अर्जुन पुरस्कार विजेते टेबल टेनिस खेळाडू व्ही. चंद्रशेखर यांचे निधन
अर्जुन पुरस्कार विजेते टेबल टेनिस खेळाडू व्ही. चंद्रशेखर यांचे निधन
V. Chandrasekhar passed away | भारताचे माजी टेबल टेनिसपटू आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त व्ही. चंद्रशेखर यांचे कोव्हिड 19 मुळे 12 मे 2021 रोजी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा आहे. ‘चंद्रा’ या नावाने लोकप्रिय असलेले चंद्रशेखर तीन वेळा राष्ट्रीय विजेते होते. चेन्नईमध्ये जन्मलेले चंद्रशेखर 1982 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत पोहोचले होते. ते उत्तम प्रशिक्षकही राहिले आहेत.
V. Chandrasekhar passed away | चंद्रशेखर यांची कारकीर्द 1984 मध्ये गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर पुढे सरकली नाही. कारण त्यांचे चालणे- फिरणे बंद झाले होते. त्यांचा आवाज आणि नंतर दृष्टीही गेली. असे असले तरी ते खचले नाहीत. नंतर ते प्रशिक्षक झाले. त्यानंतर ते रुग्णालयाविरुद्ध कायदेशीर लढाई जिंकले होते. ज्या खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले, त्यात सध्याचा खेळाडू जी. साथियान याचा समावेश आहे.
खेल हॉकी वायरस अंपायर निधन
hockey umpire Ravinder Sodhi dies | हॉकीचे माजी अंपायर रविंदर सोढी यांचे कोविड-19 (Covid-19)मुळे यांचे 12 मे 2021 रोजी नवी दिल्लीत निधन झाले. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबम यांनी सोढी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. सोढी यांनी अनेक महत्त्वाच्या स्थानिक हॉकी स्पर्धांमध्ये तांत्रिक अधिकारी होते. लखनौत 1988 मध्ये झालेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हॉकी गोल्ड कप स्पर्धेतही ते तांत्रिक अधिकारी होते.