मिशेल स्टार्क विम्यासाठी गेला कोर्टात
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क Mitchell Starc | याने विमा कंपनीवर दावा ठोकला आहे. जखमी झाल्याने तो आयपीएल खेळू शकला नाही. जर एखादा खेळाडू जायबंदी झाल्याने आयपीएल खेळू शकला नाही, तर त्याला विमा कंपनीकडून रक्कम दिली जाते. स्टार्कनेही १५ लाख ३० हजार डॉलरच्या विम्याच्या रकमेवर आपला हक्क सांगितला आहे. हे एकूण प्रकरण असे आहे, की स्टार्कला Mitchell Starc | २०१६ च्या आयपीएलमध्ये खरेदी करण्यात आले होते. मात्र, या दरम्यान तो एकही सत्र खेळू शकला नाही. २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्याच्यासाठी ९ कोटी ४० लाख रुपये मोजले होते. मात्र, जखमी झाल्याने त्याला या मोसमात खेळता आले नाही. त्यानंतर २०१९ मध्ये केकेआरने त्याला करारातून मुक्त केले. तत्पूर्वीच स्टार्कने विमा कंपनीवर १५ लाख ३० हजार डॉलर रकमेवर दावा केला होता. कारण २०१९ मध्ये जखमी झाल्याने तो केकेआरकडून खेळू शकला नसला तरी त्याने मेडिकल इन्शुरन्स घेतला होता. या विम्यानुसार जर तो जखमी झाला आणि लीगमध्ये खेळू शकला नाही तर विमा कंपनी त्याला नुकसानभरपाई देऊ शकेल. स्टार्कने Mitchell Starc | त्यासाठी ९७ हजार ९२० डॉलरचा हप्ता भरला होता. मात्र, ही रक्कम देण्यास कंपनीने टाळाटाळ केल्याने त्याने २०१९ मध्ये कंपनीविरुद्ध व्हिक्टोरियन कौंटी कोर्टमध्ये खटला दाखल केला होता. केकेआरशी करारबद्ध होण्यापूर्वी स्टार्क २०१६ आणि २०१७ मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलुरूशी करारबद्ध होता. या दोन्ही मोसमातही तो जखमी झाल्याने मैदानात उतरू शकला नव्हता. २०१८ मध्ये भारताने ज्या वेळी ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, त्या वेळी कसोटी मालिकेत त्याला मैदानावर खेळताना शेवटचे पाहिले होते. त्यानंतर तो मैदानावर पुन्हा दिसलेला नाही.
काय आहे नियम?
आयपीएलमध्ये जर एखादा खेळाडू जायबंदी झाला तर त्याला मेडिकल इन्शुरन्स काढता येतो. एखादा खेळाडू खेळताना जायबंदी झाला तर त्याला विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते.
स्टार्कने Mitchell Starc | असाच ए वैद्यकीय विमा घेतला होता, ज्यासाठी त्याने ९७ हजार ९२० डॉलरचा हप्ताही भरलेला होता. याच आधारे त्याने विम्याच्या रकमेवर दावा केला होता.
स्टार्कने पुरावा म्हणून व्हिडीओ फूटेज केला सादर
मिशेल स्टार्कने Mitchell Starc | विम्याच्या रकमेसाठी दावा केला खरा, पण विमा कंपनीने तो दावा फेटाळला. स्टार्क एलिझाबेथमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जखमी झाल्याचे विमा कंपनीला मान्य नाही.
‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, स्टार्कने दाखल केलेल्या दिवाणी खटल्याची सुरुवात आता १२ ऑगस्ट २०२० पासून होणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये मे २०२० मध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, हा प्रयत्न असफल ठरला.
त्या वेळी स्टार्कचा मॅनेजर अँड्र्यू फ्रेजर यांनी ‘फॉक्स स्पोर्ट्स’ची व्हिडीओ फूटेज सादर केले, ज्यात स्टार्क वेगवान गोलंदाजी करीत होता. या फूटेजवर कंपनीने कोणताही निर्णय दिला नाही.
विमा कंपनीच्या वकिलांचं म्हणणं आहे, की त्यांना १० मार्चपासून फूटेजचं विश्लेषण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. यातील एक फूटेज एक मिनिट ३७ सेकंदाचा, तर दुसरा फूटेज सात मिनिटे २५ सेकंदांचा आहे.
विमा कंपनीच्या युक्तिवादावर स्टार्कच्या कायदेविषयक टीमने सांगितले, की विमा कंपनीकडे समीक्षा करण्यासाठी आणि फूटेज मागविण्यासाठी १३ महिन्यांचा कालावधी होता. आता स्टार्कला हे स्पष्ट करावे लागणार आहे, की तो कुठे आणि कोणत्या वेळेला जखमी झाला होता.
स्टार्क यानंतर तिसरा कसोटी सामनाही खेळला होता. दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडत वैद्यकीय अहवाल कोर्टाला सादर केला आहे.
One Comment