मेरे मस्कन मेरी जन्नत को सलामत रखना
मेरे मस्कन मेरी जन्नत को सलामत रखना मेरे मौला मेरे भारत को सलामत रखना !! इसकी मिट्टी पे हर एक रीत निछावर कर दूँ अपनी धडकन के सभी गीत निछावर...
१. मेरे मस्कन मेरी जन्नत को सलामत रखना
उर्दू भाषेतील कवी आणि राजकारणी इम्रान प्रतापगढी युवा पिढीत लोकप्रिय आहे. ते राज्यसभेत काँग्रेसचे तरुण खासदार असून, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. पॅलेस्टाइनच्या वेदनाही त्यांनी आपल्या कवितेतून मांडल्या आहेत. त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९८७ रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण घेतले. २०१९ मध्ये मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसची उमेदवारी केली होती. मात्र, राजकारणापेक्षाही त्यांच्या कविता, शायरीने तरुणाईला वेड लावलं आहे. त्यांची भारतप्रेमाने ओतप्रोत भरलेली एक कविता खूपच लोकप्रिय आहे. ते ज्या तरुन्नुममध्ये ती सादर करता ते कमाल आहे. या कवितेचा मराठीत अनुवाद करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे… आवडला तर नक्की कमेंट करा…
मेरे मस्कन मेरी जन्नत को सलामत रखना
मेरे मौला मेरे भारत को सलामत रखना !!
इसकी मिट्टी पे हर एक रीत निछावर कर दूँ
अपनी धडकन के सभी गीत निछावर कर दूँ !
गंगा जमुना तेरी लहरों की मुकद्दस धुन पर
सारी दुनिया का मैं संगीत निछावर कर दूँ !!
इस वतन से मेरी निस्बत को सलामत रखना
मेरे मौला मेरे भारत को……..
तुमने नफ़रत का जो बाज़ार सजाया हुआ है,
तुम ये कहते हो मुसलमान पराया हुआ है !
आओ दिल चीर के दिखलाऊँ वतन का नक़्शा
मेरा भारत ! मेरी सॉंसों में समाया हुआ है !
मेरी रूहानी मुहब्बत को सलामत रखना
मेरे मौला मेरे भारत को ………
कवी : इम्रान प्रतापगढी
मराठी अनुवाद
माझ्या कस्तुरी माझ्या स्वर्गाला सुखरूप ठेव
माझ्या देवा माझ्या भारताला सुखरूप ठेव
या मातीसाठी प्रत्येक रीत बळी देईन
माझ्या हृदयाच्या ठोक्यातील प्रत्येक गीत बळी देईन
गंगा-यमुना, तुझ्या लाटांच्या पवित्र सुरांवर
संपूर्ण विश्वाचं मी संगीत बळी देईन
माझ्या देवा माझ्या भारताला सुखरूप ठेव
तू जो द्वेषाचा बाजार मांडला आहे
तू म्हणतोस, मुसलमान परका झाला आहे
चल तर मग हृदय फाडून दाखवतो या देशाचा नकाशा
माझा भारत माझ्या श्वासात सामावला आहे
माझ्या आत्मिक प्रेमाला सुखरूप ठेव
माझ्या देवा माझ्या भारताला सुखरूप ठेव
कवी : इम्रान प्रतापगढी
मराठी अनुवाद : महेश पठाडे
२. वो चल रहा है
उदास मौसम बदल रहा है
धुएँ का पर्वत पिघल रहा है
दिलों में लावा उबल रहा है
सुबह सुबह जब हुजूम लेकर,
सफ़र पे निकले तो यूँ लगे है
कि जैसे सूरज निकल रहा है।
वो चल रहा है….
वो कह रहा है कि नफ़रतों से जो दिल हैं टूटे,
सभी दिलों को मैं जोड़ दूँगा,
वो कह रहा है हर एक दरिया हर एक तूफ़ॉं
को मोड़ दूँगा।
सुनो सितमगर न समझो डरकर
मैं अपने लोगों को छोड़ दूँगा।
सितम की गर्दन मरोड़ दूँगा
सितमगरों की हर एक ख़्वाहिश
हर एक साज़िश कुचल रहा है।
वो चल रहा है ……
तो चालतोय…
ज़माने भर की तमाम माँओं,
तमाम बहनों ने हाथ उठाकर दुआएं दी हैं,
तमाम बच्चों ने इस तपस्वी का माथा चूमा, बलाएँ ली हैं।
तो चालतोय…
उदास मोसम बदलतोय
धुरळ्यातला पर्वत विरघळतोय
हृदयातला लाव्हा उकळतोय
सकाळी सकाळी जेव्हा जत्था घेऊन
प्रवासाला निघतो जणू वाटतं
जसा सूर्य निघालाय…
तो चालतोय…
तो म्हणतोय, की द्वेषामुळं जी मनं दुभंगलीय
सर्व मनं मी जुळवीन
तो म्हणतोय प्रत्येक प्रवाह, प्रत्येक वादळ
मी वळवीन
ऐक अत्याचारा, नको समजूस भीतीपोटी
मी माझ्या लोकांचा हात सोडून देईन
अत्याचाराची मान मोडून टाकेन
अत्याचाऱ्यांची प्रत्येक मनीषा
प्रत्येक कारस्थान तुडवतोय
जगभरातील समस्त मातांनी,
समस्त भगिनींनी हात उंचावून आशीर्वाद दिलेत
समस्त बालकांनी या तपस्व्याचं कपाळ चुंबलंय, आशीर्वाद घेतलेत…
कवी : इम्रान प्रतापगढी
मराठी अनुवाद : महेश पठाडे