AITA AGM | अनिल जैन एआटीएचे नवे अध्यक्ष
Your Content Goes Here
अनिल जैन एआटीएचे नवे अध्यक्ष
Follow us
[jnews_footer_social social_icon=”circle”]अखिल भारतीय टेनिस संघटनेची (AITA) 6 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य अनिल जैन (Anil Jain) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी अनिल धूपर (Anil Dhupar) यांची वर्णी लागली आहे.
AITA-AGM | भारताच्या डेव्हिस कपचे कर्णधार रोहित राजपाल यांची 2024 पर्यंत चार वर्षांसाठी खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली आहे.
एआयटीएफच्या (AITA) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनिल जैन यांनी दिल्ली लॉन टेनिस संघटनेवर (डीएलटीए) ‘सेंटर ऑफ अॅक्सिलन्स’ Centre of Accilance | तयार करण्याची घोषणा केली.
जैन यांनी सांगितले, ‘‘एआयटीए (AITA) विश्वस्त, डीएलटीए आणि सरकारच्या मदतीने दिल्लीत हाय परफॉर्मन्स टेनिस अकादमी उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. नवोदित खेळाडूंसाठी हे उत्तम प्रशिक्षण केंद्र होईल.’’
मात्र, हे प्रशिक्षण केंद्र केव्हा सुरू होईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. हे केंद्र ज्युनिअर खेळाडूंसाठी उत्तम केंद्र होईल, जेथे मानसिक प्रशिक्षणही दिले जाईल, असे ते म्हणाले.
ही अकादमी वरिष्ठ खेळाडूंसाठीही उपलब्ध असेल. महत्त्वाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी काही कालावधीसाठी वरिष्ठ खेळाडू या अकादमीत सराव करू शकतील.
AITA-AGM | मध्य प्रदेश टेनिस संघटनेचे (MPTA) सचिव धुपर यांची हिरण्यमय चटर्जी यांच्या जागेवर बिनविरोध निवड झाली.
प्रथमच चार संयुक्त सचिव
एआयटीएने (AITA) चार संयुक्त सचिवांची निवड केली आहे. यात सुंदर अय्यर (महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना), प्रेम कुमार कर्रा (तमिळनाडू टेनिस संघटना), सुमन कपूर (हरियाणा लॉन टेनिस संघटना) आणि रकतिम साइकिया (अखिल आसाम टेनिस संघटना) यांचा समावेश आहे.
संघटनेच्या इतिहासात प्रथमच चार संयुक्त सचिव नियुक्त केले आहेत. कारण घटनेत केलेल्या बदलानुसार दोन पदे वाढविण्यात आली आहेत.
एआयटीएचे माजी अध्यक्ष अध्यक्ष अनिल खन्ना यांनी उपाध्यक्षपदाच्या रूपाने संघटनेत पुनरागमन केले आहे. त्यांच्यासह सात उपाध्यक्ष संघटनेत निवडले आहेत.
या उपाध्यक्षांमध्ये हिरण्यमय चटर्जी, चिंतन एन. पारीख, नवनीत सहगल, भरत एन. ओझा, सीएस सुंदर राजू, महान खेळाडू विजय अमृतराज आणि राजन कश्यप यांचा समावेश आहे.
एआयटीएने (AITA) सात कार्यकारिणी सदस्यांची निवड केली आहे. त्यात अखौरी बी. प्रसाद, अनेल महाजन, अंकुश दत्ता, अशोक कुमार, गुरचरणसिंह होरा, कॅप्टन मूर्ती गुप्ता, थॉमस पॉल यांचा समावेश आहे.
सर्व उपाध्यक्ष कार्यकारिणी समितीचे सदस्यही असतील. डेव्हिस कपचे माजी कर्णधार एस. पी. मिश्रा आणि रश्मी चक्रवर्ती कार्यकारी समितीत खेळाडू प्रतिनिधी असतील.
एआयटीएने (AITA) एक अॅथलीट आयोगही नियुक्त केला आहे. यात सध्याचे डेव्हिस कप कर्णधार झिशान अली, माजी कर्णधार नंदन बाळ, सध्याचे फेडरेशन कपचे प्रशिक्षक अंकिता भांबरी, राधिका तुळपुळे यांचा समावेश आहे.