महिला क्रिकेटपटूची आत्महत्या

त्रिपुराची १९ वर्षांखालील महिला क्रिकेट (Women Cricket) संघाची खेळाडू अयंती रियांग आपल्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ‘सयंदन’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले असून, या वृत्तानुसार १६ वर्षांची अयंती मंगळवारी १६ जून २०२० रोजी रात्री आपल्या घरात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. ही आत्महत्या (Suicide) असावी, असा कयास स्थानिकांनी व्यक्त केला. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा उलगडा होऊ शकला नाही.
अयंतीला चार भावंडे आहेत. यात अयंती सर्वांत लहान होती. गेल्या वर्षी अयंती त्रिपुरातील १९ वर्षांखालील महिला संघात होती. ती त्रिपुराच्या २३ वर्षांखालील संघातही होती. या संघाकडून ती टी-२० स्पर्धाही खेळली होती. त्रिपुराची राजधानी आगरतळ्यापासून सुमारे 90 किलोमीटरवरील उदयपूरच्या तेनानी गावाची रहिवासी आहे. एक प्रतिभावान खेळाडू (Cricketer) आम्ही गमावली आहे, अशी प्रतिक्रिया त्रिपुरा क्रिकेट संघाचे सचिव तिमीर चंदा यानी व्यक्त केली.