All SportsFootballSports Review

21 Reasons You Should Fall In Love With FIFA Ranking | फिफा जागतिक क्रमवारीतल्या रंजक गोष्टी

फिफा जागतिक क्रमवारीतल्या रंजक गोष्टी

फिफा जागतिक क्रमवारीविषयी (FIFA World Cup) या 21 गोष्टी तुम्हाला माहीत आहे काय? (22 Reasons You Should Fall In Love With FIFA Ranking) फिफा जागतिक क्रमवारीत ब्राझील सर्वांत यशस्वी देश का आहे, सर्वाधिक वेळा फिफा क्रमवारीत अव्वलस्थान राखणारा देश कोणता, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर हे नक्की वाचा…

फिफा वर्ल्डकपविषयी हे माहीत आहे काय?

1. ब्राझीलने सर्वाधिक 12 वेळा (1994, 1995, 1996, 1997, 1998, 1999, 2000, 2002, 2003, 2004, 2005, 2006) फिफा क्रमवारीत (FIFA Ranking) अव्वलस्थानी राहिला आहे. या कामगिरीच्या जवळपास जगातला एकही देश नाही.
2. ब्राझील चार वेळा फिफा क्रमवारीत (FIFA Ranking)  द्वितीय स्थानावर राहिला आहे.
3. ब्राझीलला पाच वेळा (1993, 2001, 2018, 2019, 2020) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
4. 2006 मध्ये बारावे विक्रमी अव्वलस्थान मिळविल्यानंतर ब्राझील 14 वर्षांपासून प्रथम क्रमांकावर आलेला नाही.
5. ब्राझीलखालोखाल स्पेनचा क्रमांक लागतो. स्पेनने सहा वेळा (2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013) फिफा क्रमवारीत (FIFA Ranking) अव्वल स्थानी राहिला आहे.
6. स्पेनने 2013 मध्ये सहाव्यांदा अव्वलस्थान मिळविले. असे असले तरी स्पेनने एकदाच 1994 मध्ये द्वितीय स्थान मिळवले आहे. याशिवाय या देशाला तीन वेळा (2002, 2003, 2015) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
7. स्पेनला 2013 नंतर पुन्हा अव्वलस्थान मिळवता आलेले नाही.
8. फिफा जागतिक क्रमवारीच्या (FIFA Ranking) इतिहासात ब्राझील, स्पेन, बेल्जियम, जर्मनी, अर्जेंटिना आणि फ्रान्स हे सहाच देश अव्वलस्थानी राहिले आहेत. या देशांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाला अव्वलस्थान मिळवता आलेले नाही.
9. फिफा जागतिक क्रमवारीच्या (FIFA Ranking) इतिहासात बेल्जियम हा एकमेव असा देश आहे, ज्याने फक्त अव्वलस्थान मिळवले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी हा देश एकदाही आलेला नाही.
10. बेल्जियमने आतापर्यंत चार वेळा जागतिक क्रमवारीत आणि चारही वेळा (2015, 2018, 2019, 2020) त्याने विश्वविजेतेपद मिळविले. त्यामुळेच या संघाच्या नावावर एकही उपविजेतेपद नाही. विशेष म्हणजे या संघाच्या नावावर तिसरे स्थानही नाही.
11. फिफा क्रमवारीत जर्मनीनेही आपला दबदबा निर्माण केला आहे. या देशाने तीन वेळा (1993, 2014, 2017) अव्वलस्थान मिळविले आहे.
12. जर्मनीला सहा वेळा (1995, 1996, 1997, 2008, 2012, 2013) दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. एवढेच नाही तर चार वेळा (1998, 2010, 2011, 2016) तिसऱ्या स्थानी राहिला आहे.
13. दिएगो मॅराडोनाच्या नावाने लोकप्रिय ठरलेल्या अर्जेंटिनालाही फार काळ अव्वलस्थान राखता आलेले नाही. या देशाने फक्त दोन वेळा (2007, 2016) अव्वलस्थान मिळविले आहे.
14. अर्जेंटिनाला तीन वेळा (2001, 2014, 2015) दुसऱ्या स्थानावर राहिला. पाच वेळा (2000, 2004, 2006, 2012, 2013) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
15. फ्रान्स या देशाला एकदाच अव्वलस्थान (2001) मिळवता आले आहे.
16. फ्रान्स तब्बल आठ वेळा (1998, 2000, 2002, 2003, 2004, 2018, 2019, 2020) दुसऱ्या स्थानी राहिला आहे. सर्वाधिक वेळा दुसरे स्थान मिळविण्याचा विक्रमही याच देशाच्या नावावर आहे. हा आनंद म्हणावा की दुर्दैव फेंचांनाच माहीत.. याशिवाय फ्रान्सला दोन वेळा (1996, 1999) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
17. दुर्दैवी देशांमध्ये नेदरलँड, इटली, चेक रिपब्लिकचा समावेश करावा लागेल. या तिन्ही देशांना फिफा जागतिक क्रमवारीत इतिहास रचण्याची प्रत्येकी दोन वेळा संधी मिळाली होती. म्हणजेच हे तिन्ही देश प्रत्येकी दोन वेळा दुसऱ्या स्थानापर्यंत झेपावले आहेत. मात्र, एकाही देशाला अव्वलस्थानापर्यंत पोहोचता आलेलं नाही.
18. नेदरलँडने आतापर्यंत दोन वेळा (2010, 2011) द्वितीय स्थान मिळवले. याशिवाय तीन वेळा (2005, 2008, 2009) त्यांना तिसरे स्थान मिळाले.
19. इटलीला दोन वेळा (1993, 2006) दुसरे, तर दोन वेळा (1995, 2007) क्रमांकावर समाधान मानावे लागले.
20. चेक रिपब्लिक हा देशही दोन वेळा (1999, 2005) अव्वलस्थानापासून वंचित राहिला. त्याचबरोबर एकदा (1997) त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
21. फिफा जागतिक क्रमवारीच्या (FIFA Ranking) इतिहासात ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या नावावर सर्वाधिक वेळा तिसऱ्या स्थानावर राहण्याचा विक्रम आहे. या दोन्ही देशांनी प्रत्येकी पाच वेळा तिसरे स्थान मिळवले आहे.

बेल्जियम जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर

फिफाने (FIFA Ranking) 7 एप्रिल 2021 रोजी सर्वोत्तम फुटबॉल संघांची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत बेल्जियमने सर्वाधिक 1783.38 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवला आहे. फ्रान्सने 1757.3 गुणांसह द्वितीय, तर ब्राझीलने 1742.65 तृतीय स्थान मिळवले आहे. अमेरिका या यादीत विसाव्या स्थानी आहे. (22 Reasons You Should Fall In Love With FIFA Ranking)

[visualizer id=”3655″]

सर्वाधिक वेळा ब्राझीलच अव्वल

फिफाने एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीत ब्राझीलला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. मात्र, तुम्हाला माहीत नसेल, याच ब्राझीलने सर्वाधिक वेळा अव्वलस्थानी राहण्याचा विक्रम रचला आहे. ब्राझीलने बारा वेळा जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. हा एक विक्रम आहे. सर्वाधिक वेळा (१२ वेळा) विश्वविजेतेपद मिळविण्याचा विक्रमही ब्राझीलच्याच नावावर आहे. ब्राझईल खालोखाल स्पेनचा क्रमांक लागतो. स्पेनने सहा वेला, तर बेल्जियमने चार वेळा जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान मिळवले आहे. बेल्जियमने गेल्या पाच वर्षांत कमालीची प्रगती केली आहे. हा देश 1017 चा अपवाद वगळता 2015, 2018, 2019, 2020 मध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे.

क्र. वर्ष अव्वलस्थान क्र. वर्ष अव्वलस्थान
1 1993 जर्मनी 15 2007 अर्जेंटिना
2 1994 ब्राझील 16 2008 स्पेन
3 1995 ब्राझील 17 2009 स्पेन
4 1996 ब्राझील 18 2010 स्पेन
5 1997 ब्राझील 19 2011 स्पेन
6 1998 ब्राझील 20 2012 स्पेन
7 1999 ब्राझील 21 2013 स्पेन
8 2000 ब्राझील 22 2014 जर्मनी
9 2001 फ्रान्स 23 2015 बेल्जियम
10 2002 ब्राझील 24 2016 अर्जेंटिना
11 2003 ब्राझील 25 2017 जर्मनी
12 2004 ब्राझील 26 2018 बेल्जियम
13 2005 ब्राझील 27 2019 बेल्जियम
14 2006 ब्राझील 28 2020 बेल्जियम

पुढचे विजेतेपद कोण जिंकणार?

पुढचे विजेतेपद कोण जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर आताच देणे कोणालाही शक्य नाही. एक तर कोरोनाचे सावट असल्याने सराव सामने रद्द झाले आहेत. मात्र, फिफा वर्ल्डकपमधील गेल्या तीन वर्षांतली कामगिरी विचारात घेतली तर या प्रश्नाचा अंदाज बांधणे काहीसे सुकर होईल. 2018, 2019, 2020 या तीन वर्षांपासून बेल्जियम अव्वलस्थानी विराजमान आहे. या तिन्ही वर्षांत बेल्जियमचा आव्हानवीर होता फ्रान्स. मात्र, तिन्ही वेळा फ्रान्सला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. बेल्जियम आणि फ्रान्स यांची गेल्या तीन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे. 2021 मध्ये वर्ल्डकप स्पर्धा झालीच तर हे दोन्ही देश पूर्ण ताकदीनिशी उतरतील. मात्र, ब्राझीलही तेवढ्याच ताकदीने उतरेल. गेल्या चौदा वर्षांत ब्राझीलला आपला करिष्मा दाखवता आला नसला तरी 2016, 2017 मध्ये दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारण्यात तो यशस्वी ठरला होता.

[visualizer id=”3667″]

कोण कोणत्या वर्षी अव्वलस्थानी?

ब्राझील 1994, 1995, 1996, 1997, 1998, 1999, 2000, 2002, 2003, 2004, 2005, 2006
स्पेन 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013
बेल्जियम 2015, 2018, 2019, 2020
जर्मनी 1993, 2014, 2017
अर्जेंटिना 2007, 2016
फ्रान्स 2001

हा लेख कसा वाटला, यावर जरूर प्रतिक्रिया द्या… यासारख्याच इतर लेखांसाठी आम्हाला फॉलो करा…

Follow us:

Kohli is fifth in the T20 rankingsKohli is fifth in the T20 rankingsKohli is fifth in the T20 rankings
Kohli is fifth in the T20 rankingsKohli is fifth in the T20 rankingsKohli is fifth in the T20 rankings

[jnews_block_9 first_title=”हेही वाचा” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!