसिया’ (androgenic alopecia)च्या उपचारासाठी एक आणखी औषध मिनोक्सिडिल (Minoxidil) आहे. ते केस गळण्यापासून रोखण्यास लाभदायी ठरत आहे. याशिवाय एक विशेष टोपीचा उपयोग करून लेझर लाइट थेरपीच्या वापरामुळेही संमिशअर परिणाम दिसले आहेत.
जर प्रारंभिक उपचार अपयशी ठरले तर रुग्ण केस प्रत्यारोपणाचा पर्याय निवडू शकतो. त्यासाठी दोन तंत्रज्ञानांचा सर्वाधिक वापर केला जातो. पहिले आहे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन (FUT), जिला फॉलिक्युलर युनिट स्ट्रिप सर्जरी (FUSS) असंही म्हणतात. दुसरे तंत्रज्ञान फॉलिक्युलर युनिट एक्सिशन (FUE) आहे. दोन्ही प्रक्रियांमध्ये साधारणपणे कवटीच्या इतर क्षेत्रांत उपयोगी केसांची उपलब्धता आवश्यक असते.
केस उगणे?
केस प्रत्यारोपणाची दीर्घकालीन यशाचा दर वेगवेगळा असतो. अभ्यासकांचे अहवाल सांगतात, की शस्त्रक्रियेच्या एक वर्षानंतर 90 टक्के लोकांचे केस चांगल्या प्रकारे वाढतात. मात्र, चार वर्षांनंतर हा कव्हरेज घटून नऊ टक्के होतो.
अनेक घटक केस प्रत्यारोपणांच्या परिणामांना प्रभावित करू शकतो. यात वय, धूम्रपान, उन्हापासून नुकसान आणि मधुमेह यांचा समावेश आहे.
शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. काही क्लिनिक ‘वेदनारहित’ केस प्रत्यारोपणाच्या जाहिराती करतात. मात्र, रिकव्हरी नेहमी अस्ताव्यस्त आणि अस्वस्थ असते.
प्रक्रियेदरम्यान अनेस्थेशियाचा उपयोग केला जाऊ शकतो. मात्र, त्यानंतर कवटीला सूज येऊ शकते, कोमल होऊ शकते, तसेच बऱ्याच कालावधीपर्यंत आराम करावे लागू शकते. रुग्णांना सल्ला दिला जातो, की त्यांनी कामातून दोन आठवड्यांची सुट्टी घ्यावी आणि जोपर्यंत ‘ग्राफ्ट’ नाजूक आणि असुरक्षित आहे तोपर्यंत जास्त शारीरिक कार्यापासून दूर राहावे. केस प्रत्यारोपणाचे पूर्ण परिणाम समोर येण्यास दहा ते 18 महिने लागू शकतात.
केस प्रत्यारोपण त्या लोकांसाठी एक लोकप्रिय पर्याय होऊ शकतो, जे केस गळण्याच्या समस्येने चिंताग्रस्त आहेत. मात्र, हा मोठा निर्णय आहे आणि त्याला फार हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. जर तुम्ही प्रक्रियेला सामोरे जाण्याचा विचार करीत असाल तर त्यासाठी तुमचा उपचार पूर्णत: योग्य शल्यचिकित्सकाकडून व्हायला हवा. तुम्हाला सर्वोत्तम परिणाम हवे असतील तर तुम्हाला मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्यासाठी सज्ज राहावं लागेल.
माकडे माणसांवर हल्ला का करतात?
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com