इक हवा ऐसी चली…
‘इक हवा ऐसी चली बगुले भी काले हो गए’ या गझलेतील शब्दन् शब्द मोत्यापेक्षा अनमोल आहेत. मुळातच गझल शब्दप्रधान लेखनशैलीतला प्रकार. या शब्दांना मराठीतले..
चाँद अकबराबादी उत्तम शायर, कवी आहेत. हिंदी साहित्यिकांमध्ये एक वजनदार व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या उर्दू शायरीचा मराठी अनुवाद होऊच शकत नाही. तरीही धाडस केलं ते केवळ नि केवळ भाषासौंदर्यासाठी. म्हंटलं बघूया मराठी भाषा आपल्या हिंदी भगिनीला किती आपलीशी वाटते?
अगदीच तंतोतंत नाही, पण चाँद अकबराबादींच्या शायरीच्या जवळपासही पोहोचलो तरी धन्य पावलो असं मी म्हणेन. असो.. ‘इक हवा ऐसी चली बगुले भी काले हो गए’ या गझलेतील शब्दन् शब्द मोत्यापेक्षा अनमोल आहेत. मुळातच गझल शब्दप्रधान लेखनशैलीतला प्रकार. या शब्दांना मराठीतले शब्द जागा घेतील का? त्याचं उत्तर तसं म्हंटलं तर नाहीच. कारण जेवढं चाँद अकबराबादींचं उर्दू, हिंदीवर पकड आहे, तेवढी माझी मराठीवर आहे असं म्हणण्याचं धाडस करणार नाही, पण त्याच्या आसपासही पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीत राहीन. त्यांच्या गझलेचा मराठीतला अनुवाद ही माझ्यासाठी निरंतर ‘कवायत’ राहील. म्हणजे उर्दू भाषेतले शब्द मराठीत कसे चपखल बसतील याचा मी निरंतर शोध घेत राहीन. चाँद अकबराबादी यांची मूळ गझल आणि मी मराठीत अनुवाद केलेली गझल दोन्ही इथे दिल्या आहेत. मराठी अनुवाद परिपूर्ण असेलच हे आधीच अमान्य केलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यात काही बदल सुचवावासा वाटला तर मतपेटीत (कमेंट बॉक्स) जरूर कळवावा. योग्य बदल नावासह करीन….
धन्यवाद.
इक हवा ऐसी चली…
इक हवा ऐसी चली बगुले भी काले हो गए
चाँद को सर्दी लगी सूरज को छाले हो गए
मज़हबी आतिश ने बचपन की जला दी दोस्ती
हम भी का’बा बन गए तुम भी शिवाले हो गए
हौसला छूने का था बचपन में तुझ को आसमाँ
बरसों तेरी सम्त इक पत्थर उछाले हो गए
हिज्र की दौलत ने माला-माल मुझ को कर दिया
बाल चाँदी के हुए सोने के छाले हो गए
ऐरे-ग़ैरे नत्थू-ख़ैरे पढ़ रहे हैं चेहरे अब
चेहरे चेहरे न हुए गोया रिसाले हो गए
दाग़ सूरज की हुकूमत पर भी कुछ तो लग गया
कुछ उजाले जब अँधेरों के निवाले हो गए
आइनों पर पत्थरों के क़त्ल का इल्ज़ाम क्यूँ
आइने आईने न हों जैसे भाले हो गए
देख लेते तुम भी अपने इस ज़मीं के ‘चाँद’ को
इतनी जल्दी आसमाँ के क्यूँ हवाले हो गए
– चाँद अकबराबादी
एक झुळूक अशी आली…
एक झुळूक अशी आली बगळेही सावळे झाले
चंद्राला सर्दी झाली सूर्याला फोपले झाले
धर्माच्या धगीत होरपळली बालपणीची दोस्ती
आम्हीही काबा झालो तुम्ही शिवाले झाले
ऊर्मी होती बालपणी आकाशाला स्पर्श करण्याची
तुझ्या दिशेने दगड भिरकावले त्याले वर्ष झाले
हिज्रच्या दौलतीने मला मालामाल केले
केस चांदीचे झाले सोन्याचे फोपुले झाले
हौसेनवसे लोक आता वाचताहेत चेहरे
चेहरे चेहरे न राहिले, जणू ते शब्दुले झाले
डाग सूर्याच्या राज्यावरही काही तरी लागला
काही कंदिले जेव्हा तिमिरांचे बाहुले झाले
आरशांवर दगडांच्या खुनाचा आरोप का
आरसे नसे आरसे, जसे भाले झाले
पाहिले असते तूही आपल्या या भूमीवरील ‘चंद्रा’ला
एवढ्या लवकर आकाशाला का सामावले झाले…
कवी : चाँद अकबराबादी
मराठी अनुवाद : महेश पठाडे