टी-20 वर्ल्ड कप- वेस्ट इंडीज संघाच्या पराभवाची कारणे
यामुळे टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून वेस्ट इंडीज ‘आउट’
2022 च्या टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीजचे आव्हान का संपुष्टात आले? टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील प्राथमिक फेरीत दोन वेळा विजेता राहिलेल्या वेस्ट इंडीज संघाला 21 ऑक्टोबर 2022 रोजी आयर्लंड संघाने नऊ विकेटनी दणदणीत पराभूत केले. या विजयाने आयर्लंड सुपर-12 मध्ये दाखल झाला. प्राथमिक फेरीत वेस्ट इंडीजचा हा दुसरा पराभव. त्यामुळे विंडीजचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा स्कॉटलंड संघाने पराभव केला होता.
वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 146 धावा केल्या. यात ब्रँडन किंगने 48 चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह नाबाद 62 धावा केल्या. गॅरेथ डीलनीने अचूक मारा करून विंडीजच्या गोलंदाजांवर अंकुश राखला. त्याने चार षटकांत 16 धावांत तीन विकेट घेतल्या. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यानंतर आयर्लंडच्या फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांना फारशी संधीच दिली नाही. पॉल स्टर्लिंग आणि अँडी बॅल्बिर्नीने 73 धावांची सलामी दिली. यानंतर स्टर्लिंगने लॉरकॅन टस्करसह दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची अभेद्य भागीदारी करून 17.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टर्लिंगने 48 चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांसह नाबाद 66 धावा केल्या.
वेस्ट इंडीजचे आव्हान संपुष्टात येण्याची प्रमुख कारणे |
वेस्ट इंडीजला प्राथमिक फेरीतील पहिल्या लढतीत स्कॉटलंडकडून 42 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. |
दुसऱ्या लढतीत विंडीजने झिम्बाब्वेवर 31 धावांनी मात करून आव्हान राखले होते. |
आयर्लंडला पहिल्या लढतीत झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आयर्लंडने स्कॉटलंड आणि विंडीजला पराभूत करून सुपर-12 मध्ये स्थान निश्चित केले. |
आयर्लंडने ग्रुप-1 मध्ये प्रवेश केला असून, यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका संघांचा समावेश आहे. |
झिम्बाब्वे ग्रुप-2 मध्ये असून, या गटात बांगलादेश, भारत, नेदरलँड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. |
2008 नंतर… | 2012, 2016 |
आयर्लंड सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. त्याने दुसऱ्यांदाच दुसऱ्या फेरीत प्रवेश करता आला. याआधी 2009 मध्ये आयर्लंड संघ सुपर-8 मध्ये पोहोचला होता. | विंडीज टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वांत यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. विंडीजने 2012 आणि 2016 मध्ये टी-२० वर्ल्ड कप उंचावला होता. |
झिम्बाब्वे प्रथमच सुपर-12 मध्ये |
झिम्बाब्वेने प्राथमिक फेरीत गटातील अखेरच्या लढतीत स्कॉटलंडवर पाच विकेटनी मात केली. या विजयासह झिम्बाब्वेने वर्ल्ड कपमध्ये प्रथमच सुपर-12 मध्ये प्रवेश केला. |
आशिया कप- भूक पोटाची नि विजयाची!
One Comment