Yuvraj Singh comeback | युवीचा क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय
युवराजसिंगचा क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय
Follow us
[jnews_footer_social social_icon=”circle”]वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेला युवराजसिंग याने क्रिकेटमध्ये परतण्याचा Yuvraj Singh comeback | निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी 10 जून 2019 रोजी उद्वेगाने मुंबईत निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुन्हा क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय युवराजने 9 सप्टेंबर 2020 रोजी घेतला आहे.
विश्वकरंडक विजेत्या संघातला माजी क्रिकेटपटू युवराजसिंग याला पंजाब क्रिकेट संघटनेने PCA | निवृत्तीतून पुनरागमन करण्यास सांगितल्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला.
Yuvraj Singh comeback | 2011 च्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चा बहुमान मिळविणाऱ्या युवराजने 10 जून 2019 रोजी सर्व क्रिकेट प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली होती.
पीसीएचे सचिव पुनीत बाली यांनी 38 वर्षीय युवराजला पंजाब क्रिकेटच्या हितासाठी क्रिकेटमध्ये परतण्याची गळ घातली होती.
Yuvraj Singh comeback | ‘क्रिकबज’शी बोलताना युवराज म्हणाला, ‘‘सुरुवातीला मी हा प्रस्ताव स्वीकारावा किंवा नाही याबाबत मी कोणताही निर्णय घेतला नव्हता.’’
तो म्हणाला, ‘‘मी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणे जवळजवळ बंदच केले होते. मात्र, बीसीसीआयने मला परवानगी दिली असती तर जगभरातील इतर स्थानिक फ्रँचायजी लीगमध्ये मी खेळू शकलो असतो.’’
आता मात्र युवराजने पुनरागमनाचा निर्णय घेतला आहे. बाली यांनी त्याला पुनरागमनाचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर त्याने गांभीर्याने विचार सुरू केला. जवळजवळ तीनचार आठवडे तर त्यावर तो निश्चित असा निर्णय देऊ शकला नाही.
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरनसिंग आणि अनमोलप्रीतसिंग या पंजाबच्या तरुण चौकडीसोबत गेल्या काही महिन्यांपासून त्याने सरावही सुरू केला. त्यातून त्याला क्रिकेटमध्ये परतण्याची इच्छा बळावली.
Yuvraj Singh comeback | बाली यांनी सांगितले, की युवराजने याबाबक बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला एक पत्र लिहिले आहे.
पंजाब संघात त्याला खेळताना पाहायचे आहे. त्याने तरुण खेळाडूंना जे मार्गदर्शन केले आहे, ते उत्तमच आहे. मात्र त्याने आपल्या आयुष्यातील किमान एक वर्ष तरी पंजाब क्रिकेटला दिले पाहिजे, अशी इच्छा बाली यांनी व्यक्त केली.
पंजाब क्रिकेटला त्याची गरज आहे. एक खेळाडू म्हणूनच नाही, तर एक मार्गदर्शक म्हणूनही पंजाबला देण्यासारखे त्याच्याकडे बरंच काही आहे, असं बाली यांना वाटतं.
Yuvraj Singh comeback | युवराजची आई शबनम सिंग यांनाही वाटतं, की खेळाप्रती त्याचं प्रेम अजूनही तेवढंच आहे, जेवढं तो मैदानावर असताना होतं.
युवराज सध्या दुबईत आहे. दोन दिवसांत तो परतणार आहे. त्या वेळी तो याबाबत आईशी चर्चा करील. त्याच्या पुनरागमनाबाबत जी चर्चा सुरू आहे, ती खरी असल्याचा खुलासा त्याच्या आईने केला आहे.
युवराजला बिग बॅश लीगमध्ये खेळायचं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्यासाठी संघही निश्चित करणार असल्याची चर्चा 8 सप्टेंबर 2020 रोजी होती.
बीसीसीआयच्या नियमानुसार, केवळ निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंनाच विदेशी लीग खेळण्यास परवानगी आहे. त्यामुळेच त्याने बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
युवराजचे वडील योगराजसिंग म्हणाले,‘‘तब्बल 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीनंतर तो निवृत्त झाला. आता त्याने पुनरागमनाचा निर्णय घेतला आहे. तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यात मी हस्तक्षेप करणार नाही. मात्र मला तेव्हाही वाटायचं, की त्याने निवृत्तीचा निर्णय घ्यायला नको होता.’’
पुनरागमन कितपत यशस्वी ठरणार?
युवराजसिंगने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 30 जून 2017 रोजी खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. 38 वर्षीय युवराजचं पुनरागमन कितपत यशस्वी ठरेल, याबाबत शंकाच आहे.
Yuvraj Singh comeback | युवा खेळाडूंची कामगिरी उंचावत असताना पूर्वीसारखा जोश दाखविण्याचे आव्हान युवराजसमोर नक्कीच असेल. निवृत्तीपूर्वी अखेरच्या टप्प्यात त्याला क्रिकेटमध्ये फारशी छाप पाडता आलेली नाही.
वयाच्या 38 व्या वर्षी भलेही त्याचा फिटनेस उत्तम असेल. मात्र, क्रिकेट कौशल्यात त्याला छाप पाडता येईल का, हे येणारा काळच ठरवेल.
Nice study gk
Thank you so much