Social Connect
अनाकलनीय आणि अद््भुत
इंदिरानगरमधून येत असताना आयटी पार्कजवळ एका शाळकरी मुलीने हात दिला. पाठीवर दप्तर, गडद हिरव्या रंगाचा गणवेश परिधान केलेली ती मुलगी आशेने पाहत होती. मी चकित झालो. मी तिच्यापासून चार पावले पुढे गाडी थांबवली. माझा विश्वास बसत नव्हता, की एखादी शाळकरी मुलगी कोणाही टू व्हीलरला हात देऊन लिफ्ट मागू शकते? मला वाटले, रिक्षाला हात दिला असेल. मागे वळून पाहिले तर रिक्षाही नव्हती. ती शाळकरी मुलगी जवळ आली आणि म्हणाली, ‘‘मुझे स्कूल जाना है… क्या आप उसी रास्ते से जा रहे हो?’’
मला माहीत नव्हतं, की जवळपास कुठे शाळा आहे. मी म्हणालो, ‘‘कौन से स्कूल में जाना है?’’]
ती म्हणाली, ‘‘सुखदेव स्कूल में.’’
मी ः ‘‘मैं सिधे सिग्नल क्रॉस करके जा रहा हुं. क्या उस रास्ते में है स्कूल?’’
ती ः ‘‘जी नहीं. लेकिन सिग्नल से नजदिक है.’’
मी ः ‘‘ठीक है. मैं तुम्हे सीधे स्कूल मेंही छोडता हूं. मुझे सीर्फ रास्ता बताओ..’’
ती खूश झाली आणि माझ्यामागे बसली.
मी तिला म्हणालो, ‘‘क्या तुम रोज इसी तरह लिफ्ट मांग कर स्कूल जाती हो?’’
ती सहजपणे म्हणाली, ‘‘हो…’’
‘‘कौन सी कक्षा में पढती हो?’’
‘‘आठवी..’’
‘‘क्या नाम है तुम्हारा…’’
(मुद्दाम इथे नाव देत नाही. पण त्या अरेबिक नावाचा अर्थ दिया, प्रकाश आहे)
तिने गाइड केल्याप्रमाणे काही वेळातच तिची शाळा आली. मी थांबलो. मी शाळेकडे पाहिले. इथे शाळा आहे हे पहिल्यांदाच कळलं. (तरी इंदिरानगर भागात वर्षभर राहिलोय.) ती शाळेत गेली आणि मी माझ्या घराकडे…
पण अनेक प्रश्नांचं काहूर माजलं. कारण मुलींच्या बाबतीत इतके काही असुरक्षिततेचे वातावरण असताना बरीच जागृती झालेली आहे. म्हणजे कुणाही अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागू नये हा शाळकरी मुलींसाठी बेसिक पाठ आहे. पालकही त्याबाबत जागरूक आहेत. (किमान शहरात तरी…) असे असतानाही ही मुलगी बिनधास्तपणे लिफ्ट कशी काय मागू शकते?
ती जिथे उभी होती, अर्थातच तेथून जवळच तिचे घर असणार. मग तिच्यासोबत पालक का नव्हते?
सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, जेथून तिने लिफ्ट मागितली तेथून शाळा अवघ्या पाच ते दहा मिनिटांवर आहे. म्हणजे ती सहजपणे चालत जाऊ शकते. (ती पायी जाणार या अपेक्षेने कदाचित पालक तिच्यासोबत आले नसतील.) असे असतानाही तिने लिफ्ट का मागावी?
सगळंच अनाकलनीय आणि अद््भुत..!
या प्रसंगातून आपण असं समजायचं का, नाशिक सुरक्षित आहे…?
विल्मा रुडॉल्फची प्रेरणादायी कहाणी
Follow on facebook page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”111″]