All SportsCricket

Gavaskar’s organization helps the players | गावस्करांची ही संस्था करते खेळाडूंना मदत

 

गावस्करांची ही संस्था करते खेळाडूंना मदत

Kheliyad News

महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या ‘दि चॅम्प्स फाउंडेशन’ The Champs Foundation | या संस्थेने हॉकी ऑलिम्पियन मोहिंदर पाल सिंह (एम. पी. सिंह) यांना आर्थिक मदत केली. एम. पी. सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. Gavaskar’s organization helps the players

गावस्करांची ‘दि चॅम्प्स फाउंडेशन’ The Champs Foundation | ही संस्था दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून आर्थिक विवंचनेतील माजी खेळाडूंना मदत करीत आहे. 

एम. पी. सिंह या नावाने ओळखले जाणारे मोहिंदर पाल सिंह किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. ते डायलिसिसवर असून, किडनी प्रत्यारोपणासाठी त्यांना दात्याची गरज आहे.

Gavaskar’s organization helps the players | याबाबत जेव्हा गावस्करांशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी सीएचएएमपीएस ‘चॅम्प्स’ फाउंडेशनबाबत माहिती दिली. 

ते म्हणाले, ‘‘मी प्रसारमाध्यमांत वाचत होतो, की माजी ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू किती कठीण प्रसंगांचा सामना करतात! ’’

ते म्हणाले, ‘‘एम. पी. सिंह यांच्या आजाराबाबतची माहिती वृत्तपत्रांतूनच वाचायला मिळाली.’’

एम. पी. सिंह १९८८ च्या सोल ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघात होते. मोहम्मद शाहीद, एमएम सोमाया, जूड फेलिक्स, परगटसिंग यांच्यासोबत ते खेळले आहेत. 

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार गावस्करांनी सांगितले, की अशी कोणतीही संस्था नाहीं जी माजी दिग्गज खेळाडूंच्या मदतीसाठी पुढाकार घेते. 

ते म्हणाले, ‘‘शिक्षण, आरोग्य, मुले आणि वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी अनेक संस्था आहेत. मात्र, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी कोणीच नाही. त्यामुळे मी एक फाउंडेशनची स्थापना करण्याचा विचार केला. त्या वेळी आम्ही 1983 विश्वकरंडक संघातील सदस्यांसोबत ‘डबल विकेट स्पर्धा’ आयोजित केली होती. एक उद्योगपती आणि एक कॉर्पोरेट प्रमुखाने आम्हाला दान दिले.’’

आतापर्यंत या फाउंडेशनने विविध क्रीडा प्रकारांतील २१ माजी खेळाडूंना मदत केली आहे. यात मासिक मदतीबरोबरच त्यांच्यावरील उपचाराचा खर्चही केला जातो.

चॅम्प्स म्हणजे…

C Caring काळजी घेणे

H Helping मदत करणे

A Assisting सोबत करणे

M Motivating प्रेरणा देणे

P Promoting प्रोत्साहन देणे

S Sportspersons खेळाडू

[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!