T-20 ranking 2020 | टी २० रँकिंगमध्ये भारत पिछाडीवरच
टी २० रँकिंगमध्ये भारतीय संघ तिसऱ्या स्थानी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२० मध्ये जाहीर केल्या जागतिक टी-२० क्रमवारीत T-20 ranking 2020 | भारताची पीछेहाट स्पष्टपणे समोर येत आहे. सांघिक कामगिरीत ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, वैयक्तिक कामगिरीत भारताचे लोकेश राहुल व विराट कोहली सोडले तर एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.
विशेष म्हणजे, अफगाणिस्तानने सांघिक कामगिरीत दहावे स्थान पटकावतानाच वैयक्तिक कामगिरीत सर्वच आघाड्यांवर त्यांच्या खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. सांघिक कामगिरी, फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरीत पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळविणारा अफगाणिस्तान हा एकमेव संघ आहे.
गोलंदाजीत राशीद खान, तर अष्टपैलू कामगिरीत मोहम्मद नबी या दोन खेळाडूंनी अव्वल स्थान मिळवताना दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. फलंदाजीतही हझरतुल्लाह याने सातवे स्थान मिळवताना विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.
T-20 ranking 2020 | भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघांसाठी ही धोक्याची घंटा असून, बांग्लादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड, ओमान हे संघ आगामी काळात आघाडीवर राहण्याची शक्यता या क्रमवारीवरून तरी दिसते.
फलंदाजीत डेव्हिड मालनची मुसंडी
इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मालन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमश्रेणी मालिकेनंतर फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमचे अव्वल स्थान खालसा केले.
३३ वर्षीय डावखुरा फलंदाज असलेल्या डेव्हिड मालनने १२९ धावांच्या जोरावर मोठी उडी घेतली आहे. तो चौथ्या स्थानावरून थेट अव्वल स्थानावर उडी घेतली आहे.
T-20 ranking 2020 | पाकिस्तानविरुद्धच्यामालिकेत त्याने पहिल्या सामन्यात ६६ धावांची अर्धशतकी खेळी साकारताना सामनावीराचा बहुमान मिळवला होता. इंग्लंडने ही मालिका २-१ अशी जिंकली होती.
T-20 ranking 2020 | गेल्या वर्षी नोव्हेंबर २०१९ मध्ये तो दुसऱ््या स्थानावर होता. यंदा मात्र त्याने आझमपेक्षा आठ गुण अधिक मिळवत पहिल्या स्थान मिळवले.
करोना महामारीमुळे सहा महिन्यांपासून भारताने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा केएल राहुल याला दोन क्रमांकांनी खाली घसरला आहे. त्यामुळे त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विराट कोहली मात्र दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
T-20 ranking 2020 | मालनचा सहकारी जॉनी बेयरस्टो आणि जोस बटलर यांना ९ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीत फायदा झाला आहे.
बेयरस्टोला तीन क्रमांकांचा फायदा झाला असून, तो १९ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या कारकिर्दीतली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेते ७२ धावा केल्या होत्या.
बटलरही ४० व्या स्थानावरून २८ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांत १२१ धावांबरोबरच मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमानही मिळवला.
आस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरन फिंच याने मालिकेत १२५ धावा केल्याने तो तिसऱ्या स्थानावर कायम आहे. ग्लेन मॅक्सवेलनेही सहावे स्थान राखले आहे. मात्र, अष्टपैलू कामगिरीत त्याने दुसरे स्थान मिळवले आहे.
सांघिक कामगिरीत ऑस्ट्रेलिया अव्वल
टी-२० कामगिरीत ऑस्ट्रेलियाने आपली दादागिरी कायम राखताना क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचे 275 गुण आहेत आणि इंग्लंड 271 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला मात्र तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
POS | TEAM | MATCHES | POINTS | |
1. | ऑस्ट्रेलिया | 22 | 6,047 | |
2. | इंग्लंड | 22 | 5,959 | |
3. | भारत | 35 | 9,319 | |
4. | पाकिस्तान | 23 | 6,009 | |
5. | दक्षिण आफ्रिका | 17 | 4,380 | |
6. | न्यूझीलंड | 23 | 5,565 | |
7. | श्रीलंका | 23 | 5,293 | |
8. | बांग्लादेश | 20 | 4,583 | |
9. | वेस्ट इंडीज | 24 | 5,499 | |
10. | अफगाणिस्तान | 17 | 3,882 |
अष्टपैलूत एकही भारतीय नाही!
सांघिक कामगिरीत तिसरे स्थान मिळविणाऱ्या भारतीय संघाला अष्टपैलू कामगिरीत मात्र स्थान मिळवता आलेले नाही. भारताचा एकही खेळाडू पहिल्या दहा अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. उलट अफगाणिस्तान, स्कॉटलंड, आयर्लंड, ओमान, केनिया, संयुक्त अरब अमिरात या लिंबूटिंबू संघांतील खेळाडूंनी पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.
POS | PLAYER | POINTS | |
1. | मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) | 294 | |
2. | ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) |
220 | |
3. | सीन विल्यम्स (झिम्बाब्वे) |
213 | |
4. | रिचर्ड बेरिंग्टन (स्कॉटलंड) | 194 | |
5. | गॅरेथ डेलानी (आयर्लंड) | 170 | |
6. | खावर अली (ओमान) | 159 | |
7. | कॉलिन्स ओबुया (केनिया) | 153 | |
8. | रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिरात) | 152 | |
9. | झीशान मसूद (ओमान) | 135 | |
10. | महमुदुल्लाह (बांग्लादेश) | 135 |
करोना महामारीचा फटका
करोना महामारीमुळे क्रिकेट स्पर्धांचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. भारताने गेल्या सहा महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याचा परिणाम या जागतिक क्रमवारीत दिसून येतो. मात्र, छोट्या देशांतील संघांनी करोना महामारीतही काही सामने खेळल्याने त्यांची क्रमवारीत वर्णी लागली आहे.
त्यामुळे लिंबूटिंबू संघांची ही कामगिरी नियमित क्रिकेट स्पर्धांमध्येही कायम राहिली तर मग भारतासारख्या देशांना आत्मपरीक्षण करावे लागेल. सध्या तरी अफगाणिस्तान आगामी काळात अधिक प्रभावशाली ठरू शकण्याची चिन्हे आहेत.
या संघांनी कामगिरीत सातत्य राखले तर आगामी काळात क्रिकेटचे चित्र वेगळे दिसेल. किंबहुना क्रिकेटविश्वावर अधिराज्य मिळविण्याचे मनसुबे रचणाऱ्या दिग्गज संघांना अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ येईल.
करोनोत्तर काळात क्रिकेटने कूस बदलली तर क्रिकेटच्या नकाशावर दादा संघांची नवी सूची पाहायला मिळेल. त्यात भारत, ऑस्ट्रेलियासारखे संघ कसे तग धरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.